आरोग्यदायी सेवा
निःस्वार्थी सेवेमध्ये प्रसन्नता
परंतु लक्षात ठेवा कि स्वत:मध्येच निमग्न राहणे किंवा एकलेच आनंद उपभोगण्याने एकमेकांचे प्रेम आणि संतोष मिळू शकणार नाही. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्या आनंदात सहभागी झाल्यास जो आनंद प्राप्त होतो तो कोठेच मिळणार नाही. इतरांची सेवा केल्याने खरा आनंद मिळतो त्याला तोड नाही. सेवा ही निस्वार्थी असावी. MHMar 278.3
जे लोक ख्रिस्तामध्ये नवीन जीवन जगत आहेत त्यांची सहनशीलता आणि उदारपणा त्यांचे कार्य आणि शब्दाकरवी प्रभाव पाडला जातो. जेव्हा आपण ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्यांच्या गरजामध्ये त्यांची सेवा करण्याची संधी मिळते ते आपला मीपणा आणि स्वार्थावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आपण विजयावर विजय मिळवित जातो. MHMar 278.4
आजच्या तरुणांना सहानुभूतिपूर्वक पसरलेल्या हातांची गरज आहे. दयापूर्ण साधारण शब्द त्यांच्यावर दिलेले थोडेसे लक्ष त्यांच्यावर गुदरलेले प्राणाचे ढग व बाजूला सारण्याचे धैर्य येते. स्वर्गीय अनुभूतिची खरी झलक त्या हृदयाची दारे उघडण्यास शक्ति असते ज्यांना ख्रिस्ताच्या वचनांचा गंध आणि ख्रिस्ताच्या प्रेमाचा आत्मिक स्पर्शाची गरज आहे. जर आपण तरुणांमध्ये रस दाखविला त्यांना आपल्या घरी निमंत्रण द्या आणि खुशीमध्ये सामील व्हा त्यांना सहाय्य करा व त्यांचा आनंद द्विगुणीत करा. असे केल्यास आपली पावले स्वर्गीय आनंदाकडे वळतील. MHMar 279.1