ख्रिस्ती सेवा

49/256

देवाचा मर्यादित आत्मा आता काढून घेतला जात आहे

देवाचा पवित्र आत्मा जो जगावर नियंत्रण करीत होता तो आता काढून घेतला जात आहे. जगामधून देवाचा पवित्र आत्मा काढून घेतल्यावर आगी, पुर, वादळ आणि भूकंप अशा आपत्ति आणि अतोनात नुकसानाला सुरुवात होईल. या सर्व नाशांचे कारण सांगण्यासाठी विज्ञानसुद्धा गोंधळात पडेल. जगाच्या शेवटाची चिन्हे आता दाट होत आहेत ही चिन्हे देवाचा पुत्र येण्याचा काळ जवळ आल्याचे सांगत आहेत. केवळ देवाचे सत्याशीच याचा संबंध आहे. मनुष्ये शेवटचा निर्णय घेऊ शकत नाही कारण चारी दिशांचे वारे अडविणारे देवदूत त्यांना दिसत नाही. देवाच्या सेवकांवर शिक्षा मारीपर्यंत हे वारे सोडता येणार नाही. हे वारे सोडले म्हणजे मानवाच्या नाशाची सुरुवात होते. जेव्हा देव त्याच्या दूतांना सांगेल की चारी दिशांचे वारे सोडून द्या तेव्हा मात्र मानवाच्या नाशाच्या चित्राचे वर्णन करता येणार नाही. ते चित्रच अति भयंकर असेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४०८. ChSMar 73.2

ज्या दिवसांमध्ये सध्या आपण राहात आहोत ते अति महत्त्वाचे आणि गंभीर आहेत. देवाचा आत्मा पृथ्वीवरुन हळूहळू आणि ठामपणे काढून घेतला जात आहे. पीठा आणि देवाचा न्याय जगावर येण्याची सुरुवात झाली आहे. लोक एकमेकांचा तिरस्कार करीत आहेत. देवाची कृपा त्याच्यावर विश्वासणाऱ्यांवरच आहे. परंतु जे त्याचा व त्याच्या आज्ञांचा तिरस्कार करतात त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. समुद्र आणि जमीनयावर महाभयंकर येणाऱ्या संकटाची आणि लढायांची चाहल लागली आहे. ही वेळ अति गंभीर आहे. शेवटच्या घटना घडण्याचे भाकीत आता पूर्ण होत आहे. दुष्ट शक्ति एकवटून आपले कार्य जोरदारपणे करीत आहेत. ते आपला विळखा घट्ट करीत आहेत आणि शेवटच्या घटना अति झपाट्याने घडतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११. ChSMar 73.3

दुःखाची वेळ जवळच आली आहे. कोणताच मानव या दुःखावर मलम लावू शकणार नाही आणि हे द:ख बरे होणार नाही देवाचा पवित्र आत्मा काढून घेतला जाईल. जमीन आणि समुद्र यांच्यापासून एकामागोमाग सर्वनाश येत राहील. आपण वारंवार झंझावात तुफान आणि भूकंपाविषयी ऐकत आहोत. अग्निचे तांडव, पुर आणि मानवांचा संहार याच्या बातम्या आपल्या कानावर येतच असतात. वित्तहानी, आर्थिक नुकसान अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत. अशा अनेक प्रकारच्या नाशवंत घटना आता वारंवार येत आहेत. नैसर्गिक संकटे सारखी घडतच आहेत. अनेकांचे जीवन नष्ट होत आहे. या गोष्टी नियंत्रणाबाहेर जात आहेत. मानवाला त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. या सर्व घटना पाहून स्त्री आणि पुरुष या सर्वांनी आता जागे होऊन देवाकडे कळावे अशी देवाची इच्छा आहे. - प्रॉफेसी ॲण्ड किंग्स. २७७. ChSMar 74.1