कलीसिया के लिए परामर्श

122/318

प्रार्थनेंत अधिक स्तुति

“ज्याला श्वास आहे तो प्रत्येक प्राणी परमेश्वराची स्तुति करो.” आपल्यापैकी कोणी कधीं विचार केली आहे का कीं आपण किती उपकारिक असले पाहिजे? आपल्याला स्मरते का कीं, प्रभूची दया प्रत्येक सकाळीं नवीन असतें आणि त्याचा विश्वासूपणा ढळत नाहीं. त्याजवरील आपलें अवलंबून राहाणे आपण ओळखतो कार्य व त्याच्या सर्व दयेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत काय ? उलटपक्षी आम्ही नेहमी विसरतों कीं, प्रत्येक चागली देणगी व प्रत्येक पूर्ण देणगी वरून आहे व ती प्रकाशाच्या पित्यापासून येते.” CChMara 164.3

जे कोणी निरोगी आहेत तें कितीदा विसरतात कीं, त्याची अद्भुत दया रोज रोज व वर्षानुवर्षे त्यांच्याकरता आहे. तें देवाला स्तुति अपत नाहींत. पण जेव्हां आजार येतो तेव्हां देवाची आठवण होतें. बरे होण्याची इच्छा धरून तें प्रार्थना करतात आणि हें बरोबर आहे, देव आपल्या निरोगीपणांत जसा आश्रय आहे तसा तो आजारातहि असतो. पण पुष्कळजण त्याजकडे आपली बाब आणीत नाहींत. तें स्वत:विषय काळजी करून अशक्तपणा व रोग ओढवून घेतात. जर तें झुरण्याचे थांबवितात व निराशा व दु:ख टाकून देतील तर त्यांचे बरे होणे खात्रीपूर्वक आहे. त्यांना किती काळ आरोग्य लाभले आहे याबद्दल कृतज्ञ बनून लक्षात ठेवावें आणि जर हा मौल्यवान् आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांनीं विसरू नये कीं, तें त्यांच्या निर्माणकर्त्यांचे आभारी आहेत. जेव्हां दहा कोडी बरे झाले, फक्त एकच येशूचा शोध करीत मागें आला व त्यानें त्याला गौरव दिले. म्हणून अविचारी नऊ माणसाप्रमाणे होऊ नये. कारण त्यांची अंत:करणे देवाच्या दयेने स्पर्शिली नव्हतीं. 3 CChMara 164.4

अपेक्षिलेल्या वाईट कृत्यावर खत करीत बसणे शहापणाचे नसून ख्रिस्ती वागणुकीला धरून नाहीं, याकडून आम्ही हल्लांचे आशीर्वाद घेण्यास व संधीचा फायदा घेण्यास चुकतो. आजचे कर्तव्य करण्याबद्दल प्रभूची मागणी आहे व त्याकडून येणारी सकटें सोसणे याची मागणी आहे. आम्ही शब्दाने व कृतीने त्याचा अपमान करूं नये म्हणून सावध असावे. आज आम्हीं देवाची स्तुति करावी व त्याला मान द्यावा. आज जिवंत विश्वास धारण केल्याने शत्रूला जिंकणार आहों. आम्ही देवाचा शोध करावा व त्याची समक्षता मिळाल्याशिवाय संतुष्ट राहूं नये. आम्हीं सावध राहून प्रार्थना करावी व कार्य करावे असें कीं, हाच शेवटला दिवस आहे व तो आम्हांला दिलेला आहे. किती उत्सुक वे निश्चित् असें आपले आयुष्य होईल आणि आम्हीं शब्दाने व कृतीने येशूचे अनुयायी होऊं. CChMara 164.5