कलीसिया के लिए परामर्श

121/318

सार्वजनिक प्रार्थना लांबलचक नसाव्या.

ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना असें शिकविले कीं त्यांच्या प्रार्थना लांबलचक नसाव्या. फक्त त्यांना जे पाहिजे तेच मागावे व दुसरे कांहीं मागू नये. प्रार्थना किती लांब असावी व कशी असावीं में तो सांगतो. व्यवहारिक व आत्मिक आशीर्वादाविषयी त्यांची इच्छा सांगितली जावी व त्यासोबत कृतज्ञताहि प्रगट करावी. किती नमुनेवाईक ही प्रार्थना! सर्व गरजांचा त्यात समावेश होतो. सर्व साधारण प्रार्थनेसाठी दोन किंवा तीन मिनिटे पुरे आहेत. कधीं कधीं विशेष प्रकारे प्रार्थना देवाच्या आत्म्याने सांगितलेली असतें. आत्म्याने त्याकरता विर्भात केलेली असतें. उत्कंठा लागलेला आत्मा दुःखाच्या वेदनाने कण्हतो. याकोबाप्रमाणे आत्मा झगडतो. देवाच्या विशेष सामर्थ्याच्या प्रगटीकरणाशिवाय विसावा पावणार नाहीं. हें देवाच्या इच्छेनुसार आहे. 2 CChMara 163.3

पण पुष्कळजण उपदेशाप्रमाणे कंटाळवाण्या प्रार्थना करतात. ह्या प्रार्थना देवाला नसून मनुष्याला असतात. जर तें देवाची प्रार्थना करतील व तें काय करीत आहेत हें नक्की त्यांना समजले, तर त्यांच्या धाडसाविषयीं इशारा मिळेल. कारण तें प्रार्थना स्वरूपांत प्रभूला माहिती सांगतात. जणू काय जगांतील गोष्टीचे सार्वजनिक प्रश्नांची माहिती या विश्वाच्या निर्माणकर्त्याला हवी आहे. अशा प्रार्थना झणझणणारी झांझ व वाजणारी थाळीप्रमाणे आहे. त्या स्वर्गात लिहिल्या जात नाहींत. देवाच्या दृतांना त्यांचा कटाळा येतो. CChMara 163.4

येशू ख्रिस्त सतत प्रार्थना करीत असें. आपल्या स्वर्गीय पित्याला आपल्या विनंत्या कळविण्यासाठीं तो जंगलात व डोंगरावर जाई. जेव्हां दिवसाचे काम व काळजी सपे व थकलेले विसावा पावत, तेव्हां येशूनें प्रार्थनेसाठी वेळ वेगळा केला. आम्ही प्रार्थनेच्या बाबतीत निराशा करीत नाही. कारण फार थोडी प्रार्थना केली जाते. आत्म्याने व समजूतदारपणे फार थोड्या प्रार्थना करण्यांत येतात. अखंड व परिणामकारक प्रार्थना कटाळा आणीत नाहीं. पण ती योग्य असतें ज्यांना भक्ति प्रिय आहे अशांना प्रार्थना गोडी लावते व ताजेतवाने करते. CChMara 164.1

गुप्त प्रार्थनेचा कंटाळा केला जातो आणि म्हणूनच लांबलचक, कंटाळवाणी व अयोग्य अशी प्रार्थना करतात व देवाची भक्ति करतात. एक आठवड्यामागे पडलेल्या कार्यासाठी आपल्या प्रार्थनेत पुन: पुन: बोलून या माघाराबद्दल कबूल करतात. देवाची मर्जी संपादन करण्यासाठी तें प्रार्थना करतात. पण पुष्कळदा अशा प्रार्थनाकडून त्याची मनें आत्मिक अंधारात खालच्या दर्जाला जाऊन पोहचतात. जर ख्रिस्ती लोक सावध राहाण्यांत व प्रार्थनेत ख्रिस्ताची शिकवण आपल्या घरीं नेतील तर तें देवाच्या भक्तींत अधिक चतुर बनतील. CChMara 164.2