आरोग्यदायी सेवा
अध्याय २६—उत्तेजक पदार्थ आणि औषधे
“स्पर्श करु नका, चाखू नका, हाताला लाऊ नका”
उत्तेजनात्मक आणि नशा आणणारे पदार्थ हे खाण्यापिण्याच्या श्रेणीमध्ये येतात. असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे पोट बिघडते, रक्त खराब होते व सर्व शरीराचे तंत्र बिघडवून टाकते. या पदार्थांचा वापर एक सकारात्मक वाईटपणा आहे. मनुष्य उत्तेजन देणाऱ्या पदार्थामध्ये उत्तेजन शोधतात. कारण काही काळासाठी त्यांचे परिणाम सुखावह वाटतात, परंतु त्यांचे विपरीत परिणाम सुद्धा होत असतात. अनैसर्गिक उत्तेजन देणारे पदार्थांचा अति वापर हा आरोग्यास हानीकारक ठरतो. MHMar 250.1