कलीसिया के लिए परामर्श

187/318

ग्रंथांतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ

फुरसतीच्या वेळीं वाचनासाठी एकदा मनुष्य कसल्या पुस्तकांची निवड करितो यावरून त्याच्या ख्रिस्ती अनुभवाचा गुणधर्म कळून येतो. मनाची हितकारक स्थिति आणि धार्मिक तत्त्वांची सुस्थिति साध्य करून घ्यावयाची असेल तर पवित्र ग्रंथाच्या आधारे तरुणानी देवाच्या समागमात राहिले पाहिजे. ख्रिस्ताच्याद्वारे तारणाचा मार्ग दाखवून वरिष्ट व अधिक हीतकर जीवन जगण्यासाठी पवित्रशास्त्र आमचा मार्गदर्शक होय. अत्यंत चित्ताकर्षक व अत्यंत बोधपर इतिहास व चरित्र लेखन जर कुठे लिहिलेले आढळेल तर तें पवित्रशास्त्रमध्येच आहे. ज्यांची समजशक्ति काल्पनिक गोष्टींच्या वाचनाने दुषित झालेली नसेल त्यांना पवित्रशास्त्र हा ग्रंथ सर्वांमध्ये अत्यंत चित्ताकर्षक वाटणार आहे. CChMara 238.2

पवित्रशास्त्र हा ग्रंथातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ होय. जर तुमची देवाच्या वचनांवर आवड बसली आणि प्रसंग मिळेल तसे त्याचे संशोधन केले तर त्यातील मौल्यवान सपत्ति तुमचीच होईल आणि सत्कार्ये करण्यासाठी तुम्ही अगदी सुसज्ज व्हाल. तेव्हांच कोठे तुम्हांला कळून येईल कीं, येशू तुम्हांला खुद्द स्वत:कडे ओढून घेत आहे. परंतु जर शास्त्राचे वाचन वरपागी असेल व ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे जगण्याचे तुम्ही समजून घेतले नाही तर तसल्या वाचनाने काहीं भागणार नाहीं. सत्याच्या खोल खाणीमध्ये बुडी मारल्यावर मात्र देवाच्या वचनातील संपत्ति आढळून येणार आहे. CChMara 238.3

दैहिक वासना सत्याचा धिक्कार करिते परंतु पालटलेल्या अंत:करणात क्रांतिकारक फेरफार होतात. पाप्याचा निषेध करणारी सत्यें दैवी शक्तीने प्रगट केल्यामुळे जो ग्रंथ पूर्वी अनाकर्षक वाटत होता, तोच आत्म्याला पोषक अन्न देणारा आणि चरित्रासाठी आनंद व समाधान पुरविणारा असा होतो. धार्मिकतेच्या सूर्यप्रकाशाने पवित्र ग्रंथाची पाने प्रज्वलित होतात व त्याच्याद्वारें पवित्र आत्मा अंत:करणाशी संवाद करितो. CChMara 238.4

उथळ वाचनाची ज्यानी आवड लावून घेतलेली आहे, त्या सर्वांनी संदेष्ट्यांच्या खात्रीकारक वचनाकडे आपले लक्ष लावावे. आपलीं पवित्र शास्त्र घ्या आणि जुन्या व नव्या करारातील जीं पवित्र निवेदने आहेत त्यांचा ताज्या मनाने अभ्यास करण्यास सुरवात करा. वारंवार आणि काळजीपूर्वक रितीने शास्त्राचा अभ्यास केला. तर त्यांतील सौंदर्य अधिक खुलून दिसेल आणि क्षुद्र वाचनाची अभिरुचि क्षय पावेल. आपल्या अंतर्यामाना हा ग्रंथ घट्ट बांधून टाका, मित्र व मार्गदर्शक असा तो तुम्हांला होऊन जाईल. 8 CChMara 239.1

*****