कलीसिया के लिए परामर्श

188/318

प्रकरण ४१ वें - संगीत

पवित्र संगतीची कला (संदेड्यांच्या शिक्षण-क्षत्रांत) मोठ्या दक्षतेने उभारण्यांत आली होती. निरर्थक नृत्यगायनाचा मागमूस ऐकू येत नव्हता. अगर देवाकडचे लक्ष काढून मानवाची थोरवी दाखविणारे बालीश गायनही होत नसे, परंतु उत्पन्नकर्त्याप्रित्यर्थ व त्याच्या अद्भुत कृत्यांवरून त्याच्या नामाची थोरवी वर्णणारी पवित्र व गंभीर स्तुतिस्त्रोत्रं म्हणण्यांत येत. जें कांहीं शुद्ध, उदात्त व भारदस्त आहे याकडे मन आकर्षले जावे आणि अंतर्यामांत भक्तिपर कृतज्ञता जागृत करावी या पवित्र उद्देशाने संगीताचा उपयोग होत असें. 1 CChMara 240.1

स्वर्गीय दरबारांतील ईश्वरी स्तवनांत संगीत हा एक भाग असतो. स्वर्गीय गायकसमुहाशी शक्य तितकें साम्य ठेवण्याचा आम्ही आमच्या स्तुति संगीतांत प्रयत्न करावा. वाणीला योग्य प्रकारची तालीम देणे हें शिक्षणांतील महत्त्वाचे अंग होय व तिची निष्काळजी करता कामा नये. धार्मिक उपासनेमध्ये प्रार्थना हा जितका उपयुक्त भाग आहे, तितकाच संगीत हाही आहे, अंत:करणाला संगीताविषयीं उत्साह वाटला तरच तें उठावदार होईल. 2 CChMara 240.2

मला स्वर्गीय अनुक्रम व तोही निष्णात असा दाखविण्यांत आला व तेथील संगीताची संपूर्णता पाहून मी अत्यानंदित झाले. दृष्टांतांतून बाहेर पडल्यावर येथील संगीत फार कर्कश व बदसूर असें वाटले. देवदूतांचे समूह मी पाहिलें. तें उघड्या मैदानांत व एकेकाच्या हातीं सोनेरी सारंगी होती व उभे होतें. सूर कमीजास्त करण्यासाठी सारगीला खुटल्या होत्या. ततूतारावरुन त्यांची बोटे फिरत त्यांत कांहीं उणेपण दिसत नव्हते. निरनिराळ्या तंतूंतून निरनिराळे नाद निघत. एक पुढारी दूत होता. सारंगीला त्याचा प्रथम स्पर्श होताच त्या मातबर सगीतांत सर्व एकत्रित होऊन निष्णात स्वर्गीय संगीत बाहेर पडे. मला तर त्याचे वर्णनच करता येत नाहीं. तें एक स्वर्गीय असें मंजूळ गायन असून प्रत्येकाच्या चर्येवर येशूची प्रतिमा झळकत होती व ती अनिवार्य गौरवाला प्रदीप्त करीत होती. 3 CChMara 240.3

मला असेही दर्शविण्यात आलें कीं, तरुणांनी प्रतिष्ठित स्थानीं स्थिर झाले पाहिजे वे परमेश्वराचा शब्द (आज्ञा) हाच आपला मंत्री व आपला मार्गदर्शक असा करून घेतला पाहिजे. तरुणांच्या माथी गंभीर अशा जबाबदाच्या आहेत. पण त्यांना त्या क्षुद्र वाटतात. पवित्र व धार्मिक आचरणाला गति देण्याऐवजी त्यांच्या गृहांतील संगीते त्यांची मने दुराचाराकडेच घेऊन जात आहेत. सांप्रतची निरर्थक गायने व लोकप्रिय संगीत हा त्याच्या पसंतीला चांगलीच जुळून जातात. संगीतांतील वाद्यात जो वेळ जातो तो प्रार्थनेत घालविणे बरे झाले असतें. संगीताचा दुरुपयोग न केला तर तें अत्यंत आशीर्वादमय होऊन जाईल, परंतु अयोग्य उपयोगाने तें भयंकर शापग्रस्त असें ठरते. संगीत चेतना उत्पन्न करिते, परंतु त्यातून कांही जोर किंवा धडाडी निघत नाहीं. असला जोर व धडाडी ख्रिस्त लोकांना केवळ कृपेच्या सिंहासनासमोर मिळू शकतो तें जेव्हां आपल्या गरजा ओरडून देवापुढे सादर करतात व सैतानाच्या पाशवी हल्यापासून बचावाकरिता बलप्राप्ति व्हावी म्हणून याचना करितात तेव्हाच मात्र या संगीतांतून त्यांना शक्ति व धैर्य मिळून जाते. सैतान हा ह्या तरुण बंदिवानांना मार्गदर्शन करित आहे. अरेरे त्याच्या ह्या भ्रष्टकारक सामथ्र्यापासून निसटण्यासाठी मला काय करता येईल बरें ! तो मोठा चतुर मोहिनी घालणारा असून त्यांना नाशाच्या खाईत घेऊन जात आहे. 4 CChMara 240.4

*****