कलीसिया के लिए परामर्श
संपूर्ण विश्रांति आणि स्वत:पुरती करमणूक
प्राप्त झालेल्या फुरसतीची सुधारणा करावी आणि लाभलेल्या बुद्धिदानांचा योग्य उपयोग करण्यासाठीच सर्व सवलती देण्यांत आलेल्या आहेत, व त्याबद्दल आम्हांला जबाब द्यावयाचा आहे. हें तरुण मंडळीने ध्यानात ठेवावे. मग काय, आम्हांला काहीं मनोरंजन अगर करमणूक नको कीं काय ? काहीं एक फेरफार न करता आम्ही काम, काम, कामच करीत राहावे काय, अशी विचारणा करण्यांत येईल. 18 CChMara 231.4
शारीरिक कष्टामुळें ताकदीवर पडलेल्या जोराच्या ताणापासून अल्पवेळेसाठी का होईना काहींतरी फेरबदल होणे अवश्य होईल. हें अशासाठी कीं, परत आपल्या कष्टावर जातांना तें त्यांना अधिक हौसेने व यशस्वी रीतीने करता यावेत. परंतु संपूर्णत: आराम घेणें अवश्य वाटू नये अगर शारीरिकदृष्ट्या पाहिलें तरी तसल्या आरामापासून उत्कृष्ट परिणाम होतीलच असें नाहीं. एका प्रकारच्या कष्टापासून जरी थकवा आला असला तरी त्यांनी आपला वेळ निरर्थक घालवू नये. इतका थकवा येणार नाहीं असें दूसरे कांही तरी शोधून काढावे, त्यामुळे आईचा व बहिणींचा श्रमभार कमी होऊन तो त्यांना एक फायदाच होईल त्यांच्यावर जे जडभारी ओझे पडलेले असतें तें कमी होऊन त्यांचा चिंताभार कमी होईल. सुविचाराने लाभलेली ही त्यांना करमणूकच वाटेल व त्यात त्यांना खरेखुरे सुखही वाटेल व अशा रितीने घालविलेला वेळ क्षुल्लक किंवा स्वार्थीपणाचाही वाटणार नाही. त्याचा तो वेळ त्यांना फायदेशीर झालेला वाटेल व श्रमात फेरबदल झाल्यामुळे त्यांना निरंतर ताजेतवाने वाटेल. एवढेच केवळ नव्हें तर प्रत्येक घडीचा सदुपयोग झाल्यामुळे ती घडीच तत्संबधींची साक्ष कोणालाही देईल. 19 CChMara 231.5
शारीरिक प्रकृतीचे संरक्षण करण्यासाठी स्वार्थाने भरलेली करमणूक अवश्य होय असें पुष्कळजण म्हणतील. शरीराच्या आणि मनाच्या प्रगल्भतेसाठीं फेरबदल करणे योग्य आहे, कारण तसल्या फेरफाराने मन आणि शरीर तजेलदार आणि जोमदार होतें. परंतु मुर्खतंच्या करमणूकीपासून आणि तरुणांनी करावयाच्या रोजच्या कर्तव्याची निष्काळजी करून ती उद्देश सिद्धीस जाणार नाहीं. 2 CChMara 232.1
घोड्यांच्या शर्यती, पत्त्यांचे डाव, जुगारबाजी, सट्टेबाजी, मद्यपान, धुम्रपान याचा तर आम्ही धिक्कार करितोच, पण असत्य व कृत्रिम जीवन आम्ही टाळीत असतां जी सौख्यसाधने शुद्ध, उदार आणि भारदस्तीची आहेत त्यांचाही आम्ही पुरवठा केला पाहिजे. 21 CChMara 232.2
अत्यंत घातक नादांत नाटकगृहाचा नाद हा एक आहे. वारंवार असें बोलण्यांत येते कीं तेथें नैतिक व धार्मिक शिक्षण देण्यांत येते, परंतु तें अनीतीचे प्रत्यक्ष माहेरघरच असतें. तेथील करमणुकींनीं दुर्गुणी संवया आणि पापीष्ट प्रवृत्ति प्रबळ व कायमच्या होऊन जातात. नीच गाणी, विषयासक्त अगविक्षेप (हावभाव), बोलण्याची ढब व आकर्षण याच्याद्वारे कल्पनाशक्तीचे व नैतिक चालीरितीचे दिवाळेच निघते ज्याला असले देखावे पाहाण्याची सवय लागलेली आहे असा प्रत्येक तरुण तत्वत: नीतिभ्रष्ट होणारच. कल्पनाशक्ति कलुषित करावी, धार्मिक संस्काराचा क्षय करावा, शांततामय सौख्यांना आणि चरित्रातील सत्य भावनांना बोथट करावे यासाठी नाटकांच्या फदांत जे सामर्थ्य आहे तसे आज आमच्या देशात दुसर्य कशातही इतकें अधिक आढळून येणार नाहीं. मद्यपानाने गुंगून पडण्याची इच्छा जशी वाढते तसेच नाटकातील प्रत्येक देखाव्याने नाटकाची आवड बलवत्तर होत जाते हें टाळण्याचा एकच मार्ग आहे व तो हाच कीं नाटकगृह, सर्कशी आणि संशयात्मक करमणुकीची इतर स्थळे वर्ध्य करण्यांत यावीत. 22 CChMara 232.3
लहरी सैख्यांच्या आहारी गेलेली मंडळी दाविदानें परमेश्वरासमोर केलेल्या आदरयुक्त नांवाचा दाखला देऊन सांप्रतचा नखरेखोर नाच क्षम्य असल्याचे निवेदन करितात, परंतु असली विचारसरणी निराधार आहे. सांप्रतच्या नाचाचा संबंध मूर्खतेशी व धागडधिंग्या चैनीश असतो. मौजप्राप्तीसाठी आरोग्याचा व नीतीचा बळी देण्यांत येतो. नृत्यगृहाला वारंवार जाणार्य लोकांच्या मनात देवत्व व त्याजविषयींचा आदर हा विचारच नसतो; प्रार्थना अगर स्तुतिसंगीत ही त्यांच्या मेळाव्यात अगदीं अस्थानीं वाटतात. पण ही कसोटी अगदीं निर्णयात्मक असतें. ज्या करमणुकी पवित्र गोष्टींविषयींची आवड दुबळी करितात आणि ईश्वरी सेवेतील आनंद कमजोर करितात अशांच्या नादी ख्रिस्ती लोकांनी कदापि लागता कामा नये. देवाच्या कराराचा कोश हालविताना जे वादन आणि जे आनंददायी स्तुतिपर नृत्य करण्यांत आलें त्याच्याशीं साप्रतच्या विषयवासनी नाचाचे यत्किंचितही साम्य होऊ शकत नाहीं. प्रथमच्या प्रकारांत देवाचे नाम-स्मरण आणि त्याच्या पवित्र नामाला आद्यस्थान दिलेले होतें. दुसर्य प्रकारात मानवांनीं देवनाम विसरून जावें आणि त्यांची अप्रतिष्ठा करावी अशी सैतानाची करामत आहे. 23 CChMara 232.4