आरोग्यदायी सेवा

101/172

जीवनातील आनंदी क्षण

येथे आपल्याला अति थोडा वेळ आहे. या जगामध्ये आपण केवळ एकदाच जाऊ शकतो. जसे आम्ही या मार्गावर चालतच आहोत, तर चला आपल्या जीवनातील सर्वोत्तम गोष्टी प्राप्त करण्याचे प्रयत्न करु या. ते कार्य करण्यासाठी आपणास या जगामध्ये पाठविण्यात आले आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी आपणाला पैसा, धन, पदवी किंवा कोणत्या प्रतिष्ठेची गरज नाही. तर त्यासाठी दयाळूपणा, आत्मबलिदान व उद्देश या सर्व भावनांची गरज असते. एक दिवा जो अतिशय छोटा का असेना तो इतर अनेक दिव्यांना प्रकाशित करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये असते. आमचा प्रभाव कमी, क्षेत्र लहान, आमची योग्यता कमी, आमचे सुअवसर कमी आणि उत्साह सुद्धा कमी असू शकतो. तरीही आमच्या घरातील चांगल्या क्षणांना विश्वासयोग्यतेप्रमाणे वेळेचा वापर करु शकतो तर आमच्या हाती असे अनेक सुअवसर येऊ शकतात. जर आपण जीवनाच्या स्वर्गीय सिद्धांताला आम्ही आमची हृदये आणि घराची दारे उघडी करुन ठेवली तर आम्ही जीवन शक्ति देणारा प्रवाह होण्याचे माध्यम बनू शकतो. आमच्या घरातून चांगलेच प्रवाह वाहू लागतील आणि जेथे पडीक जमीन असेल तेथे नंदनवन खुलेल. MHMar 279.2

*****