युगानुयुगांची आशा

84/88

अध्याय ८३—अम्माऊस गांवाचा प्रवास

लूक २४:१३-३३.

पुनरुत्थानाच्या दिवशी दुपारी दोन शिष्य यरुशलेमेपासून आठ मैलावरील अम्माऊस नावाच्या छोट्या गांवाला चालले होते. ख्रिस्ताच्या कार्यात ह्या शिष्यांना महत्वाचे स्थान नव्हते परंतु ते कळकळीचे श्रद्धावंत होते. ते शहरामध्ये वल्हांडण सण पाळण्यासाठी आले होते आणि नुकत्याच घडलेल्या घटना पाहून गोंधळून गेले होते. थडग्यातून ख्रिस्ताचे शरीर काढून नेल्याचे आणि स्त्रीयांनी दूतांना पाहिल्याचे व येशूला भेटल्याची बातमी त्यांनी ऐकिली होती. चिंतन करून प्रार्थना करण्यासाठी ते परत घरी चालले होते. दुःखी अंतःकरणाने सायंकाळच्या समयी चौकशी व वधस्तंभावरील मरण याविषयी परस्पर संभाषण करीत होते. पूर्वी कधी ते इतके नाऊमेद झाले नव्हते. आशाहिन आणि श्रद्धाहिन असे ते वधस्तंभाच्या छायेत चालत होते. DAMar 689.1

चालून थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांच्या बरोबर एक अनोळखी माणूस चालू लागला, परंतु ते दुःखात व निराशेत इतके मग्न होते की त्यांनी त्याची दखल घेतली नव्हती. मनातील विचारावर त्यांचे संभाषण चालूच होते. ख्रिस्ताने दिलेल्या पाठावर ते विचार करीत होते परंतु त्याचे पूर्ण आकलन त्यांना होत नव्हते. घडलेल्या घटनेवर बोलत असताना येशू त्यांचे समाधान करण्यास उत्सुक होता. त्यांचे दुःख त्याने पाहिले; विरोधात्मक व गोंधळाचे विचार त्यांच्या मनात चाललेले त्याला समजले, ज्याची मानखंडना केली व ज्याला अपमानाची वागणूक दिली असा मनुष्य ख्रिस्त असू शकेल काय? त्यांचे दुःख इतके अनावर झाले होते की ते अश्रु ढाळू लागले. त्यांची अंतःकरणे प्रेमाने त्याच्याशी बांधली गेली आहेत हे येशूला माहीत होते आणि त्यांचे अश्रु पुसून टाकून त्यांच्यात उल्हास व हर्ष भरण्यास तो फार उत्कट होता. परंतु ज्यांचे विस्मरण त्यांना होणार नाही असे धडे प्रथम त्यांना द्यायचे होते. DAMar 689.2

“त्याने त्यास म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकाबरोबर बोलत आहा त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” त्यांच्या गुरुजीविषयी त्यांची झालेली मोठी निराशा याविषयी त्यांनी त्याला सांगितले. ते म्हणाले, “तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीने कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळिले.” दुःखी अंतःकरणाने व निराशेने थरथर कंप पावणाऱ्या ओठातून ते पुढे म्हणाले, “परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याला आज तिसरा दिवस आहे.” DAMar 689.3

घडलेल्या गोष्टीविषयी आणि ख्रिस्ताच्या इतर वचनाविषयी त्याने अगोदरच भाकीत केले होते त्यांचे स्मरण त्यांना झाले नाही हे फार विलक्षण होते. त्याने उघड करून सांगितलेला शेवटला भाग पहिल्या भागासारखाच पूर्ण झाला होता ह्याचा त्यांना उमज झाला नव्हता. शेवटचा भाग तिसऱ्या दिवशी तो उठेल असा होता. ह्या भागाचे स्मरण त्यांना व्हायाला पाहिजे होते. याजक व अधिकारी यांना ह्याचा विसर पडला नव्हता. “दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारी नंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज, तो ठक जीवंत असता तीन दिवसानंतर उठेन असे म्हणाला होता.” मत्तय २७:६२, ६३. परंतु शिष्यांना ह्या वचनाचे स्मरण राहिले नव्हते. DAMar 690.1

“मग तो त्यास म्हणाला, अहो निर्बुद्धि व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय?” कळकळीने अगदी मनापासून सहानुभूतीने बोलून आमच्या मनात शिरणारा व आशेचा किरण निर्माण करणारा हा तिहाहीत माणूस कोण असावा याचा भ्रम त्यांना पडला. ख्रिस्ताचा विश्वासघात केल्यापासून प्रथमच त्यांना आशादायक वाटले. वारंवार ते सोबत्याकडे पाहात होते आणि त्यांना वाटले की ह्याचे उद्गार ख्रिस्ताने काढलेल्या उद्गारासारखेच होते. ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांचे अंतःकरण हर्षयुक्त अपेक्षेने फुलून गेले. DAMar 690.2

त्याने बायबल इतिहासाची सुरवात मोशे ह्याच्यापासून करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यास सांगितला. स्वतःची त्याने प्रथम ओळख करून दिली असती तर त्यांची अंतःकरणे समाधान पावली असती. आनंदाच्या भरतीमुळे त्यांना अधिक माहिती मिळविण्याची इच्छा राहिली नसती. जुना करारातील लाक्षणिक चिन्हे व भाकिते यांच्याद्वारे त्याच्याविषयी दिलेली साक्ष समजून घेणे आवश्यक होते. त्याच्यामुळे त्यांचा विश्वास दृढ होणार होता. त्यांची खात्री करून देण्यासाठी ख्रिस्ताने चमत्कार केला नव्हता परंतु त्याने शास्त्रवचनाचे त्यांना प्रबोधन केले. त्याचे मरण सर्व आशांचा घात आहे अशी त्यांची भावना होती. आता त्याने संदेष्ट्यांच्यापासून दाखविले होते की, हाच त्यांच्या विश्वासाचा भक्कम पुरावा आहे. DAMar 690.3

हे शिष्यांना शिकवीत असतांना त्याच्या कार्याचे साक्षी असलेल्या जुना कराराचे महत्त्व त्याने त्यांना दाखविले. आज ख्रिस्ती म्हणविणारे अनेकजन जुना करार फेकून देतात आणि ह्याचा काही उपयोग नाही असे ते म्हणतात. परंतु ख्रिस्ताची शिकवण अशी नाही. त्याने त्याचे परम महत्त्व जाणले व त्याने म्हटले, “ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.’ लूक १६:३१. DAMar 691.1

आदामाच्या दिवसापासून युगाच्या समाप्तीपर्यंत कुलपती व संदेष्टे यांच्याद्वारे ख्रिस्ताची वाणी बोलत होती. नवा कराराप्रमाणेच जुना करारामध्ये उद्धारक प्रगट करण्यात आला आहे. गत भाकीतापासून मिळालेल्या प्रकाशामुळे ख्रिस्त जीवन व नवा करारातील शिकवण स्पष्ट होते. ख्रिस्ताच्या चमत्काराने त्याचे देवपण सिद्ध होते; परंतु जुना करारातील भाकीतांची तुलना नवा करारातील ऐतिहासिक गोष्टीशी केल्यावर तो जगाचा त्राता उद्धारक असल्याचे सिद्ध होते. DAMar 691.2

मानवी स्वरूपात तो कोण असणार ह्याची खरी कल्पना, भाकीतावर सखोल विचार करून ख्रिस्ताने शिष्यांना दिली. मशीहा या नात्याने सिंहासनारूढ होऊन राजसत्ता हाती घेणे हे त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते गैरसमजुतीचे होते. शिष्यांचे संकल्प प्रत्येक बाबतीत शुद्ध आणि सत्य असावेत अशी ख्रिस्ताची अपेक्षा होती. त्याच्या वाट्याला आलेला दुःखाचा पेला याविषयी शक्यतो त्यांना खरी समज व्हायला पाहिजे. जगाची स्थापना होण्यापूर्वी केलेल्या करारनाम्याची पूर्णता, त्यांना अजून पूर्ण न समजलेल्या झगड्याद्वारे झाली आहे हे त्याने त्यांना दाखविले. आज्ञाभंग करणारी प्रत्येक व्यक्ती पाप करीतच राहिली तर मेली पाहिजे आणि ख्रिस्तालाही मेले पाहिजे. हे सर्व घडले पाहिजे परंतु त्याचा शेवट पराजयात नाही तर वैभवशाली अनंतकालिक विजयात होणार होता. पापापासून जगाचा बचाव करण्यास हरएक प्रयत्न कामी लावला पाहिजे असे येशूने त्यांना सांगितले. पराकाष्ठेचे व चिकाटीचे प्रयत्न करीत त्याच्या अनुयायांनी त्याच्याप्रमाणे जीवन जगून कार्य करायला पाहिजे. DAMar 691.3

अशा प्रकारे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना व्याख्यान दिले आणि शास्त्रवचनाचा समज होण्यासाठी त्यांची मने मोकळी केली. शिष्य अगदी थकलेले होते परंतु संभाषण ढिले पडले नव्हते. उद्धारकाच्या मुखातून आत्मविश्वासाने व जीवनीवचन बाहेर पडले. यरुशलेमाचा पाडाव होणार असे त्याने सांगितल्यावर त्यांनी अश्रु ढाळीत त्या नगराकडे पाहिले. त्यांचा सहप्रवासी कोण होता ह्याविषयी ते अजून साशंक होते. त्याच्या संभाषणाचा विषय सहप्रवासी होता ते त्यांना माहीत नव्हते. कारण दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख केल्यासारखे ख्रिस्ताने स्वतःविषयी वक्तव्य केले. मोठ्या सणाच्या उत्सवात भाग घेऊन परत आपल्या गावी जाणाऱ्यापैकी हा एक असावा असे त्यांना वाटले. तो त्यांच्याबरोबर त्या खडतर वाटेवरून जपून चालत होता. अधून मधून थोड्या विसाव्यासाठी ते थांबत होते. अशा रीतीने ते त्या डोंगराळ वाटेने चालले होते, त्यातील एकजण लवकरच देवाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न होणार होता आणि म्हणणार होता की, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे.’ मत्तय २८:१८ तो त्यांच्याबरोबर चालला होता. DAMar 691.4

प्रवासी घरी पोहंचण्या अगोदर सूर्यास्त झाला होता आणि शेतातील कामकरी काम करून परतले होते. शिष्य घरात प्रवेश करण्याच्या सुमारास सहप्रवासी पुढे जाणार असे त्यांना वाटले. परंतु शिष्य त्याच्याकडे आकर्षिले गेले होते. अधिक ऐकण्यास ते उत्सुक होते म्हणून त्यांनी आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा.” तो राहाण्यास राजी नव्हता परंतु त्यांनी फारच आग्रह करून म्हटले, “संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.’ ख्रिस्ताने त्यांची विनवणी मान्य करून “तो त्यांच्याबरोबर राहावयास आंत गेला.” DAMar 692.1

राहाण्यासाठी शिष्यांनी त्याला आग्रह केला नसता तर त्याचा सहप्रवासी पुनरुत्थित झालेला उद्धारक होता हे त्यांना कळले नसते. ख्रिस्त आपला सहवास कुणावर जुलूमाने लादत नाही. त्याची गरज असलेल्यामध्ये तो गोडी घेतो. नम्र घरामध्ये तो आनंदाने प्रवेश करील आणि त्यांच्या अंतःकरणाला समाधान देईल. परंतु ह्या स्वर्गीय पाहुण्याशी बेपर्वाईने वागणाऱ्यांना तो टाळून पुढे जातो. अशा प्रकारे पुष्कळांचा फार तोटा होतो. रस्त्याने जाणाऱ्या दोन शिष्यांना तो ख्रिस्त आहे असे समजले नव्हते तसेच त्यांनाही समजत नाही. DAMar 692.2

संध्याकाळच्या जेवणासाठी ताबडतोब भाकर तयार केली. तो त्यांच्याबरोबर जेवावयासच बसला असता जेवणावर आशीर्वाद मागण्यास त्याने आपले हात पुढे केले. ते पाहून शिष्य चकित झाले. त्यांचा प्रभु आशीर्वाद मागण्यास जसा हात पुढे करीत होता तसेच ह्या सहप्रवाशाने हात पुढे केले होते. ते पुन्हा निरखून पाहाताच तो त्यांना खिळ्याचं वण हातावर दिसतात. एकदम दोघे उद्गारले, हा प्रभु येशू आहे! तो मरणातून उठला आहे! DAMar 692.3

त्याच्या चरणी पडून त्याची आराधना करण्यासाठी ते उठले, परंतु तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपले अंतःकरण आतल्या आत उकळत नव्हते काय?” DAMar 692.4

बसून बोलत राहिल्याने ही आनंदाची वार्ता दुसऱ्याच्या कानावर जाणार नव्हती. त्यांचा थकवा आणि भूक नाहीशी झाली. जेवण तसेच सोडून दिले आणि हर्षभरीत होऊन त्याच घटकेस ज्या वाटेने आले होते त्याच वाटेने शिष्यांना वार्ता देण्यासाठी यरुशलेमास माघारी गेले. डोंगराळ वाटेत काही ठिकाणे सुरक्षितेची नव्हती. काही ठिकाणी डगरीवरून खाली घसरत जावे लागत होते. ह्या मार्गावर त्यांना त्याच्या सहप्रवाशाचे संरक्षण होते ते त्यांना दिसले नाही आणि समजलेही नाही. यात्रेकरूची काठी हातात घेऊन ते लगबगीने जाण्यास निघाले. ते रस्ता चुकतात परंतु पुन्हा त्यांना तो सापडतो, जाताना काही वेळ पळत होते तर काही वेळ धडपडत होते आणि त्यांचा अदृश्य सोबती सर्व वेळ त्यांच्याबरोबर होता. DAMar 692.5

रात्र काळोखी होती परंतु धार्मिकतेचा सूर्य त्यांच्यावर प्रकाशमान झाला होता. त्यांची अंतःकरणे हर्षाने झेप घेतात. नव्या जगात असल्याचा त्यांना भास होतो. ख्रिस्त जीवंत त्राता उद्धारक आहे. मृत असल्यासारखे त्याच्यासाठी ते आता शोक करीत नाहीत. ख्रिस्त उठला आहे ह्या वाक्याचा उच्चार ते वारंवार करितात. दुःखी मनाला हा संदेश ते देत होते. अम्माऊस गांवाच्या प्रवासाची चित्तथरारक कथा त्यांनी सांगितले पाहिजे. वाटेत त्यांना कोण मिळाले हे सांगितले पाहिजे. जगाला द्यावयाचा महान संदेश ते वाहून नेत होते. हा संदेश हर्षभरीत आहे आणि त्यावर मानवी कुटुंबाची आशा आता आणि अनंत काळासाठी अवलंबून आहे. DAMar 693.1