कलीसिया के लिए परामर्श
आत्म्याचा नाश करणारें वाचन
छापखान्यांतून जे सततचे व अमर्याद प्रकाशन होत आहे, तें घाईघाईमें व वरवर वाचून टाकण्याची पोक्त व तरुण मंडळीला जणू काय संवय लागलेली आहे, त्यामुळे त्यांच्या मनाची संघटित व जोमदार ताकद नाहींशी झालेली आहे. त्याचप्रमाणे मिसरांतील बेडकांच्या पिडेप्रमाणे मासिकांचा व पुस्तकांचा प्रवाह देशभर इतका फैलावलेला आहे कीं तें प्रकाशन नुसतेच सामान्य, निरर्थक व नि:सत्वच राहिलेले नसून तें अशुद्ध व मानहानिकारक होऊन गेलेले आहे. केवळ मनालाच उन्मत करून त्याचा नाश करावा एवढेच नव्हें तर आत्म्याला सुद्धा भ्रष्ट करून त्याचा घात करावा असा त्या प्रकाशानाचा ठराविक परिणाम होत आहे. 3 CChMara 236.6
मुलांच्या व तरुणांच्या शिक्षणांत वनदेवतांच्या गोष्टी, दंतकथा व बनावट गोष्टींना फार मोठें स्थान देण्यांत आलें आहे. अशाच धर्तीची पुस्तके शाळांतून चालतात व पुष्कळ घरांत तीं आढळून येतात. इतकी असत्यता खेचून भरलेली पुस्तकें मुलांनी वापरावीत हें ख्रिस्ती आईबाप कसे होऊ देतात? आमचे आईबाप शिकवितात. अशाविरुद्ध असलेल्या गोष्टींचा अर्थ काय असा सवाल मुलें करितात तेव्हां ह्या गोष्टी खर्यखुर्य नाहींत असें उत्तर त्यास देण्यांत येते; परंतु त्या कथांच्या उपयोगानें जो दुष्परिणाम मार्गदर्शन होतें. चरित्राविषयी त्यातून खोट्या कल्पना मिळतात व जें असत्य किंवा भ्रामक आहे त्याविषयींची आवड त्यांच्या मनात निर्माण होऊन तिचा प्रसार करण्याची इच्छा होते. CChMara 236.7
सत्याला विरोध करणारी पुस्तकें मुलांच्या अगर तरुणांच्या हातांत कदापि देऊ नयेत, शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये ज्यांत पापाचीं बिये आहेत अशा कल्पना आपल्या मुलांना देऊ नका. CChMara 237.1
आणखी एका धोक्याविषयौँ आम्हांला निरंतर सावध असावयास पाहिजे व तो धोका म्हणजे नास्तिक लोकांच्या लिखानांचे वाचन हा होय. असली पुस्तकें सत्याच्या शत्रूच्या प्रेरणेनें लिहिलेली असतात. आत्म्याला संकटांत खेचल्याशिवाय कोणाच्यानेही असली पुस्तकें वाचता येणार नाहींत. ज्यांच्यावर ह्याचा परिणाम झाला आहे, त्यापैकी काहीजण अखेरीस सुधारले जातील हें खरे आहे. तथापि जे कोणी त्यांच्या दुष्परिणामांशी लुडबूड करीत असतात तें सर्व सैतानाच्या भूमिकेवर उभे असतात व त्याला ती संधि अतिशय पथ्यकर असतें. त्याचे मोहपाश त्यांच्यावर झडप घालतात तेव्हां तें समजून घेण्याची सुबुद्धि अगर त्यांचा प्रतिकार करण्याची शक्ति त्यांच्यांत नसते. आकर्षक मोहिनींच्या सामर्थ्याने अश्रद्धा व अविश्वास त्यांच्या मनाला जखडून टाकितो. CChMara 237.2