कलीसिया के लिए परामर्श

130/318

प्रकरण २७ वें - पति किंवा पत्नी यांची निवड

विवाहाद्वारें या जगांतील व येणार्‍य जगांतील तुमच्या जीवनावर परिणाम घडेल व छाप पडेल. CChMara 176.1

देवाच्या पसंतीशिवाय आस्थेवाईक ख्रिस्ती या संबंधीचे आपले संकल्प ठरविणार नाहीं. तो आपली स्वत:चीच निवड करणार नाही तर ती देवाची निवड असावयास पाहिजे. आम्ही स्वत:लाच खूष करणार नाही. कारण ख्रिस्ताने तसे केले नाही. ज्याच्यावर अगर जिच्यावर आपले प्रेम नाहीं अशाशी विवाहबद्ध व्हावे असा मी अर्थ करते असा मजविषयी कोणी समज करून घेऊ नये. हें तर पाप होईल. परंतु वरपंगी कौतुक आणि भावनात्मक स्वभाव नाशास कारणीभूत होऊ देऊ नये. संपूर्ण अंत:करणाने आणि उत्कृष्ट आवडीने हा संबंध घडून यावा अशी देवाची इच्छा असते. CChMara 176.2

आपण जें गृह स्थापन करूं इच्छितों त्याचे स्वरूप व त्याचा वजनदारपणा कसा काय होईल याविषयी विवाहाच्या चिंतनात जे आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. पिता व माता होतांना त्यांच्याजवळ एक पवित्र ठेव ठेवण्यात येते. या जगांत आपल्या मुलांचे होणारे हित व भावी जगांत त्यांना लाभणारे सुख ही फार मोठ्या प्रमाणात आईबापांवर अवलंबून असतात. त्या लहान बालकांवर शारीरिक व आत्मिक दृष्टीने कसा छाप पडतो हें पुष्कळ अंशीं आईबापावर अवलंबून आहे. समाजाची उन्नति किंवा अवनीति गृहाच्या बनावटीवर आणि प्रत्येक कुटुंबाच्या वजनावर अवलंबून असते. CChMara 176.3

मैत्री बनविण्यात आणि जोडीदाराची निवड करण्यांत ख्रिस्ती तरुणांनी मोठी काळजी घ्यावयास पाहिजे. आता तुम्हांला जें शुद्ध सोने दिसते, तें कथील निघू नये ह्याकडे लक्ष द्या. तुमच्या देव-सेवेच्या मार्गात जगत व्यवहारसंबंध अडखळणे करूं शकतील; अविचाराच्या ऐक्याने पुष्कळांचा व्यवहारात व विवाहबद्धतेत घात झालेला आहे; यामुळे कोणी मोठेपणाला अगर थोरपणाला कदापि चढू शकत नाहीं. CChMara 176.4

ज्याच्याशी विवाहबद्ध होऊन आपल्या आयुष्याचा शेवट होणार आहे. अशाच्या प्रत्येक विचारलहरीकडे व शीलसंवर्धनाकडे लक्ष द्या. जी गोष्ट करण्यासाठी तुम्ही पाऊल टाकीत आहां, ती तुमच्या जीवितांत अत्यंत महत्त्वाची असून ती करण्याची घाई करूं नका. प्रीति करीत असतांना ती आंधळी प्रीति असतां कामा नये. CChMara 176.5

आपलें वैवाहिक जीवन सुखाचे किंवा बेबनावाचे अगर लाचारीचें होईल कीं काय याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. हें ऐक्य माझ्या स्वर्गीय दृष्टीला साहाय्यभूत होईल का? यामध्यें माझी देवाविषयींची प्रीति वृद्धिंगत होईल का? याकडून या जीवनांतले सेवाक्षेत्र वाढत राहील का? हें प्रश्न तुमच्या मनांत येऊ द्या. यासंबंधी मनात जर कांही शंकाकुशंका निर्माण झाल्या नाहींत तरच मग देवाचे भय धरून पुढे पाऊल टाका. CChMara 176.6

आपल्या आयुष्यातील सोबत्याची अशी निवड करण्यांत यावी कीं आईंबाप व मुलें यांच्यासाठी ती शारीरिक, मानसिक व आत्मिकदृष्ट्या हितावह अशीच होईल. तिच्यामुळे उभय आईबाप व मुलें आपल्या समाजासाठीं आशीर्वाद आणि आपल्या उत्पन्नकर्त्यासाठीं भूषणावह अशी होतील. CChMara 177.1