कलीसिया के लिए परामर्श
अपेक्षित पत्नीच्या अंगच्या गुणांचे संशोधन
आपल्या खांद्याला खांदा देऊन जीवनचरित्रांतील स्वत:चा भार वाहाण्यास जी पात्र आहे, जिच्या सहवासामुळे आपल्या थोरपणांत व माणुसकींत वाढ होईल आणि जी आपल्या प्रेमाने आपणास सुखसमाधान देईल अशाच पत्नीचा तरुण माणसाने शोध करावा. CChMara 177.2
“सूज्ञ स्त्री हें प्रभूपासून एक दान असतें, “तिचा नवरा तिच्यावर निर्धास्तपणे भरवंसा ठेवितो. ती आपल्या संबंध आयुष्यांत आपल्या पतीचे हितच करील, अहित करणार नाही.” तिच्या तोंडातून सूज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायीं दयेचे शिक्षण असतें ती आपल्या पतीच्या आचारविचाराकडे लक्ष देते व आळशी बसून अन्न खात नाहीं तिची मुलें उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराहि उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, “बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत. ज्याला अशी पत्नी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.” CChMara 177.3
पुढीलप्रमाणें कांही विचारणीय गोष्टी आहेत : जिच्या तुम्ही विवाहबद्ध व्हाल ती तुमच्या गृहाला सुखसंपन्न करील काय? ती काटकसरी असेल का? किंवा लग्न झाल्यावर आपल्या जवळचे आहे नाहीं तें खचून आपल्या ढंगाच्या तृप्तीसाठी व आपल्या सौंदर्याच्या दिखाऊपणासाठी तुम्हां जवळचे सर्व कांहीं उधळून टाकील? या प्रकरणी तिची व्यवहारनीति ठाकठीक आहे का ? अवलंबून राहाता येईल असें काहीं तिच्याजवळ आहे का? मला ठाऊक आहे कीं ज्या पुरुषांचे मन प्रेमामुळे व लग्नसंबंधीच्या विचारामुळे मस्त झालेले आहे, तो असले प्रश्न कांही उपयोगाचे नाहींत म्हणून झुगारून देईल, पण तसे न करिता त्यांचा त्याच्या भावी चरित्रावर परिणाम घडणार म्हणून त्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. CChMara 177.4
पत्नीची निवड करितांना तिच्या शीलाचा अभ्यास करा. शांत वृत्तीची व कष्टाळ अशी ती बनेल का? किंवा जेव्हां तुमच्या आईबापांना आपल्या सबळ पुत्रावर अवलंबून राहाण्याची आवश्यकता आहे अशा ऐनवेळी त्यांच्याविषयी ती बेपवाई राहील का? नवर्यला त्यांच्या सहवासांतून दूर करून आपल्याच लहरीप्रमाणे व आपल्याच सुखासाठी विचार-योजना करीत राहील का? एक प्रेमळ मुलगी लाभण्याऐवजी आपला मुलगाहि नाहींसा झाला अशी अवस्था आईबापांची करून टाकील का ? CChMara 177.5