कलीसिया के लिए परामर्श

120/318

प्रकरण २४ वें - प्रार्थनेची सभा

प्रार्थनेची सभा भरविण्यात येणार्‍य सभेत अति मनोरंजक सभा असावी, पण ही गोष्ट नेहमी योग्य रीतीने केली जात नाहीं. पुष्कळजण उपदेश ऐकावयास हजर राहातात, पण प्रार्थनेच्या सभेविषयीं निष्काळजीपणा करतात, येथे विचाराची गरज आहे. देवाच्या ज्ञानाचा शोध करावा आणि सभा भरविण्याची अशी योजना करावी कीं, त्या मनोरंजक व आकर्षक होतील. लोक जीवनी भाकरीची अपेक्षा करतात. जर त्यांना प्रार्थनेच्या सभेत ती मिळेल तर ती घेण्यास तेथें जातील. CChMara 163.1

लांबलचक व रेंगाळणारे भाषण आणि प्रार्थना या कुठेही उपयोगाच्या नाहींत. विशेषेकरून सामाजिक सभेत उपायोगाच्या नाहींत. जे कोणी धैर्यवान् व बोलण्यास सतत तयार असतात अशांना बोलण्याचा प्रसंग दिल्यामुळे जे भित्रे व लाजाळू आहेत त्यांची मुष्कटदाबी होतें. जे कोणी अति वरपगी आहेत तें जास्त बडबड करणारे असतात. त्याच्या प्रार्थना लांबलचक व यांत्रिक असतात. जे ऐकतात अशा दूतांना व लोकांना तें कंटाळा आणतात. आमच्या प्रार्थना थोडक्यात व मुद्देसूद असाव्या. लांब व कंटाळवाण्या प्रार्थना एकांति कराव्या. देवाच्या आत्म्याला तुमच्या अंत:करणात घ्या म्हणजे कंटाळवाण्या रीति घालवून दिल्या जातील. 1 CChMara 163.2