कलीसिया के लिए परामर्श

119/318

शेवटपर्यंत पवित्र आत्मा वस्ती करील

ख्रिस्तानें म्हटले आहे कीं, आत्म्याचे दैवी वजन शेवटापर्यंत त्याच्या अनुयायांबरोबर असणार. पण हें वचन जसे मानावे तसे मानण्यात येत नाही. म्हणून त्याची पूर्णता जशी व्हावी तशी होत नाहीं. पवित्र आत्म्याच्या वचनाविषयी फार थोडा विचार करण्यांत येतो आणि त्याचा परिणाम असा होतो कीं आत्मिक अंधार, आत्मिक कमतरता, आत्मिक व्हास व मरण ओढवते. लहान सहान गोष्टींत मन गुंतले जाते व मंडळीच्या वाढीप्रीत्यर्थ व भरभराटीसाठी आवश्यक असणारे दैवी सामर्थ्य व ज्याद्वारे सर्व आशीर्वाद प्राप्त होतील याची कमतरता आहे. तरी त्यांची अमर्याद तरतूद करण्याचे वचन दिले आहे. CChMara 161.2

पवित्र आत्म्याच्या गैरहजेरीमुळे सुवार्ता निर्बल होतें. विद्वता, देणगी, वक्तृत्त्व, प्रत्येक उपजत किंवा मिळविलेली देणगी, आपल्याला असतील. पण देवाच्या आत्म्याच्या समक्षतेशिवाय कोणत्याहि अंत:करणाला स्पर्श होणार नाहीं व ख्रिस्ताकरता कोणी जिंकला जावयाचा नाहीं. उलटपक्षी तें जर ख्रिस्ताशीं संयुक्त झाले आहेत व आत्म्याला देणग्या त्यांना मिळाल्या आहेत तर गरीब व अडाणी अशी त्या शिष्यांना त्याचे सामर्थ्य मिळेल. देव त्यांना जगांत श्रेष्ठ वजन पाडण्यास लागणारे साधन बनवील. CChMara 161.3

देवाकरतां लागणारा आवेश याद्वारें शिष्य सत्याची साक्ष देण्यास महान सामथ्र्यानं तयार झाले. क्रुसी दिलेला ख्रिस्त यांच्या तारणदायी प्रीतीची गोष्ट सांगण्यास आम्ही निश्चयपूर्वक आमचीं अंत:करणे आवेशाने भरून टाकणार नाही का? आमच्या कळकळीच्या व अखंड प्रार्थनेचे उत्तर म्हणून देवाचा पवित्र आत्मा येणार नाहीं का वे मनुष्यांना त्याच्या सेवेप्रीत्यर्थ सामर्थ्याने भरणार नाही का? मग मंडळी इतकी दुर्बळ व आत्माहीन का आहे ? 4 CChMara 161.4

जेव्हां आपल्या सभासदांची मने पवित्र आत्म्याच्या ताब्यात जातील तेव्हां आमच्या मंडळ्यांत आज आहे त्यापेक्षा अधिक भाषण, सेवा व आत्मिकपणा याचा उच्च दर्जा दिसून येईल. मंडळीचे सभासद जीवनी पाण्याने ताजेतवाने होतील. ख्रिस्ताच्या हाताखाली काम करणारे कामकरी आपल्या वृत्तींत, शब्दांत, कृतींत आपल्या धन्याला दर्शवितील व ज्या कार्यात आम्ही गुंतलो आहो त्या शेवटच्या महान कार्यात पुढे जाण्यास एकमेकांस उत्तेजन देतील. ऐक्य व प्रेम यांचे उत्तम एकीकरण होईल. याद्वारें जगाला साक्ष होईल कीं, देवाने पापी जनांच्या उद्धारासाठी आपल्या पुत्राला या जगांत पाठविले. दैवी सत्य उंचावले जाईल व दिव्याप्रमाणे तें प्रकाशीत होईल तसे तें अधिक अधिक स्पष्ट असें आपल्याला कळेल. 5 CChMara 161.5

मला असें दाखविण्यांत आलें कीं, जर देवाचे लोक आपला भाग करणार नाहींत पण पवित्र आत्म्याच्या वर्षावाची वाट पाहातील व आपल्या चुका अपराध काढून टाकण्याची इच्छा बाळगतील व दैहिकपणाच्या अमंगळपणापासून शुद्ध होण्यास व तिसर्‍य दूताच्या मोठ्या CChMara 161.6

घोषणेंत सामील होण्यास लायकी पटविण्यास अवलंबून राहतील तर तें उणे भरतील. देवाच्य सामथ्यकरिता जे तयार आहेत त्यांनाच प्राप्त होतें. कारण जे काम त्यांना करायला सागितले आहे तें तें करतात व दैहिकपणाच्या अमगळपणापासून स्वत:ला शुद्ध करून देवाच्या भयात पवित्र होतात. 6 CChMara 162.1

****