कलीसिया के लिए परामर्श
लहानसहान गोष्टींत देवाची आवड
ज्यांना प्रार्थनेची संधि पसंत पडते व ती वाढविण्याच्या बाबतींत काळजी घेतात असें थोडे आहेत. आम्हीं येशूकडे जाऊन आमची गरज कळविली पाहिजे. आमची काळजी, त्रास व संकटे त्याला सागावी. जे कांहीं आपल्याला अडखळण वाटेल तें सर्वं प्रार्थनेत प्रभूकडे न्यावे. प्रत्येक पावलाला आम्हांला गरज आहे असें जेव्हां आम्हांला वाटते त्यावेळीं सैतान थोडी संधि साधून मोह घालण्याचा प्रयत्न करील. ही त्यांची नित्याची खटपट आम्हांला आमच्या सहानुभूति दर्शविणाच्या मित्रापासून दूर राखण्याची आहे. आम्हीं ख्रिस्ताशिवाय कोणावरही भरवसा ठेऊ नये. जे आमच्या अंत:करणात आहे तें सर्व सुरक्षितपणे आपण त्याला कळवू शकतों. CChMara 165.1
भावाबहिणींनों, जेव्हां तुम्ही सार्वजनिक प्रार्थनेला जमता तेव्हां येशू तुम्हांला भेटतो असा विश्वास धरा व तो तुम्हांला आशीर्वाद देऊ इच्छितो हाहि विश्वास धरा. स्वत:पासून दृष्टि काढून घ्या व येशूकडे पाहा, त्याच्या अतुल प्रीतिविषयी बोला. त्याच्याकडे पाहाण्याकडून तुम्ही त्यासारखे व्हाल. जेव्हां तुम्ही प्रार्थना करतो तेव्हां थोडक्यात करा. मुद्देसूद करा. तुमच्या लांबलचक प्रार्थनेत प्रभूला उपदेश करूं नका. एखादें मूल आपल्या बापाजवळ भाकर मागते तसे तुम्ही जीवनी भाकर मागा. जर आम्ही विश्वासाने व साध्या रीतीनें प्रभूजवळ मागू तर आम्हांला हवा असणारा आशीर्वाद तो देईल. CChMara 165.2
प्रार्थना ही आत्म्याचा व्यायाम आहे. ती प्रामाणिकपणाची असावी. तद्वतच उत्सुकतेची असावी व नवीन अंत:करणातील देवाच्या समक्षतेत साध्य केलेली असावी. जेव्हां प्रार्थना करणाच्याला मी दैवी समक्षतेत आहे असें वाटेल तेव्हां स्व निघून जाईल. त्याला मानवी देणगीची उपयोग करण्याची इच्छा राहाणार नाहीं. तो मनुष्याला आवडणाच्या गोष्टी करणार नाहीं, पण आत्म्याला लागणारा आशीर्वाद मिळवील. 4 CChMara 165.3
सार्वजनिक व वैयक्तिक प्रार्थनेत प्रभूच्यापुढे गुडघे टेकण्याची आपल्याला मोठी संध आहे. त्यावेळी आपण आपली विनंति त्याला कळवावी. येशू आमचा कित्ता त्यानें गुडघे टेकून प्रार्थना केली. (लूक २३:४१) त्याच्या शिष्याविषयी सुद्धा लिहिले आहे कीं, त्यांनी सुद्धा गुडघे टेकून प्रार्थना केली. (प्रेषित ९:४०; २०:३६; २१:५.) पौलाने म्हटले, “आपण प्रभु येशू ख्रिस्तांचा पिता याजपुढे मी गुडघे टेकतों.” (इफि ३:१४) इस्राएलांचे पाप देवापुढे कबूल करतांना एज्रानें गुडघे टेकून प्रार्थना केली. (एज्रा ९:५ पहा) दानिएलाने गुडघ्यावर उभा राहून दिवसातून तीनदां प्रार्थना केली व देवाचे उपकार स्मरण केले. (दानि. ६:१०). 5 CChMara 165.4
****