ख्रिस्ती सेवा
नाटकाचा शेवटचा अंक
आजच्या इतका हा संदेश याआधी कधीच इतका मोठा व जोरदार झाला नव्हता. जग हे अधिक न अधिक देवापासून शून्य होत आहे. मनुष्ये अत्याचार करण्यामध्ये प्रवीण झाले आहेत. त्यांच्यामधील दुष्टपणाची सवयही त्यांच्या अंगवळणी पडून जगाने त्याच्या मलिनपणाचे माप ओलांडले आहे. हे जग त्याच्या दुष्टपणाचा कळस गाठून देवाला त्याचा नाश करण्याची परवानगी दिली आहे. देवाच्या आज्ञाऐवजी मानवाने स्वत:च्या आज्ञापालन करण्याचे ठरविले आहे. मानवाने स्वत:चीच सत्ता गाजविण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. देवाच्या शब्बाथ पालनाऐवजी मानवाने ठरविलेला शब्बाथ रविवार पालन ते करतात. हा जगाच्या नाटकाच्या शेवटचा भाग आहे. रविवार शब्बाथ पालन हे बायबलमध्ये कोठेच नाही. जेव्हा हा बदल जागतिक पातळीवर होईल देव स्वत:ला प्रगट होईल. तो त्याच्या वैभवाने उठेल त्यामुळे पृथ्वी भयाने हादरेल तो पृथ्वीवर राहणाऱ्यांचा नाश करण्यासाठी बाहेर येईल. कारण त्यांची मलिनता अति झाली आहे. पृथ्वीचे रक्त उघडे झाले आहे. येथून पुढे तिच्या पापांची रास झाकली जाणार नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:१४१. ChSMar 71.2
आम्ही संकट काळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. देवाचा न्याय एका पाठोपाठ लोकांवर येतील. आगी, पुर, भूकंप, लढाया आणि रक्तपात यावेळी ज्या महान घटना घडणार आहेत त्याविषयी आम्हाला नवल वाटणार नाही. कारण दयेचे देवदूत जास्त काळ जगामध्ये राहणार नाहीत. - प्रॉफेटस अॅण्ड किंग, २७८. ChSMar 72.1
आपल्यावर संकटे चोरासारखी येत आहेत. आकाशात सूर्य प्रकाशत आहे. नेहमीप्रमाणेच आकाशाचे गौरव देवाचे अस्तित्व सादर करीत आहे. तोपर्यंत लोक खातात, पितात, योजना करतात. लग्न करुन देतात, लग्न करतात, इमारती बांधतात. व्यापारी अजूनही विकत घेतात व विक्री करतात. ते एकमेकांचा विरोध करतात. उच्च पदासाठी भांडतात. करमणूकीसाठी अजूनही सिनेमागृहात गर्दी होते. घोड्यांच्या शर्यती चालूच आहेत. अशाप्रकारे भयंकर गोंधळ देवाविरुद्ध चालला आहे. बहुतेक गोष्टी देवाविरुद्धच चालू आहे आणि इकडे कृपेचा काळ भर भर जवळ येत आहे आणि प्रत्येकाचा न्याय लवकरच ठरणार आहे. सर्वांचा सार्वकालिक न्याय होणार आहे. सैतानाला आता समजून आले आहे की त्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून होता होईल तितक्या लोकांना तो फसवित आहे. लोकांना त्यांच्या दुष्टपणाच्या सर्व प्रकारच्या करमणूकीमध्ये गुंतवून ठेवित आहे. म्हणजे त्यांच्यासाठी दयेचे दार बंद होऊउन त्यांचा शेवट होईल. - द सदर्न वॉचमन ३ ऑक्टोबर १९०५. ChSMar 72.2
अत्याचाराने आपली मर्यादा जवळ जवळ गाठली आहे. गोंधळाने जग भरले आहे. मनुष्यावर लवकरच भयंकर आपत्ति येणार आहे. जगाचा शेवट अति जवळ आला आहे. आम्ही जे आम्हाला सत्य ठाऊक आहे. जी संकटे पुढे येत आहेत त्यांची तयारी करीत आहोत. कारण आता येथून पुढे जगावर अशा काही आश्चर्यकारक घटना आणि संकटे घडणार आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ८:२८. ChSMar 72.3
पूर्ण जगावर आता मलिनतेचे वर्चस्व होत आहे यावरुन आपण ओळखू शकतो की शेवटचे महान संकट आता जवळच आले आहे. देवाच्या आज्ञा आता जगभर पसरल्या आहेत. जेव्हा देवाच्या लोकांचा छळ होत असताना देवमध्ये हस्तक्षेप करतो. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन १७८. ChSMar 72.4
जगाच्या महान आणि पवित्र घटनांच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. भविष्यवाणी पूर्ण होत आहेत. स्वर्गीय पुस्तकामध्ये अनोळख्या घटनांचा इतिहास लिहिला आहे. जगाची शेवटची चळवळ नोंदली गेली आहे. लढाया होत आहे, लढायाच्या आवया येत आहेत. राष्ट्रे एकमेकांवर रागवली आहेत. मृत्युची वेळ आली आहे आणि त्यांचा न्याय येत आहे. घटना बदलत आहेत कारण देवाचा दिवस येत आहे. वेळ भरभर जात आहे. दिवस जवळ येत आहे एक एक मिनिट पुढे पुढे जात आहे, परंतु आता अगोदरच राष्ट्र राष्ट्रावर आणि राज्य राज्यावर उठली आहेत. आता सामान्यपणे एकत्रित येण्याचे दिवस संपले आहेत. देवाच्या सेवकांनी आता चारी दिशांचे वारे रोखून धरली आहेत ते केव्हाही ती सोडू शकतात. इतर देवदूतांनी देवाच्या लोकांच्या कपाळावर शिक्का मारण्याचे कार्य संपण्याची ते वाट पाहात आहेत. मग पृथ्वीचे सामर्थ्य मोठ्या लढाईसाठी आपला पवित्र पुढे घेईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:१४. ChSMar 73.1