कलीसिया के लिए परामर्श
करमणुकीचा उपभोग सधन- निधंनांना सारखाच
पोक्त लोक जसे शतवृत्तीचे व गंभीर असतात तसे तरुणांना होता येत नाही. वडील जसे विचारवंत असतात, तसे मुलांना होता येत नाहीं. कलंकित करमणुकींचा धिक्कार करण्यांत यावा व तो तसा यथा योग्यच असतो, तरी आईबाप, शिक्षक व तरुणाचे मार्गदर्शक यांनीं तसल्या करमणुकाऐवजी नैतिक जीवनाला काळिमा लावणार नाहीत अशा निर्भेळ मनोरंजनांची योजना करावी. तरुणांना कडक शिस्तनियमांनी जखडून धरू नये कारण तसले जुलुम असह्य झाल्यावर तें मूर्खतेच्या व नाशाच्या मार्गाकडे धाव घेतील. शिस्तीचा पगडा त्याच्यावर असावाच, पण तो भरभक्कम, प्रेमळ व विचारवंतपणे बसवावा व त्याच्या मनाना व उद्देशाना ताब्यात राखून त्यास वळण देण्यांत यावे. तें इतकें सौम्यतेचे, सूज्ञतेचे व प्रेमळपणाचे असावें कीं त्यांना अशी खात्री पटून जावी कीं, तुमच्या अंतर्यामी त्यांच्यासंबंधी सर्वोत्कृष्ट हितच मात्र आहे. 6 CChMara 228.4
उभय मनाला व शरीराला अत्यंत उपयुक्त ठरतील अशा करमणुकींच्या तन्हा आहेत. केवळ निरुपद्रवीच नव्हेतर तर बोधपर अशा साधनांपासून विचारवंत व समतोल मनाला करमणुका व चित्तरंजन भरपूर असें आढळून येईल. उघड्या हवेत लाभणारी श्रमपरिहारक करमणूक आणि सृष्टिसौंदर्यांत दिसून येणार्य ईश्वरी कार्याचे चितन अत्यत फायदेशीर ठरेल. 7 CChMara 228.5
दुसर्यांना हितकारक होईल अशी करमणूक मुलांना व तरुणांना स्वत:पुरतीच मिळणाच्या करमणुकीहून फार मोठ्या आशीर्वादाची वाटल. सूचना त्वरित मान्य करून घेण्यात तरुण निसर्गत: मोठे उत्साही व सिद्ध असतात. 8 CChMara 228.6
सधन लोकांना आणि निर्धन लोकांना सुखसंपत्तीचा उपभोग मिळावा म्हणून देवाने ती प्रत्येकाला देऊ केलेली आहे. - विचारसरणीची निष्कलंकता वाढविणे, नि:स्वार्थीपणे कामे करणे, आणि सहानुभूतीची भाषा करून मायाळूपणाची सेवा करणे हीच ती सुखसंपत्ती होय. असल्या प्रकारची सेवा करितात त्यांच्या चरित्रांतून ख्रिस्ताचा प्रकाश प्रज्वलित होतो व त्या प्रकाशाकडून ज्यांची जीवनचरित्रे नाना प्रकारच्या दु:खभारांनी अंधकारमय झालेली असतात ती प्रकाशमान होतात. 9 CChMara 228.7
आपल्या ह्या जगांत आवश्य व उपयुक्त अशा अनेक गोष्टी करावयाच्या आहेत म्हणून नुसती मौजेखातरची करमणूक सर्वथः व पूर्णपणे अनावश्यक अशी दिसून येते. मेंदू, मज्जा, अस्थि व स्नायु यांना विशेष उद्देशासाठी भक्कमता व बळकटता प्राप्त व्हावी. सत्कृत्ये करावीत, खोल ध्यान करावे व विचार योजना कराव्यात हाच तो उद्देश होय. या विचारयोजनेच्याद्वारे त्याची बौद्धिक शक्ति वाढावी व शारीरिक अवयवांना तजेला आणावा, हें अशासाठीं कीं त्यांना प्राप्त झालेल्या कृपादानाचा व्यवहारिक सेवेकडून देवाच्या गौरवार्थ त्यांचा विनियोग करण्यांत यावा. 10 CChMara 229.1
एखाद्या शहरात किंवा ग्रामीण भागात राहाणाच्या कित्येक कुटुंबांनी एकत्र होऊन नेहमींच्या शारीरिक व मानसिक उद्योगधंद्यापासून रजा घेऊन कोठेतरी वनात वनभोजनासाठी जावें. तें ठिकाण एकाद्या तळ्याच्या कांठीं अगर नैसर्गिक सौंदर्याचा देखावा मिळेल अशा उपवनांत असावे. साधे पण चागले जेवण व फळफळावळे घेऊन जावीत. झाडांच्या सावलीत अगर उघड्या मैदानात मेजवानी करावी. प्रवासाने, व्यायामाने आणि देखावा सौंदर्याने चागली भूक लागेल व अशा भोजनाचा मोठमोठ्या अधिपतींनासुद्धा हेवा वाटेल. CChMara 229.2
नित्याच्या चिंता, श्रम व भानगडी या प्रसंगी आईबापांनी व मुलांनी विसरुन जाव्यात. आईबापांनी मुलांसह मुलाप्रमाणे व्हावे व त्यांच्यासह करिता येईल तेवढी मजा करावी. सारा दिवस चित्तरंजनाचाच व्हावा. ज्यांचा उद्योगधंदा खोल्यातून व बैठकीचा असतो त्यांच्या प्रकृतीसाठीं उघड्या हवेतील व्यायाम हितावह होईल असल्या सहली शक्य त्या सर्वांनी घेणें हें एक कर्तव्यच समजावे. नुकसान तर कांहीं होणारच नाहीं, तर उलट फायदाच होईल. आपापल्या कामावर परत गेल्यावर त्यांना नवीन उमेद, नवीन अवसान मिळाल्याचे वाटून अधिक आस्थेने तें कामाला लागतील आणि रोगप्रतिबंधनाला तें अधिक सुसज्ज राहातील. 11 CChMara 229.3
चेंडू खेळाच्या व्यायामाला मी नावें ठेवीत नाहीं, पण हा व्यायामसुद्धा साधा जरी असला तरी तो वाजवीपेक्षा अधिक होऊ शकेल. CChMara 229.4
असल्या करमणुकींचा जो एक छंद लागलेला असतो त्याचा नक्कीच परिणाम काय होतो, याविषयी टीका करण्याचे मी नेहमीच टाळते. ह्या कामीं जी साधने-साहित्ये खर्ची घातली जातात त्याचा उपयोग ख्रिस्ताविरहित मरून जाणार्यांना सत्याच्या प्रकाशात आणण्यासाठी केल्यास अधिक इष्ट होईल. करमणुका व त्यावर होणारा खर्च आत्म-सुखासाठी असतो व हळहळ तोच आत्मप्रतिष्ठेत जातो. केवळ मौज प्राप्तीसाठी दिलेल्या शिक्षणांत अशी एक आवड व असा एक मनोविकार बनतो कीं ख्रिस्ती शिलसंवर्धनांच्या कामीं तो निरुपयोगी असाच ठरतो. 12 CChMara 229.5
करमणुकींत आणि शारीरिक संस्कृतींत मन घालणे कधीं कधीं नियमित शाळा-कार्यात अडखळण आणण्यासारखे वाटण्याचा संभव आहे, तथापि तें वास्तविक अडखळण नाहीं असेच दिसून येईल. मनाला व शरीराला तरतरीत ठेवणे, नि:स्वार्थी मनाची जोपासना करणे आणि शिक्षक व शिष्य याच्यातील समाईक हितसंबंध व मिश्रत्व एकत्रित आणणे यांत जो काळ व प्रयत्न खर्चिला जाईल तो शेकडोपटीने अधिक मौल्यवान ठरेल. बेचैन करणारा जोम किंवा शक्ति तरुणांच्या चरित्रांत वारंवार एक संकटाचे साधन असतें. वरील प्रकारचा कार्यक्रम ठेविल्यानें त्यांतून सुटून जाण्याला एक उपयुक्त मार्गच मोकळा होईल. नियमाच्या व शिस्तीच्या नानाविध प्रतिबंधनापेक्षा दृष्टाईचा प्रतिकार करण्यासाठी सज्जनतेने सुसज्ज असलेले मन फार उपयुक्त ठरते. 13 CChMara 229.6
सोबती आणि योग्य सवया CChMara 230.1
तरुण लोक जेव्हां एकमेकांच्या सोबतींत येतात तेव्हां त्यांची ती सोबत आशीर्वादसपन्न तरी होईल किंवा शापयुक्त तरी बनेल. परस्परांची उन्नति, परस्परांस अशीर्वाद व परस्परास सबळ करूं शकतील. आपल्या वर्तनात, स्वभाव धर्मांत व ज्ञानात सुधारणा करतील, अगर बेपरवाईने व अनिष्टपणे वागून तें नीतीभ्रष्ट तरी होतील. CChMara 230.2
येशूवर विसंबून राहाणाच्या सर्वांना तो साहाय्यभूत असा होईल. ख्रिस्तांशी जे संबंध झालेले आहेत, अशांच्याच घरीं सुख असतं. तारणारा नेईल तिकडे तें जातात व आपले विकार व वासना ही वधस्तंभीं देतात. त्यांच्या आशा ख्रिस्तावर स्थिरावलेल्या असतात व त्या भक्कम पायापासून जगांतले कसलेही वादळ त्यांना हादरवू शकत नाहीं. CChMara 230.3
तरुण पुरुषानों व स्त्रियानो, निष्ठावत, प्रामाणिक आणि अस्सलपणे उपयुक्त व्हावे कीं नाहीं हें तुम्हां स्वत:वर अवलंबून आहे. सर्व प्रकारच्या परिस्थितींत सत्याची बाजू धरण्यास तुम्हीं सिद्ध व दृढनिश्चयी असावे. आमच्या अनीतीच्या संवया आम्हांला स्वर्गात घेऊन जाता येणार नाहींत. जर त्याचा येथेच नायनाट केला नाही तर धार्मिकांच्या वस्तीतून आम्हांला बाहेर टाकले जाईल. वाईट सवयाना विरोध केला कीं त्याची जोमदार प्रतिकारक शक्ति पुढे करण्यांत येते, परंतु जोराने व धिम्मेपणाने लढा चालूं ठेविला तर त्या जिंकल्या जातील. CChMara 230.4
योग्य प्रकारच्या सवया लागाव्यात म्हणून ज्याचे नैतिक व धार्मिक वजन सबळ आहे अशाच्याच सगतीचा आम्ही शोध करावा. 14 CChMara 230.5
जे शिलानें शुद्ध, विचारशील आणि मनमिळावू आहेत अशाशी सोबत करण्याविषयी तरुण लोकांना समज दिली तर त्याचा परिणाम अत्यंत हितावह होईल. प्रभूचे सद्भय मनीं असणाच्या सोबत्यांची निवड केली तर त्यांचा सहवास सत्याकडे, कर्तव्यदक्षतेकडे आणि पवित्र जीवनाकडे घेऊन जाईल. अस्सल ख्रिस्ती जीवन में कल्याणकारी सामर्थ्य असतें, परंतु उलट असें असतें कीं ज्याचे नैतिक चरित्र शंकात्मक असतें, अयोग्य तत्त्वांचे व व्यवहाराचे असतें अशा स्त्री-पुरुषांच्या सहवासात जे पडतात तें लवकरच त्यांच्या मार्गाचे भागीदार होतात. मूलत: मनाचा कल नीचतेकडे असतो; नास्तिकाशी सहवास करणारा लवकरच नास्तिक बनतो; दुष्टाची सोबत आवडली कीं, तर तो फार खात्रीने दुष्ट होऊन जातो. दुर्जनाच्या मसलतीने चालणे ही पापीं जनांच्या मार्गात पाऊल टाकून धर्मनिदकांच्या बैठकीत बसण्याची पहिली पायरी होय. CChMara 230.6
आपलें शील योग्य प्रकारचे बनावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी जे आस्थेवाईक व मनाने विचारशील आहेत व ज्यांचा कल धार्मिक वृत्तीकडे आहे अशाशीच सोबत करण्याचे निवडून घ्यावे. सार्वकालिक जीवनासाठी ज्यांना आपली शीलरुपी इमारत उभारावयाची आहे त्यांनी आपल्या साधन सामुग्रीची किंमत भरून त्या इमारतींत चांगली साधने घालावीत. कुजलेले साहित्य आणि शिलाची न्यूनता जर त्या इमारतीसाठी वापरावयाची असेल तर तिचा नाश हें क्रमप्राप्तच होय. आपण इमारत कशी काय वठवितो याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. मोहरूपी वादळ इमारतीवर येऊन आदळेल व जर तिची उभारणी भरभक्कम आणि निष्ठापूर्वक नसेल तर ती त्या कसोटीपुढे टिकाव धरणार नाहीं. CChMara 230.7
उत्तम नांव सोन्यापेक्षा (संपत्तीपेक्षां) अधिक मौल्यवान असतें. मानसिक व नैतिक शिलाने कमी दर्जाच्या लोकांशी संगतसोबत करण्याचा तरुण मंडळीचा एक कल असतो. विचार, मनोधिकार व वतन कमकुवत असणार्य लोकांशी बुद्धिपुरसर संबंध जोडल्याने एकाद्या तरुणाच्या पदरात सुखसौख्य कसे काय पडणार ? काहींची आवडशक्ति नीच प्रकारची असतें आणि काहींच्या सवयी भ्रष्ट प्रतीच्या असतात म्हणून असल्या प्रकारचे सोबती निवडल्याने तें त्यांच्यासारखे बनून जातात. 15 CChMara 231.1
क्षुद्रपणांत आणि सुखमौजेच्या फदांत प्रथमचा पाऊल घातल्याने खरोखरीच एखादे संकट निर्माण होत नाही आणि जितक्या सहजगतीने आम्ही त्या मार्गात प्रवेश करितों तितक्याच सहजगतीने वाटल्यास तो सोडूनही देता येईल असें तुम्हांस वाटत असेल, पण ही एक भूल आहे. दुष्ट संगतीच्या नादाने हळूहळू सन्मार्ग सोडून अनेक जण आज्ञाभंगाच्या व नाशाच्या खोल डोहात उतरलेले आहेत व त्यात बुडून जाणे अशक्य असें एका काळी त्यांना वाटत होते. 16 CChMara 231.2
आमच्या सुखसौख्यासाठी येथे असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही सोडून द्यावी अशी देवाची इच्छा आहे, असें तुम्हांला वाटू देऊ नका. मात्र जे काहीं आमच्या कल्याणासाठी व सौख्यासाठी उपयुक्त नाहीं असें काहीही रोखून धरू नका ही देवाची इच्छा आहे. 17 CChMara 231.3