आरोग्यदायी सेवा
अनंत काळापर्यंतचे शिक्षण
या जगातील आमचे कार्य अनंत जीवनासाठी तयारी करणे असे आहे. ज्या शिक्षणाला येथे सुरुवात झाली ते या जीवनाला पुरेसे नाही. हे शिक्षण अनंतकाळपर्यंत चालत राहील. नेहमी उन्नती होत राहील. ती कधीच पूर्ण होणार नाही. उद्धाराच्या योजनेमध्ये परमेश्वराचे प्रेम अधिक व अधिकच प्रगट होत राहील. जेव्हा मुक्तिदाता आपल्या मुलांना जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ आणील तो ज्ञानाचा विशाल खजिना त्यांच्यासमोर उघडा करील. आणि दिवसामागून दिवस परमेश्वराचे अद्भुत कार्य, विश्वाची रचना आणि हे सर्व सांभाळण्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे प्रमाण. त्यांच्या बुद्धीसमोर एक नवे सौंदर्य प्रगट होईल. सिंहासना समोरुन चमकणारा प्रकाशामध्ये त्याचे रहस्य लुप्त होईल. त्यांचा आत्मा अशा गोष्टी पाहून आतापर्यंत त्यांच्या बुद्धीपलिकडे होत्या. नवलाने त्यांची नजर विस्फारली जाईल. MHMar 367.2
आता आम्हाला आरशामध्ये अस्पष्ट दिसते, परंतु त्यावेळी प्रत्यक्ष पाहाल. यावेळी माझे ज्ञान अर्धे आहे, परंतु त्यावेळी पूर्ण ज्ञान होईल जसे अगोदरच ठाऊक आहे. MHMar 368.1
*****