कलीसिया के लिए परामर्श
श्रमपरिहाक करमणुकीचें धोरण
असें कांहीं दूषित कल्पनेचे लोक आहेत कीं त्यांना वाटते कीं धर्म हा लोखंडी दंडाने राज्य करणारा एक जुलमी अधिकारीच आहे. आपल्या नीतिभ्रष्टतेविषयी आणि काल्पनिक दुष्टतेविषयी त्यांची उदाचीच भुणभूण असतें. त्यांच्या अंतर्यामी प्रेमाची वस्ती नसते आणि त्यांची मुद्रा नेहमीच तिरस्करणीय असतें. तरुणाच्या अगर दुसर्य कोणाच्याही निरपराधी हास्यांने तें वरमून जातात. सर्व प्रकारची करमणूक अगर मनोरंजन त्यांना एक पापच वाटते. त्यांच्या मते मनाची रचना निरंतर कठोर व कडक असावी. ही एक कमालीची विचारसरणी होय. दुसर्य कित्येकांना असें वाटते कीं आरोग्यप्राप्तीसाठी मनापुढे निरनिराळ्या व नवीन नवीन करमणुकींच्या योजना असाव्यात. कसल्यातरी खळबळीकडे त्यांचे लक्ष असतें व त्या नसल्या कीं त्यांना बेचैन वाटते हें कांहीं खरे ख्रिस्ती नसतात त्याची विचारसरणी दुसर्य बाजूने कमालीची असतें. ख्रिस्ती धर्माची अस्सल तत्त्वे सवांच्यापुढे सुखप्राप्तीची साधनें खुली करितात व त्याची उंची, खोली, लांबी व रुंदी अगम्य असतें. 2 CChMara 227.3
आपली मने तरतरीत करावीत आणि निष्कलंक करमणूकीच्याद्वारे आपलीं शरीरें ताजीतवानीं करावीत हें ख्रिस्ती जनतेचे कर्तव्य व त्यांना लाभलेली ती संधि होय. ही अशासाठीं कीं त्यांना आपल्या शारीरिक, मानसिक सामर्थ्याने देवाचे गौरव करता यावे. आमच्या करमणुकीचे प्रसंग निरर्थक व अक्कलशून्यतेचे नसावेत. ज्यांच्यासह आमचा समागम येतो, त्यांना तें हितावह व प्रगतीकारक असें व्हावेत त्यांना व आम्हांला ख्रिस्ती म्हणून आम्हांकडे सोपविलेल्या कर्तव्याची अंमलबजावणी करण्यास आम्हांला अधिक लायक करतील असें असावेत. 3 CChMara 227.4
शब्बाथ पाळणारे लोक इतके परिश्रम करितात कीं कांहीं एक फेरबदल न करिता व आराम न घेता तें कष्ट करीत राहातात, असें माझ्या नजरेंस आणून दिले. शारीरिक परिश्रमात व विशेषत: मानसिक सेवेत जे गुंतलेले असतात त्यांना तर करमणुकीची फार आवश्यकता असते. आमच्या धर्म समजुतीप्रमाणे सुद्धा निरंतर व अत्यंत श्रम करणे आमच्या तारणासाठी अगर देवाच्या गौरवासाठीं आवश्यक नसतें. 4 CChMara 227.5
शारीरिक व्यायामांत घालविलेला वेळ वाया जात नसतो. शरीराच्या सर्व अवयवांना व शक्तीना प्रमाणबद्ध व्यायाम देणे त्यांच्या कर्तृत्व शक्तीसाठी फार जिव्हाळ्याचा असतो. जेव्हां मेंदूवर सतत भार पडलेला असतो व आमच्या शरीरातील इतर अवयव निष्क्रिय राहातात तेव्हां शारीरिक व मानसिक शक्तींचा क्षय होतो. शारीरिक घटनेतून आरोग्यकारक बळ कमी होतें, व मानसिक तरतरी व आवेश लापला जातो व अखेरीस रोगट अवस्था मात्र पदरात पडते. CChMara 228.1
निद्रेसाठ व श्रमासाठी नियमित तास काळजीपूर्वक ठरविण्यात यावेत. आरामासाठी काळ, करमणुकीसाठी काळ आणि चिंतनमननासाठीं काळ नक्की करण्यांत यावेत. पुष्कळांना वाटत नाहीत अशी नियमितपणाची तत्त्वें उपयोगी असतात. CChMara 228.2
अभ्यासात गुंतलेल्या लोकांना विसावा लागतो. मन कायमचे गहन विचारांत गुंतलेले नसावे कारण त्यामुळे मानसिक कोमल तंत्रे क्षीण होऊन जातात. शरीराला तद्वतच मनाला व्यायाम असावा लागतो. 5 CChMara 228.3