आरोग्यदायी सेवा
परमेश्वराचे स्पष्ट प्रकाशन
हे आमचे सौभाग्य आहे की आम्ही परमेश्वराच्या चरित्राचे स्पष्ट प्रकाशन मिळविण्यासाठी उंचच उंच ठेऊ शकतो. जेव्हा मोशेने निवेदन केले, “मला तुझे तेज दाखव, तो म्हणाला मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालविन. तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन.” (निर्गम ३३:१८-१९). हे तर पाप आहे की जो आमच्या बुद्धीला अंधुक आणि विचाराला अंधकारमय करतो. जसे आमच्या हृदयातून पाप धुऊन जाते. येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर परमेश्वराच्या महिम्याचा प्रकाश, त्याचा स्वभाव आणि त्याच्या वचनाचा प्रकाश व त्याचे गुण अधिक न अधिक चमकत अशी घोषणा करतो की, “परमेश्वर, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव मंद, क्रोध, दयेचा व सत्याचा सागर.” (निर्गम ३४:६). MHMar 366.6
त्याच्या प्रकाशामध्ये आम्ही प्रकाश पाहातो तोपर्यंत की आमचे हृदय व बुद्धी व आत्मा प्रभुच्या पावित्र्याची छबीमध्ये बदलत नाही जे लोक परमेश्वराच्या वचनाचे स्वर्गीय आश्वासन धरुन राहाते त्यांच्यासाठी अद्भुत संभावना आहेत. त्यांच्यासमोर सत्याचे विशाल सामर्थ्याचे विस्तृत संसाधन खोलले जाते. गौरवयुक्त गोष्टी प्रगट होतील अशाप्रकारचे कर्त्तव्य त्यांच्यावर प्रगट केले जाईल आणि ते गौवी असेल. ते सर्व नम्रपणे परमेश्वराचे उद्देश पूर्ण करण्यासाठी आज्ञाधारकपणे मार्गाक्रमण करीत राहतात. परमेश्वराची वाणी ते अधिकपणे ऐकतील. जेव्हा विद्यार्थी पवित्रशास्त्राला आपला मार्गदर्शक आणि सिद्धांताच्या रुपाने पाहतील व ऐकतील. तेव्हा ते कोणत्याही उंचीवर पोहचू शकतात. जेव्हा परमेश्वराला सर्व वस्तुंपेक्षा श्रेष्ठ मानिल तेव्हा समजेल की जगातील सर्व प्रकारची आकर्षणे एक भ्रम आहे आणि मोहमय गुंतवणूक आहे वेळेचा दुरुपयोग स्वर्ग व परमेश्वरापासून दूर घेऊन जाण्याचे साधन आहे. जेव्हा परमेश्वराचा चांगुलपणा, त्याची दया आणि त्याच्या प्रीतिविषयी चिंतन केले जाते तेव्हा सत्याचे ज्ञान अधिक स्पष्ट होते. हृदयाच्या पवित्रतेची इच्छा उंच आणि पवित्र होत राहील. आणि विचार स्पष्ट व स्वच्छ होत राहतील. पवित्र विचाराच्या वातावरणामध्ये परमेश्वराच्या वचनाच्या अध्ययनामध्ये त्याच्याबरोबर संवाद केल्याने आपल्या आत्म्यामध्ये बदल घडून येतो. परमेश्वराचे सत्य इतके खोल, विस्तीर्ण, प्रभावी आहे की या प्रभावामुळे मनातील स्वार्थीपणा निघून जातो. हृदय मुलायम होऊन नियंत्रणात येते त्यामध्ये दयाळूपणा आणि प्रीति निर्माण होते. MHMar 366.7
पवित्र आज्ञाकरीकामुळे नैसर्गिक शक्तिमध्ये विकास होतो. जीवनाच्या वचनाचे अध्ययन करण्याने विद्यार्थ्याची बुद्धी विकसित आणि उन्नत होईल. जर त्यांनी दानिएलाचे अनुकरण करुन परमेश्वराचे वचन ऐकून त्याप्रमाणे कार्य करु लागले तर शिक्षणाच्या सर्व शाखांमधून ते तरबेज होतील वचनामध्ये त्यांची प्रगती होईल. त्यांची मने शुद्ध असल्यामुळे त्यांची इच्छाशक्ति दृढ होईल. त्यांची प्रत्येक मानसिक शक्ति सजीव होते. अशाप्रकारे ते स्वत:ला सुशक्षित व अनुशाषित करतात. त्यांच्या प्रभावी क्षेत्र खाली येणारे सर्व लोक पाहातील की परमेश्वराची बुद्धी आणि सामर्थ्याशी जडून मनुष्य काय बनु शकतो. MHMar 367.1