कलीसिया के लिए परामर्श
अवश्य गोष्टींची हेळसांड ही कांहीं काटकसर नसते
शरीरप्रकृतीची निष्काळजी अगर तिचा दुरुपयोग केल्याने आपण देवाच्या सेवेसाठीं नालायक होतो म्हणून तसे केल्याने आपण देवाचा सन्मान राखीत नाहीं. प्रकृतीसाठी चवदार व शक्तिवर्धक अन्न देणे हें धरधन्याच्या कर्तव्यातील आद्य कर्तव्य होय. अन्नपाण्यात काटछाट करण्यापेक्षा ती कपड्यालयांत व सामानासुमानांत केलेली फार बरी. CChMara 220.9
खर्चिक पाहुणचार करता यावा म्हणून कित्येकसे धरधनी कौटुंबिक अन्नावर आळा घालतात, हें तर अविचारीपणाचे होय. पाहुणचारात साधेपणा असावा. कुटुंबातील गरजांकडील लक्ष आधस्थानी असावे. CChMara 220.10
पाहुणचारवृत्ति जेव्हां अवश्य व आशीर्वादमय होण्यासारखी असतें, तेथें किती काटकसर आणि दिखाऊ चालीरिती वारंवार आडव्या पडतात. आमची निर्यामत अन्नसामुग्री अशी असावी कीं, गृहिणीला विशेष खटपट न करिता अचानकपणे आलेल्या पाहण्याची अवस्था काहीं एक भार न पडता करण्यांत यावी. 7 CChMara 220.11
काटकसरीपणा म्हणजे कवडीचुंबकपणा नसतो, परंतु भारी ओझे पुढे असतांना खर्च करावयाचा तो चतुराईने करावयाचा असतो. CChMara 221.1
आरोग्याला आणि सुखसोईना खरोखरीच अवश्य लागणाच्या गोष्टी याची आपल्या लोकांना कमतरता पडावी असें देवाला वाटत नाहीं परंतु छांदिष्टपणा, उधळपट्टी आणि दिखाऊपणा त्याला आवडत नाहीं. 8 CChMara 221.2