कलीसिया के लिए परामर्श
पवित्र आत्म्याला शरण जाण्यावर प्रत्येकाचा उपयोगीपणा अवलंबून आहे.
आम्हीं आपल्या शक्तीने आपल्या समोर असलेले काम करावे असें देव म्हणत नाहीं. आणीबाणीच्या वेळी त्यानें सर्वांना आपले दैवी साहाय्य देऊ केलेले आहे. कारण आपले मानवी साधन त्याच्या साधनाशीं अपुरे पडते तो आपला पवित्र आत्मा प्रत्येक अडचणींत मदत होण्यास देतो आणि आमच्या आशा व खात्री बळकट होऊन आमची मने तेजस्वी करण्यास व अंत:करणे शुद्ध करण्यास मदत होते. CChMara 160.2
ख्रिस्तानें आपल्या मंडळीला रूपांतर केलेली, स्वर्गीय प्रकाशाने प्रकाशित केलेली व इम्यानुएलचे गौरव धारण केलेली मंडळी होण्यास तरतूद केलेली आहे. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने आत्मिक प्रकाश व शांति यांच्या वातावरणाने घेरले जावे असा त्याचा हेतु आहे. जो स्वला बाजूला ठेवतो त्याच्या उपयुक्तीला मर्यादा नसते. कारण तो आपल्या अंत:करणावर कार्य करण्यास पवित्र आत्म्याला जागा देतो व देवाला पूर्ण समर्पित केलेले जीवित जगतो. CChMara 160.3
पन्नासाव्या दिवशीं पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला त्याचा काय परिणाम झाला? पुनरुत्थित तारणाच्याची सुवार्ता सर्व जगांत गाजविली गेली. शिष्याची अंत:करणे औदर्याने इतकी भरली होतीं व इतकी खोल व विस्तृत होती कीं त्याद्वारे तें पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाण्यास तयार झाले व साक्ष दिली कीं, “प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाशिवाय मला कशाचाही अभिमान वाटू नये.” (गलती ६:१४) येशूमध्ये असलेले सत्य त्यांनी गाजवल्यावर संदेशाच्या सामर्थ्याला अंत:करणे वश झाली. मंडळींत सर्व बाजूंनी पालट झालेल्यांची भरती झाली. धर्मत्यागी लोकांचा पालटे झाला. पापी लोक ख्रिस्ती लोकांबरोबर मौल्यवान् मोत्याचा शोध करण्यास एकत्र झाले. जे सुवार्तचे कट्टे वैरी होतें तें उत्तम कार्यकर्ते बनले, याविषयींचे भविष्य पूर्ण झाले. जे दुर्बल आहेत तें दाविदासारखे होतील व दाविदाचें घर प्रभूच्या दूतासारखे होईल.” प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला आपल्या भावात दैवी औदार्य व प्रेम दिसून आलें. एक गोडी निर्माण झाली. ईर्षेच्या विषयाने सर्वांना गिळून टाकले. विश्वासणाच्याची महत्त्वाकाक्षा हीच होती कीं, खिस्ताच्या शीलाचे प्रगटीकरण करणे व त्याच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी काम करणे ही होय. CChMara 160.4
पहिल्या शिष्याप्रमाणे आजहि पवित्र आत्म्याचे वचन लागू आहे. देवाने आपल्या सामर्थ्याने पुरुष व स्त्रिया यांना जसे पन्नासाव्या दिवशी भरून टाकले तसे भरून टाकील याच क्षणाला त्याचा आत्मा व त्याची कृपा ज्यांना त्याची गरज आहे त्या सर्वांकरता आहे व जे त्याच्या वचनाचा स्वीकार करतील त्याकरता आहे. 3 CChMara 161.1