कलीसिया के लिए परामर्श

129/318

ख्रिस्ताच्या द्वितीयागमनाविषयीं स्मरण निवेदन

ते भोजनाच्या मेजासभोंवार एकत्र झाले असतां हृदयद्रावक वाणीने तो त्यांस म्हणाला, मीं दु:ख भोगण्यापूर्वी हें वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावयाची माझी फार उत्कट इच्छा होती; कारण मी तुम्हांस सांगतों कीं देवाच्या राज्यांत हें पूर्ण होईपर्यंत मी हें भोजन पुन: करणार नाहीं. मग प्याला स्वीकारून व ईशोपकारस्मरण करून तो म्हणाला, हा घ्या, आणि आपणांत ह्याची वाटणी करा; मी तुम्हांस सांगतों कीं देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाहीं.” (लूक २२:१५-१८) CChMara 173.5

परंतु सहभागितेची उपासना खेद करण्याची वेळ नसते. तसा तिचा उद्देशही नसतो. मेजाभोंवती प्रभूचे शिष्य एकत्रीत झाले असतां त्यांनी आपल्या उणेपणाची आठवण करून कष्टी होण्याचे कारण नाही. त्याचा जुना धार्मिक अनुभव उत्तेजनाचा असो वा निराशेचा असो त्यावर त्यांनी विचार करावयाचा नाहीं, आपल्या बंधु-वर्गाशी त्यांचे कांही मतभेद असतील तर त्यांचीही त्यांनी आठवण करावयाची नाह पूर्वतयारीमध्ये या सर्वांचा समाचार घेण्यात आलेला असतो. आत्मपरिक्षण, पापाची कबुली, मतभेदाचे निवारण ह्या सर्व गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. CChMara 174.1

आतां ते ख्रिस्ताला भेटावयास येत आहेत. क्रूसाच्या सावलीत नव्हें तर तारणाच्या प्रकाशात त्यांना उभे राहावयाचे आहे. धार्मिकतेचा सूर्य यांच्या झळकणाच्या किरणांत त्यांनी आपलीं मने उघडी करावयाची असतात. ख्रिस्ताच्या अत्यंत मौल्यवान् रक्तानें अंत:करणे शुद्ध करून व जरी तो अदृश्य असला तरी त्याच्या समक्षतेची पूर्ण जाणीव धरून “मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो; आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांस देत नाहीं.” (योहान १४:२७) हें त्याचे शब्द त्यांनी ऐकावयाचे असतात. CChMara 174.2

ख्रिस्ताच्या मोडलेल्या शरीराचे व साडलेल्या रक्ताचे चिन्ह म्हणून आम्ही भाकर व द्राक्षारस घेतो तेव्हां आपल्या कल्पना शक्तीने वरच्या खोलीत आपण त्याच्या सहवासात जाऊन बसतों. ज्याने सर्व जगताची पापें वाहिली, त्याच्या दु:ख वेदनांनी समर्पित केलेल्या बागेतून जणू काय आपण चालत आहो. आमचा व देवाचा समेट ज्या कष्टान त्यानें घडवून आणिला तें आम्हांला दिसत आहेत. वधस्तभावर खिळलेला ख्रिस्त आम्हासमोर उभा आहे. CChMara 174.3

वधस्तभावर खिळलेल्या उद्धारकाकडे पाहाताना स्वर्गीय राजाने केलेल्या स्वार्पणाची थोरवी व त्याचा अर्थ आम्हांला अधिक पूर्णपणे समजून येतो. तारणाची योजना आम्हांपुढे गौरविली जाते आणि कॅल्व्हरीच्या विचाराने आमच्या अंतर्यामातील जिवंत व पवित्र भावना जागृत होतात. आमच्या अंतर्याम आणि ओठांवर देवाची व कोंकर्‍यची स्तुति वास करील; कारण कॅल्व्हरीची दृश्ये ज्यांच्या स्मरणांत ताजीतवानी असतात त्याच्यात अहंकार व आत्मप्रतिष्ठा बळावू शकत नाहींत. CChMara 174.4

ज्या वेळी विश्वास आमच्या प्रभूच्या महान् स्वार्पणाचे चिंतन करितो तेव्हां अंतर्यामात ख्रिस्ताची धार्मिकता रुजू लागते. प्रत्येक सहभागितेच्याद्वारे आत्म्याला (अंत:करणाला) आत्मिक सामर्थ्य लाभेल. उपासनेकडून जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो व त्याच्याद्वारे विश्वासणारा ब्रिस्ताशीं तसाच पित्याशी मिळून जातो. अवलंबी मानवतेचा व देवाचा विशेष तन्हेने संबंध जुळून येतो. CChMara 174.5

ख्रिस्ताच्या द्वितीयगमनाकडे सहभागितेच्या उपासनेचा रोख असतो. शिष्याच्या मनात ती आशा जागृत ठेवावी याकरिता तिची योजना केलेली होती ज्या ज्या वेळी त्याच्या मरणाच्या स्मरणार्थ तें एकत्र होत त्या त्या वेळी त्यानें जे म्हटले त्याची तें आठवण करीत: “त्यानें प्याला घेतला व ईशोपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यांतील प्या हें माझे नव्या कराराचे रक्त आहे; हें पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरितां ओतिले जात आहे. मी तुम्हांस सागतों कीं मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हांबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाहीं.” (मत्तय २६:२७, २९) त्यांचा छळ होत असतां प्रभूच्या परत येण्याच्या आज्ञेमध्ये त्यांना समाधान आढळून येई त्याच्या पुढे जो अवर्णनीय मौल्यवान् विचार असें तो हाकी, “जितकेदा तुम्ही ही भाकर खाता, व हा प्याला पिता तितकेदां तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.” (११:२६). 2 CChMara 174.6

ह्या गोष्टी आम्हीं कदापि विसरता कामा नये. जोरदार सामर्थ्याची ती येशूची प्रीति आमच्या आठवणींत तरतरीत ठेवायाची असतें. देवाची प्रीति आमच्यावतीने व्यक्त केली जावी म्हणूनच ख्रिस्ताने प्रस्थापित केलेला हा विधि आमच्या ज्ञानेंद्रियांशी बोलत आहे. ख्रिस्तविरहित आमच्या आत्म्यांत व देवांत ऐक्य होऊ शकत नाहीं. ऐक्य आणि बंधूमधील प्रेम भरभक्कम केले पाहिजे व तें ख्रिस्ताच्या प्रेमाने निरतरचे असें झाले पाहिजे. ख्रिस्ताच्या मरणाशिवाय त्याची आम्हांवरची प्रीति कार्य साधक होऊ शकत नाही. त्याच्या मरणामुळे मात्र त्याच्या द्वितीयागमनाकडे आनंदयुक्त दृष्टीने आम्ही पाहूं शकतो. त्याचे स्वार्पण आमच्या आशेचे केंद्रस्थान होय, यावरच आमचा विश्वास आधारिला पाहिजे. 2 CChMara 175.1

****