कलीसिया के लिए परामर्श

184/318

अहितकर वाचनाचा प्रभाव

मन ज्या गोष्टीवर पोसत असतें त्यांचा फार मोठ्या प्रमाणात मनावर आघात होतो, हें सैतानाला ठाऊक असतें. तरुणांनी आणि पोक्तानी गोष्टींची पुस्तकें, कथा व असेच वाङ्मय वाचावे असें सैतान प्रयत्न करीत असतो. असल्या वाङमयाचे वाचक हातांतील कर्तव्ये करण्यास नालायक ठरतात. त्याचे जीवन औपचारिक असतें, शास्त्र शोधावे व स्वर्गीय मान्नावर जगावे अशी त्यांना इच्छा होत नाही. ज्या मनाला सबळ होण्याची गरज असतें तेच दुबळे होतें. ख्रिस्ताचा कार्य उद्देश व कार्य ज्या महान् सत्यातून प्रगट केलेले आहे त्या सत्यांचे अध्ययन करण्याचे त्याचे सामर्थ्य नष्ट होतें, ती सत्ये तर मनाला बळकटी आणितात व कल्पनाशक्तीला जागृत करितात आणि ख्रिस्त जसा विजयी झाला तशी विजयी होण्याची भरभक्कम व आस्थेवाईक इच्छा प्रदिप्त करतात. CChMara 235.3

प्लेगाप्रमाणें मनावर व अंत:करणावर भयंकर आघात करणारी वाङमयें नष्ट करावीत. प्रेम-कथा, क्षुद्र व मनाला क्षोभ आणणारी कथानकें, आणि लेखकाने कांहीं नैतिक दिलेल्या गोष्टी ज्याना आम्हीं धर्मिक कादंबच्या म्हणतों त्यासुद्धा वाचक वर्गाला विघातक अशाच असतात. कथा-ग्रंथांतून धार्मिक विधाने सर्वत्र गुफलेली दिसतील, पण बहुतेक सर्वत्र सैतानाला दिव्यदूताचा पेहराव चढवून त्याच्याकरवीं अधिक परिणामकारी फसवणूक व लालूच दाखविण्यांत CChMara 235.4

येते. कोणत्यामध्येही सत्य तत्त्वाचे समर्थन केलेले नसते अगर मोहजालापासून निभाव दर्शविलेला नसतो म्हणून त्यांच्या वाचनांत सुरक्षितपणा नसतो. CChMara 236.1

कल्पित कथाचे वाचक एक प्रकारच्या सैतानी फंदांत गुंतलेले असतात. तो फंद आत्मिकता नष्ट करून टाकतो आणि पवित्र ग्रंथांची सौंदर्ययुक्त पाने निस्तेज करून टाकतो तसल्या वाचनाने मनांत बाधक खळबळ उद्भवते, कल्पनाशक्ति संतप्त होतें, उपयुक्ततेसाठीं मन नालायक करते, प्रार्थनामय जीवनांत शिथील करते आणि आत्मिक कारभारासाठी मनाला अपात्र ठरविते. CChMara 236.2

देवानें आमच्या पुष्कळ तरुणांना श्रेष्ठ प्रतीच्या दानांनी सुसज्ज केलेले आहे. परंतु पुष्कळदा त्यानीं तीं दाने नि:सत्व केलेली असतात, त्यांची मने दुबळीं व गोंधळलेली असतात व ह्यामुळे देवाच्या कृपेत अगर विश्वासरुपी ज्ञानांत त्यांनी वर्षानुवर्षे प्रगति केलेली नसते. हें सर्व कशामुळे म्हणाल तर त्यांच्या अविचारी वाचनाची निवड ह्यामुळेच होय. जे प्रभूच्या लवकर होणाच्या आगमनाची वाट पाहात आहेत, “विनाशी तें अविनाशीपण धारण करील” ह्या अदभूत रुपांतराकडे ज्यांची नजर आहे त्यांनी ह्या कसोटीच्या काळी सेवेच्या उच्च पदावर येऊन ठाकले पाहिजें. CChMara 236.3

माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, खळबळकारी कथा वाचून तुम्हांला जो मानसिक गोंधळ वाटला त्याविषयी स्वत:च शंकाकुशंकेने मनाशीं विचार करा. असले वाचन केल्यावर तुम्हांला आपलें पवित्रशास्त्र उघडून त्यांत आयुष्यासाठी दिलेल्या हितकर गोष्टी वाचता येतील काय ? देवाच्या ग्रंथावर मन बसत नाहीं असें तुम्हांला आढळून आलें नाहीं काय ? प्रेम-कथेची गुंगी तुमच्या मनावर आलेली आहे. तिच्यामुळे त्या ग्रंथांतील आरोग्यकारक रंग नाहींसा झालेला आणि तुमच्या सार्वकालिक कल्याणाविषयी जीं महत्त्वाची आणि गंभीर सत्ये त्यांत निवेदिली आहेत त्यांवर तुमचे मन बसणे अशक्य झालेले आहे. CChMara 236.4

सर्व प्रकारच्या गचाळ वाचनाचा निश्चयपूर्वक धिक्कार करा. तसल्या वाचनाने तुमची धार्मिकता सबळ होणार नाही, उलट तुमच्या कल्पना शक्तीला भ्रष्ट करणारे विचारतरंग मनांत येतील व येशूविषयीचे ध्यान व त्याच्या मौल्यवान बोधाकडे मन जाऊ देणार नाहीं. कुमार्गाकडे मन ओढणाच्या देणार्‍य गचाळ गोष्टींनीं मन भरू देऊ नका. ज्या प्रकारचे अन्न मनाला द्यावे त्या प्रकारचेच विचार मनांत नांदत असतात. 2 CChMara 236.5