कलीसिया के लिए परामर्श
सर्वांविषयी आदरयुक्त विचार करा
आपल्या बधूविषयींची निंदा ऐकून घेणें म्हणजे ती निंदा मान्य करून पत्करणे होय. पुढील प्रश्न काय तो पाहा: “हें परमेश्वरा, तुझ्या मंडपांत कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिव्हेनें चुगली करीत नाहीं, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाहीं, आपल्या शेजार्यची निंदा ऐकत नाहीं.” स्तोत्र. १५:१-३. CChMara 242.3
जे आम्हांला दुसर्यचे दोष येऊन सांगतात, तेच प्रसंग मिळाल्यावर आमचेहि दोष तितक्याच मुक्त कठाने प्रसिद्ध करितील, हें जर प्रत्येकाने ध्यानात आणिले तर गप्पांना किती मोठा पायबंद बसेल. अगदींच अशक्य होऊन जाईल तोंवर सर्वाविषयी विशेषत: आपल्या बांधवाविषयीं मनांत चांगलेच विचार आणण्याचा प्रयत्न करावा. वाईट बातम्यांना आपण घाईघाईने आधार देऊ नये. मत्सरामुळे अगर गैरसमजामुळे अगर अपुच्या माहितीवरून भावनांना आसरा दिला कीं त्या काट्या कुसळाप्रमाणे बेफाम पांगल्या जातात. जर एखाद्या बंधूचे वाकडे पाऊल पडलेच तर तुमच्या मनात त्याचे खरे हितचिंतन आहे हें दाखविण्याची तुम्हांला संधि मिळते. प्रेमळ बुद्धीनें त्याजकडे जा, त्याच्यासह व त्याच्यासाठीं प्रार्थना करा व त्याच्या तारणासाठी ख्रिस्तानें जें मोल दिलेले आहे तें ध्यानात आणा. अशा प्रकारे तुम्ही एका आत्म्याचा मरणाच्या दाढेतून बचाव कराल व त्याच्या अगणित पापांवर पांघरुन घालाल. 1 CChMara 242.4
ओझरती नजर, एखादा शब्द, फार तर काय आपल्या वाणींतील कमीजास्त सूर खोटेपणाला पुरे असतो. तो हृदयात तीव्र बाणाप्रमाणे शिरून असाध्य अशी जखम करितो. देवाला ज्याच्या करवीं सत्कार्य साधता आलें असतें, त्याच्या अंतर्यामी संशयी व निंदक वृत्ति आल्यामुळे त्याचे वजन, सामर्थ्य आणि त्याची उपयुक्तता नष्ट होऊन जाते. प्राणीवर्गातील अशा कांही जाति आहेत कीं, त्यांच्यातून कोणी जखमी होऊन पडला तर इतरजण त्यावर एकदम झडप घालून त्याचे तुकडे तुकडे करितात. ख्रिस्ती म्हणविणार्य स्त्रीपुरुषांमध्ये अशीच क्रूर वृत्ति आढळून येते, आपणाहून जे कमी दोषी आहेत त्यांना धोंडमार करून ठार करावे अशीच परूशी लोकांची आस्था त्यांच्यात असतें. असें कित्येकजण आपल्या स्वत:च्या गुन्ह्याकडे व कमीपणाकडे लक्ष जाऊ नये म्हणून तें दुसर्यचे दोष व त्याच्या उणीवाकडे लक्ष ओढीत असतां मंडळींमध्ये अगर मंदिरात आपण देवाविषयी किती आस्थेवाईक आहों अशा नावलौकिकासाठीं जनमनाला सावरून धरीत असतात. 2 CChMara 243.1
ख्रिस्ताच्या सेवकांच्या उद्देशावर व कामावर टीका करण्यांत जो वेळ दवडला जातो, तो प्रार्थनेत घातला तर अधिक बरे होईल, दोष काढीत बसतात त्यांना जर दोषारोपाचे सत्य स्वरूप समजले तर त्याचे त्याजवषयींचे मत अगदीच बदलून जाईल. टीका करून दुसर्यांना दोष देण्याऐवजी प्रत्येकजण जर पुढीलप्रमाणे म्हणेल तर तें किती अधिक हितकर होईल: “मला माझ्या स्वत:च्या तारणाची खटपट केली पाहिजे. जो प्रभू माझ्या आत्म्याचे तारण करूं इच्छितो त्याच्या मी जर सहकार केला तर मला माझ्या स्वत:कडेच अधिक दक्षतेने पाहिलें पाहिजे. माझ्यातील प्रत्येक दष्ट बुद्धि मी काढून टाकली पाहिजे. खिस्तामध्ये मला नवीन झाले पाहिजे. प्रत्येक दोष मीं पायाखाली घातला पाहिजे. तेव्हाच मात्र असत्याशी झगडा करणार्यांना दुबळे करण्याऐवजी उत्तेजनपर भाषणाने मी त्यास सबळच करुं शकेल.’’ 3 CChMara 243.2