कलीसिया के लिए परामर्श
ख्रिस्ती प्रामाणिकपणा
प्रत्येक धंद्यांत काटेकोर प्रामाणिक बना. कितीहि मोह आला तरी क्षुल्लक बाबतींत अपहार करूं नका किंवा फसवू नका. कधीं कधीं स्वाभावाविकपणे प्रामाणिकपणाच्या मार्गावरून दूर नेण्यासाठी मोह येईल पण केसाइतको फरक पडू देऊ नका. जर तुम्ही काहीतरी करण्याच्या बाबतीत विधान केले व नंतर तुम्हांला आढळून आलें कीं, त्यात तुमचे नुकसान आहे तर मूळ तत्त्वांपासून केसभरहि फरक पडू देऊ नका. तुमचा करार पूर्णपणे पाळा. 2 CChMara 156.2
पवित्रशास्त्र जोरदाररित्या लबाडी, लबाडीचा व्यवहार वे अप्रामाणिकपणा याचा निषेध करते. बरे आणि वाईट याचे स्पष्टीकरण देते; पण मला दाखविण्यांत आलें कीं, देवाचे लोक शत्रूच्या भूमिकेवर उभे आहेत. तें त्याच्या मोहाला वश झाले आहेत व त्यांचा सद्सद्विवेक बोथट होईपर्यंत तें त्याच्या योजनेच्या मागें गेले आहेत. किंचित् सत्यापासून दूर जाणे, देवाच्या मागण्यापासून थोडा फरक दर्शविणे या गोष्टी इतक्या पापमय नाहींत असें वाटते. कारण पैशाचा फायदा तोटा यांचा त्यात समावेश होतो. पण पाप तें पापच, मग तें लखपतीने केलेले असो किंवा सडकेवरच्या भिकार्यने केलेले असों जे कोणी खोट्या रीतीने आपली मालमत्ता मिळवितात तें आपल्यावर दोष आणतात. जे फसवेगिरीने व दगलबाजीने मिळविलेले असतें तें सर्व घेणारावर शाप आणते. 3 CChMara 156.3
जो (लबाडी करतो व फसवेगिरी करतो) तो आपला स्वत:चा मान गमावून बसतो. देव त्याला बघतो, त्याला प्रत्येक धद्यातील बाब माहीत आहे इतकी कीं त्याचे पवित्र दृत त्याचा हेतु तोलून पाहातात व त्याच्या प्रत्येक शब्दाकडे त्याचे लक्ष आहे व त्याला त्याच्या कमींप्रमाणे फळ मिळेल हें जरी त्याला समजत नसले तरी त्याविषयी त्याला माहिती आहे. जर मनुष्य लोक व देव यांच्यापासून आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करील तर तो आपली बुद्धिमता व शील खालच्या पायरीला नेईल. एकाच कृतीवरून शीलाची परीक्षा होत नसते; पण तो अडथळा दूर करून दुसरा मोह त्वरेने येतो इतका कीं शेवटीं अप्रमाणिकपणाचे व दुटप्पीपणाचे भाषण करण्याची सवय लागते व मनुष्यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीं. 4 CChMara 156.4
आपल्या सेवेत असलेली माणसें त्याच्या निशाणाखाली पूर्ण प्रामाणिक असली पाहिजेत व शीलांत निष्कलंक असें कीं त्यांच्या जीभेने असत्य भाषण निघणार नाही अशी देवाची इच्छा आहे. जिव्हा व नेत्र खरे असले पाहिजेत व कृति व एकंदर सारे असें असावे कीं, देवानं वाहवा केली पाहिजे. आपण पवित्र देवाच्या समक्षतेत राहात आहों. जो गंभीरपणे म्हणतो कीं, “तुझे काम मला माहीत आहे, त्याचे नेत्र सतत आम्हांवर आहेत. एकाहि अन्यायाची बाब देवापासून आपण लपवू शकत नाही. प्रत्येक कृतीत देवाची साक्ष म्हणजे सत्य आहे ही गोष्ट फारच थोडक्यांना कळते. 5 CChMara 157.1