कलीसिया के लिए परामर्श
“कोणाचे ऋणी असूं नका”
पैसा हातीं आला कीं तो खचून टाकावा, यामुळे पुष्कळ गरीब कुटुंब गरिबींतच खितपत पडतात. CChMara 220.2
पैसा मिळविण्यापूर्वीच तो कोठून तरी काढावा व कोणत्याही कारणें खर्ची घालावा, हें एक फसविणारे जाळेच आहे. 3 CChMara 220.3
पवित्रशास्त्राप्रमाणे ख्रिस्ती म्हणविणार्यमध्ये कडक सचोटी असावी अशी जगाची अपेक्षा असतें. एखादा मनुष्य आपले योग्य तें दण द्यावयाची बेपरवाई करितो तेव्हां आमची सर्वच मंडळी बेभरवंशी अशी गणण्याचा संभव असतो. CChMara 220.4
धार्मिकतेची आढ्यता बाळगणार्यनी धार्मिकतेला शोभेल असेच वर्तन ठेवावे आणि आपल्या अविचारी वर्तनाने सत्याला काळिमा लागेल असा त्यानें प्रसंग आणू नये. “कोणाचे ऋणी असू नका” असें प्रषिताचें सागणें आहे. 4 CChMara 220.5
प्राप्तिपेक्षा कमी खर्चात जगण्याची पुष्कळांनी तालीमच घेतलेली नाही. परिस्थितीनुरुप कारभार करण्याचे तें शिकूनच घेत नाहींत. उसन्यावर उसने पुन: पुन: घेतच राहावे व परिणामी असें घडून येते कीं, तें कर्जाखालीच अधीर व नाउमेद असें होऊन जातात. 5 CChMara 220.6
कर्जांत न पडता कारभार करण्यांत यावा हें तुम्ही पाहन घेतले पाहिजे. कोणी कर्जाच्या आहारी गेला कीं आत्म्यांचा नाश करणार्य सैतानाच्या जाळ्यांत तो आडकलाच असें समजावें. CChMara 220.7
कर्ज पुन: म्हणून करावयाचेच नाहीं असा मनाचा निर्धार करा. हजार गोष्टी न मिळाल्या तरी पुरवले. परंतु कर्ज म्हणून नको. देवीगोवरापासून जसे आम्ही दूर पळून जातो, तसेच कर्जापासून दूर राहा. 6 CChMara 220.8