कलीसिया के लिए परामर्श
विश्वास ठेवणारा - धंद्यांत भला माणूस
ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे प्रामाणिक मनुष्य म्हणजे जो सरळ प्रामाणिकपणा प्रगट करील तो. फसवणुकीची वजने व खोटे तराजू याद्वारें पुष्कळजण या जगांत आपला फायदा वाढविण्याचा प्रयत्न करतात पण तें देवाच्या दृष्टीने तिरस्कारणीय आहे. तरी देवाच्या आज्ञा पाळणारे खोटीं वजने व तराजू यांचा व्यवहार करतात. जेव्हां मनुष्य खरोखरच देवाच्या निकट संबधात आलेला आहे व सत्यतेने त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हां त्याच्या जीवितावरून तें दिसेल. कारण त्याचे सर्व करणे ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे असणार. तो लाभासाठी आपला मान विकणार नाही. त्याची तत्त्वे खात्रीपूर्वक पायावर उभारलेली असणार व जगिक बाबींत त्याची वागणूक त्याच्या तत्त्वांची नक्कल असणार. भक्कम प्रामाणिकपणा जगाच्या केरकचर्यांत व हिनकसांत सोन्याप्रमाणे चमकेल. CChMara 157.2
ठकविणें व लबाड आणि अविश्वासूपणा मनुष्यापासून छपविता येईल, पण देवाच्या दृष्टीपासून लपवता येणार नाही. देवाचे दूत शीलाची वाढ कशी होत आहे हें पाहातात व नैतिक बाब पडताळून पाहातात तेव्हां तें स्वर्गीय पुस्तकांत त्यांची नोंद करतात व त्यावरून त्यांच्या शीलाचे प्रगटीकरण होतें. जर कामकरी आपल्या रोजच्या कामांत अप्रमाणिकपणा दर्शवितो व चुकारपणा करतो तर जग त्याचा न्याय विपरीत करणार नाही. कारण जर त्यानी त्याच्या धद्याचा दर्जा त्याच्या धार्मिक दर्जाप्रमाणे पाहिला तर तें त्याचा न्याय चुकीचा करणार नाहीत. CChMara 157.3
ढगावर बसून मनुष्याच्या पुत्राचे होणारे आगमन याद्वारें ख्रिस्ती मनुष्य निष्काळजी व हयगय करणारा असा आपल्या जीवितांत बनणार नाहीं. ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहाणारे आळशी बनणार नाहीत पण धंद्यांत हुशार असणार. तें आपले काम निष्काळजीपणाने करणार नाहींत किंवा लबाडीनेही करणार नाहीत, पण नियमित व इमानीपणाने करतील. जे बाता मारणारे आहेत, त्यांच्या जीवितांतील निष्काळजीपणा हा त्याच्या आत्मिकपणाचा पुरावा आहे व ते जगापासून वेगळे होणार हें खोटें आहे. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा विश्वासूपणा व सत्यता या गोष्टी जगक बाबींत कसोटीला लावल्या जातात व सिद्ध केल्या जातात. जे अल्प गोष्टीविषयीं विश्वासू तें मोठ्या गोष्टीविषयीं विश्वासू होतील. CChMara 157.4
मला असें दाखविण्यांत आलें कीं, या बाबतींत पुष्कळ जण कसोटीला उतरले नाहीत तें आपले खरे शील जगिक गोष्टीद्वारे बनवितात. तें आपल्या सोबत्यार्थी वागतांना अविश्वासूपणा अप्रमाणिकपणा व खोटी योजना करतात. तें विचार करीत नाहींत कीं भविष्य काळांतील अमरपणाचें जीवित हैं या जीवितांतल्या वागणुकीवर अवलंबून आहे. कडक प्रामाणिकपणा धार्मिक शील बनविण्यासाठी अत्यावश्यक आहे. जे सत्यावर विश्वास ठेवतात अशांच्या कोमटपणामुळे अप्रामाणिकपणा उद्भवतो तें ख्रिस्ताशी समरूप झालेले नसतात व तें आपल्या आत्म्याची फसवणूक करून घेतात. मला हें विधान करण्यास दु:ख वाटते कीं, शब्बाथ पालन करणाच्यामध्येही प्रामाणिकपणाची उणीव आहे. 6 CChMara 158.1