कलीसिया के लिए परामर्श
पूर्वतयारीचा विधि
सहभागितेच्या उपासनेची पूर्वतयारी कशी करावयाची हें ख्रिस्ताने नेमून दिलेले आहे. ज्या अंत:करणात अहंकार, बेबनाव व बडेजावपणाची धडपड चाललेली असतें अशा अंत:करणाला ख्रिस्तांशी सहभागिता करता येत नाही. अशा अवस्थेत त्याच्या शरीराची व रक्ताची सहभागिता करण्यास आम्ही तयार नसतो म्हणून ख्रिस्ताने जी विलीनता धारण केली तिचे स्मारक म्हणून प्रथमत: ती विलीनता अंगीं यावी ही येशूची योजना होती. CChMara 172.3
या विधीसाठी येत असताना आमच्या जीवनचरित्राचा प्रभू व गौरवी स्वामी याचे शब्द देवाच्या लोकांनी ध्यानात आणावे. “तुम्हांस काय केले हें तुम्ही समजलां का? तुम्ही मला गुरु वे प्रभु असें संबोधन देता, आणि तें ठीक देता ! कारण मी तसाच आहें यास्तव जो मी प्रभु व गुरु, त्या मीं तुमचे पाय धुतले. तर तुम्हीही करावें म्हणून तुम्हांस कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हांस खचीत खचीत सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाहीं; आणि पाठविलेला पाठविणाच्यापेक्षा थोर नाही; या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहा” (योहान १३:१२५१७). CChMara 172.4
आपल्या बांधवांपेक्षा आपण अधिक श्रेष्ठ आहों अशी कल्पना करावी, स्वार्थासाठीच धडपडत राहावे व बहुमानाची जागा असावी असली विचारसरणी मानवी स्वभावात आढळून येते. याचा वारंवार असा परिणाम होतो कीं त्याची वृत्ती कुत्सितपणाची व मन कडू होऊन जाते. गैरसमज आहेत. असले गैरसमज झुगारून द्यावेत, स्वार्थबुद्धि टाकून द्यावी, आत्मप्रतिष्ठेची हांव सोडून द्यावी आणि अंत:करणाच्या नम्रबुद्धिने आपल्या बांधवांच्या सेवेसाठी प्रवृत्त व्हावे म्हणून प्रभु भोजनाच्या पूर्वी नम्रतेचा संस्कार घालून दिलेला आहे. CChMara 173.1
आम्हांला आत्मनिरीक्षण करता यावे, पापाविषयी आम्हांला खात्री पटावी व पापक्षमतेबद्दल जें दिव्य अभिवचन देण्यांत आलेले आहे तें आम्हांस कळून यावे म्हणून स्वर्गीय संरक्षक या वेळी हजर असतो. स्वार्थी मार्गातून वाहवत जाणार्या विचारलहरी बदलून टाकण्यासाठीं खिस्त आपल्या संपूर्ण कृपेसह तेथें उपस्थित असतो जे आपल्या प्रभूचा कित्ता गिरवितात त्यांच्या चैतन्यशक्तीला पवित्र आत्मागति देतो. तारणान्याच्या विनम्रतेविषयी जसजसे आम्हांला स्मरण येईल तसतशी विचारांची परंपरा वाढत राहील; देवाच्या महान् चांगुलपणाच्या आठवणी आणि आमच्या ऐहिक मित्राचे उपकार व त्यांची प्रेमळता यांच्या आठवणी यांची एक शृखलाच पुढे उभी राहील. CChMara 173.2
ज्या ज्या वेळी हा संस्कार यथायोग्य पाळण्यात येतो त्या त्या वेळी देवाच्या लोकांना पवित्र सहवास लाभतो व परस्परांस साह्य व आशीर्वाद देण्यास तें सिद्ध होतात. नि:स्वार्थी सेवेसाठी आपल्या जीविताचा उपयोग करण्यांत यावा असा तें (करार) निर्धार करतात. हें केवळ परस्परविषयींच मर्यादित नसते. तर त्याच्या सेवेचे क्षेत्र त्याच्या स्वामीप्रमाणेच विस्तीर्ण असें असतें. आमच्या सेवेची गरज असलेले लोक जगभर आहेत. गरीब, निराधार, अज्ञानी लोक चोहोकडे आहेत. वरच्या खोलींत ज्यांनी ख्रिस्ताची भेट घेतली तें त्याच्याप्रमाणे सवसाठी पुढे सरसावतील. CChMara 173.3
सवानी येशूची सेवा करावी पण तोच येशु सर्वांचा सेवक होण्यासाठी आला. त्यानें सवाँची सेवा केल्यामुळे सर्वच त्याची पुन: सेवा करितील व त्याला आदर देतील, त्याच्या देवी गुणधर्मात जे विभागी होऊ पाहातात वे आत्म्याचे तारण पाहन त्याला होणाच्या आनंदात जे सामील होऊ पाहातात, त्यांनी त्याच्या नि:स्वार्थी सेवेचा कित्ता गिरविला पाहिजे. CChMara 173.4