आरोग्यदायी सेवा
मसालेदार
वेगवान जीवनामध्ये आपण जितके कमी उत्तेजक पदार्थ घेऊ तितके आरोग्यास चांगले आहे. मसालेदार पदार्थ स्वभावताच हानीकारक असतात. मीरे, मोहरी, मसाले, लोणची अशा प्रकारचे सर्व पदार्थांमुळे पोट बिघडते. या सर्व मसालेदार पदार्थामुळे रक्त गरम आणि अशुद्ध बनते. मद्यपीच्या पोटाची खराब अवस्था मद्याने दाखविली जाते, त्याचप्रमाणे मसालेदार पदार्थांमुळेसुद्धा पोटाचे आरोग्य बिघडते. साधारण भोजनाने भूक शमत नाही. आता शरीर अधिक तीव्र उत्तेजन निर्माण करण्याची इच्छा व्यक्त करते. MHMar 250.2