कलीसिया के लिए परामर्श

186/318

प्रक्षोभक गोष्टींच्या वाचनांतील धोके

आमच्या मुलांनी काय वाचावे ? हा एक गंभीर प्रश्न असून त्यांचे उत्तरही गंभीरच असावयास पाहिजे. शब्बाथ पाळणाच्या कुटुंबामध्ये मासिके व वर्तमान पत्रे पाहाण्यात येतात. त्यात असलेल्या गोष्टींवरून मुलांच्या व तरुणांच्या मनांवर सद्गतीसाठी काहींच छाप पडण्यासारख नसतो, हें पाहन मला वाईट वाटते. काल्पनिक कथामध्ये मन असलेली मंडळी माझ्या पाहाण्यात आहे. सत्याकडे लक्ष देण्याची व आपल्या विश्वासधाराची कारणांशी परिचय करण्याची त्यांना सधि मिळालेली असतें, तरी परतू पोक्त वयात येऊनही वास्तविक धार्मिकता काय व व्यवहारिक ईश्वरनिष्ठा काय याचा त्यांना गंधसुद्धा नसतो. CChMara 237.3

निरर्थक व खळबळकारी कथांचे वाचक व्यवहारिक जीवनातील कर्तव्ये पार पाडण्यास नालायक होऊन जातात. भ्रामक जगांत तें जगत असतात. असल्या गोष्टी वाचण्याच्या फदांत राहूं दिलेली मुलें माझ्या पाहाण्यांत आहेत. तें स्वदेश किंवा परदेशी जरी असले तरी तें मनाने अस्वस्थ, स्वप्नानुभवी व अत्यंत सामान्य विषयावर बातचित करणारे असेच तें आढळन आलें. धार्मिक विचार व बोलणे भाषण त्याच्या मनाला सर्वथः अपरिचित असें होतें. क्षोभकारक गोष्टींचीच आवड वाढविल्यामुळे त्यांची मानसिक अभिरुचि भ्रष्ट होऊन जाते व तसल्याच अपथ्यकर अन्नावाचून त्यांच्या मनाची भूकच भागत नाहीं. असल्या वाचनांत रंगलेल्यास मानसिक दुर्व्यसनव्यथित (दारूडे किंवा झिंगखोर) ह्याशिवाय दुसरे काय नांव द्यावें हें मला समजत नाहीं. अति खादाडपणाच्या संवयाचा शरीरावर जो आघात होतो तसाच वाचनाच्या असंयमी सवयानीं मेंदूवर (विचारशक्तीवर) आघात घडतो. 6 CChMara 237.4

हें सत्य मान्य करण्यापूर्वी कित्येक जणांना कादंबच्या वाचण्याची चटक लागलेली होती. मंडळींमध्ये मिळाल्यावर ह्या संवया सोडून देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. जे वाचन त्यांनी सोडून दिलेले आहे त्याच धर्तीचे दुसरे वाचन त्यापुढे सादर करणे. हें जणू काय दारुड्यापुढे मादक पदार्थ सादर करण्यासारखं होईल. त्यांच्यासमोर निरतर असणार्‍य मोहाला वश झाल्याने चांगल्या वाचनाकडची त्यांची आवड लवकरच नष्ट होऊन जाते. शास्त्राभ्यासात त्यांचे मन नसते. त्यांचे नैतिक सामर्थ्य दुबळे होऊन जाते. पापाच्या किळसपणाचा भास थोडा थोडा कमी वाटू लागतो, अविश्वासूपणाची वाढ स्पष्ट दिसूं लागते, चरित्रातील व्यवहारिक कर्तव्यांकडे दुर्लक्ष अधिक झालेले दिसते. मन एकदा भ्रष्ट होऊन गेले कीं कसल्याही प्रकारच्या उद्दोपक वाचनाला मनाची तयारी असतें. या प्रकारे आत्म्याला संपूर्णत: आपल्या कह्यात ठेवण्यासाठी सैतानाला मार्ग मोकळा होतो. 7 CChMara 238.1