ख्रिस्ती सेवा
कसोटीला समोर जाणे
शेवटच्या पवित्र कार्यासाठी थोडे महान लोक कार्यात गुंतले असतील. ते देवाचे घमेंडखोर व स्वतंत्र असतील आणि देव त्यांचा वापर करुन घेऊ शकत नाही. देवाचे विश्वासू सेवक आहेत. त्यांनी स्वत:ला कसोटी आणि चाळणीच्या काळात स्वत:ला स्पष्ट केले. आता मौल्यवान असे काही आहेत की ते लपलेले आहेत जे बालमर्तिच्या पाया पडले नाहीत. त्यांच्याकडे तो प्रकाश नाही जो त्याच्या चकचकीत प्रकाशाने तुमचे डोळे दीपून जातील, परंतु ते स्पष्टपणे आकर्षक व शुद्ध चमकदार असे बाह्यस्वरुप दिसून येते. असा हा ख्रिस्तीपणाचा स्वभाव दिसून येईल. दिवसा आपण आकाशाकडे पाहातो, परंतु आपणास तारे दिसत नाहीत. तारे तेथेच आकाशामध्ये असतात, परंतु प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून दिवसा उजेडी आकाशातील तारे आपणास दिसत नाहीत, परंतु रात्री त्यांचा तेजस्वी प्रकाश आपणास दिसून येईल. ChSMar 69.2
वेळ ही फार दूर नाही. जेव्हा प्रत्येक आत्म्याची कसोटी पाहिली जाईल. यावेळी मळातून व गाळातून सोने बाजूला काढले जाईल आणि मंडळी शुद्ध होईल. यावेळी अधार्मिक लोकांचे वागणे त्यांच्या वागण्यावरुन किंवा बाह्य स्वरुपाने स्पष्टच दिसते. त्यांचा खोटेपणाही स्पष्ट होतो तो त्यांच्या बोलण्यावरुन अनेक तारे त्यांच्या तेजस्वी गुणांमुळे स्पष्ट दिसतत. रात्रीच्या वेळी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा काही तारे तेजस्वी चमकदार दिसतात, तर बरेच तारे मंद दिसतात. निरुपयोगी ढग जेव्हा वाऱ्याने बाजूला सरतात तेव्हा आकाश शुभ्र दिसते. तसेच अधर्मी मनुष्य वरुन धार्मिक दिसतो, परंतु ज्याप्रमाणे अभ्रे दूर होतात ती वाऱ्याने उठून जाणाऱ्या भूसासारखी होतात, नाहीशी होतात. जे स्वच्छ पोशाख घालतात, परंतु ख्रिस्ताची धार्मिकता घालत नाहीत तेव्हा त्यांची स्वत:ची नग्नता उघडी पडते ती लज्जास्पद असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:८०,८१. ChSMar 70.1