कलीसिया के लिए परामर्श

115/318

धंद्याबाबतीत जगाशी संबंध

जगिक बाबतींत कांहींना शहाणपणाची खुबी नाहीं. तें गरजेच्या लायकीमध्ये उणे आहेत व सैतान त्यांचा फायदा घेतो. जेव्हां हें घडते, तेव्हां अशांनी आपल्या कार्याच्या अडाणीपणामध्ये राहूं नये. त्यांनी आपल्या भावाचा सल्ला घेण्याइतके नम्र असावे. कोणतीही योजना तडीस नेण्यापूर्वी त्याचा त्यावर पूर्ण भरवसा असावा. मला हें वचन दाखविण्यांत आलें “एकमेकांची ओझी वाहा.” (कलसै ६:२ कांहीं जण असें आहेत कीं आपली योजना तडीस जाईपर्यंत इतरांना त्याविषयीं व अडचणीत पडेपर्यंत स्वत: विचार करीत नाहींत. मग तें आपल्या भावाचा सल्ला व विचार जरूरी भासून घेतात; पण यावेळी तें ओझे पहिल्यापेक्षा किती जड असतें. जर शक्य असेल तर भावांनी कोर्टात जाऊ नये; कारण असें करण्याकडून त्यांना जाळ्यांत धरण्यास व घोटाळ्यांत पाडण्यास तें शत्रूला मोठी संधि देतात. काहीं नुकसान झाले तरी ही गोष्ट आपसात मिटविणे बरे असते. CChMara 158.2

मला असें दिसलें कीं, देवाचे लोक विश्वास न ठेवणार्‍यस जामीन राहातात म्हणून देवाला असंतोष झाला. मला हीं वचने दाखविण्यांत आली. नीति २२:२६. “हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे यातला तू होऊ नको.” नीति ११:१५. परक्याला जामीन राहील तो पस्तावेल. पण हातावर हात देणाच्याचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहातो.” अविश्वासू कारभारी ! जे दुसर्‍यचे आहे त्याविषयी प्रतिज्ञा करतात. देवाच्या लोकांच्या हातांतून काढून घेण्यास सैताने त्याच्या लोकांना मदत करतो. शब्बाथ पालन करणार्‍यांनी अविश्वासणार्‍यनी भागी करूं नये. देवाचे लोक परक्याच्या शब्दावर विश्वास ठेवतात. त्यांचा सल्ला व विचार घेऊ नये अशावेळीं घेतात. सैतान त्यांना आपले हस्तक करतो व त्याद्वारे त्यांचा घोटाळा करून त्यांना देवाच्या लोकापासून हिरावून घेतो. 7 CChMara 158.3

****