कलीसिया के लिए परामर्श
मुलांना शिक्षण देण्याचें आईबापाचें कर्तव्य
त्यांच्याजवळ आहे त्या सर्वावर देवाचा हक्क असतो हें तुमच्या मुलांना शिकवा आणि हा हक्क कोणत्याही कारणें रद्द होऊ शकत नाहीं; त्यांना दिलेले सर्व कांहीं देवाची ठेव म्हणून आहे, त्यात त्यांच्या आज्ञाधारकपणाची कसोटीच आजमावली जाईल. पैसा हा अवश्य लागणारा साठा होय. ज्याची गरज नाहीं त्यावर उधळपट्टी करूं नये. संतोषाने द्यावयाच्या देणग्यांची कोणाला तरी गरज असतेच. तुमच्या अंगीं फाजील सवया असतील तर शक्य तितक्या लवकर त्या छेदून काढा. हें तुमच्याने झाले नाही तर तुम्ही कायमचे दिवाळखोर व्हाल. 9 CChMara 221.3
तारुण्याच्या ह्या वयात काटकसरीची निसर्गत: निष्काळजी व बेपरवाई केली जाते. तो एक चिक्कूपणा व अंकुचितपणा मानला जातो. अत्यंत थोर व सढळ धोरणाशी व मनोभावनाशी काटकसरीपणा अगदी सुसंगत असतो. व्यवहारात आणता येत नाही असल्या प्रकारचा खराखुरा उदारपणा असूच शकत नाहीं. काटकसरीपणाचे चिंतन करणे आणि अल्पस्वल्प गोष्टींचा साभाळ करण्याची तरतूद राखणे हें आपल्या इभ्रतीला शोभत नाहीं असें कोणीही समजू नये. 10 CChMara 221.4
नुसत्याच काल्पनिक कारभाराचा नव्हें तर आपले प्रत्यक्ष उत्पन्न काय व खर्च काय याचा बिनचूक हिशेब ठेवण्याचे प्रत्येक तरुणाला व मुलाला शिक्षण देण्यांत यावे, पैशांचा वापर करून त्याचा सदुपयोग करण्यांत येतो हें त्याला समजू द्या. आईबापाकडून मिळोत अगर त्यांच्या स्वत:च्या कमाईचे असोत मुलामुलींनी निवड करून आपापले कपडे, पुस्तकें व अवश्य त्या गोष्टी खरेदी करण्याचे शिकावे व बरोबर हिशेब ठेवावा. अशाप्रकारे पैशाचे मोल व महत्त्व त्यांना अन्य त-हेने न कळतां ह्याच मार्गाने तें समजून घेऊन शिकता येईल. 11 CChMara 221.5
मुलांना वेडगळपणाने मदत करावी अशी एक तन्हा आहे. दुसर्य कोणाची आर्थिक मदत घेऊन कोणी कोणी कॉलेजमध्ये शिकत असतात. परंतु कित्येकजण श्रम करून आपला कॉलेजचा खर्च भागवितात. यांना कॉलेजमधून मिळालेल्या सवलती मौल्यवान वाटतात कारण त्यांना त्याची किंमत ठाऊक असें. कंटाळवाणे ओझे होईपर्यंत मुलांना मदत देऊ नयें. CChMara 221.6
धर्मसेवक अगर डॉक्टर होण्यासाठी प्रकृतीने धट्टेकट्टे असतांना त्यांना मुबलक आर्थिक साह्य देण्याच्या कामीं आईबाप चूक करतात, कारण उपयुक्त अनुभव आणि परिश्रम करण्याचा अनुभवन त्यांना तत्पूर्वी मिळणे अवश्य असतें. 12 CChMara 221.7
बायकोच्या म्हणजे मातेच्या अंगीं चैनबाजीच्या, कोत्या विचाराच्या अगर अविचाराच्या संवया जर असतील तर त्यांचा परिणाम गृह-उत्पन्नावर निरंतर घडत असतो. तरी त्या मातेला असें वाटते कीं, मी करिते तें अगदी उत्तम आहे. याचे कारण असें कीं, आपल्या किंवा आपल्या मुलांच्या इच्छा आटोक्यात ठेवण्याचे तिला कधीच शिक्षण देण्यांत आलेले नसते व गृहकृत्यातील दक्षता तिला दाखविण्यांत आलेली नसते. यामुळे एकाद्या कुटुंबांच्या गृहकारभाराला जी रक्कम लागते तेवढीच दुसर्य कुटुंबाला दुपटीने लागते. CChMara 221.8
उधळ्या स्वभावामुळे कोणकोणते अनिष्ट परिणाम घडून येतात तें दाखवून देण्याची प्रभूने मजवर कृपा केलेली आहे. त्यामुळे आईबापांनी आपल्या मुलास सक्त काटकसरी जीवन जगण्यास शिकवावे अशी मी आईबापांना ताकीद देत आहे. गरज नसता पैशाचा व्यय करणे हा दुरुपयोगच होय. 13 CChMara 222.1