कलीसिया के लिए परामर्श

116/318

प्रकरण २३ वें - पवित्र आत्मा

प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला प्रभु येशूच्या दुसर्‍य येण्याची वाट पाहाण्याचीच नव्हें पण त्याचे येणें लवकर व्हावे म्हणून खटपट करण्याची संधि आहे. जे सर्व त्याचे नांव धारण करतात त्यांनी त्याच्या नावासाठी फळ दिले, तर जगांत किती लवकर सुवार्तेचे बी पेरले जातील ! जलद रीतीने शेवटले पीक पिकेल व ख्रिस्त मौल्यवान् दाने गोळा करण्यास येईल. CChMara 159.1

माझ्या भावाबहिणीनों, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. देवाने दिलेल्या प्रत्येक आश्वासनामागें तो उभा आहे. तुमच्या हातांत पवित्रशास्त्र धरून म्हणा: “मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. मी तुझे वचन बोलन दाखवितों, मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सांपडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडिले जाईल.” ख्रिस्ताने म्हटले आहे कीं, “तुम्हांला जें कांहीं पाहिजे तें प्रार्थना करून मागा व तें मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे तें तुम्हांस प्राप्त होईल.” जे काहीं तुम्ही माझ्या नामाने मागाल तें मी करीन यासाठीं कीं, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावें.” (मत्तय ७:७, मार्क ११:२४, योहान १४:१३.) CChMara 159.2

ख्रिस्त आपल्या निरोप्यांना आपल्या राज्याच्या प्रत्येक भागांत आपल्या सेवकांना आपली इच्छा दर्शविण्यास पाठवितो तो आपल्या मंडळींत चालतो. आपल्या अनुयायांना पवित्र करण्यास, उंचावण्यास व थोरवी देण्यास इच्छितो. जे त्याजवर विश्वास ठेवतात तें जगांत इतरांना जीवन देणारे बनतील. ख्रिस्त आपल्या उजव्या हातांत तारे धरतो व त्यांच्याद्वारे त्याचा प्रकाश जगावर पडावा असा त्याचा हेतु आहे. याप्रकारे वरील मंडळीत उच्च सेवेसाठी आपल्या लोकांची तयारी करण्यास इच्छितो. त्यानें आपल्याला महान् कार्य करण्यासाठी दिले आहे. तें आपण विश्वासूपणे करुं या. आपल्या जीवितांत असें दाखवू या कीं, दैवी कृपा मानवासाठी मोठे कार्य करूं शकते. 1 CChMara 159.3