ख्रिस्ती सेवा
मनोवेधक स्वप्न
२९ सप्टेंबर १८८६ मध्ये मला स्वप्न दाखविण्यात आले की मी मोठ्या जमावाबरोबर चालत होते. हा सर्व जमाव फळे पाहात होता. तेथे अनेक तरुण मुले आणि मुली होत्या. ते बोरे गोळा करण्यासाठी मदत करीत होते. बहुतेक आम्ही शहरामध्ये होतो आणि म्हणून तेथे थोडीच जमीन होती. परंतु शहराभोवती मोकळी जागा होती. तेथे सुंदर झाडांची लागवड करता येते. मोठी बाग करता येते. यासाठी सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तु भरुन पुढे पाठविण्यात आल्या होत्या. ChSMar 66.2
लवकरच सामानाची गाडी तेथे पोहोचली आणि आम्ही सर्वजण वेगवेगळ्या दिशेने फळे शोधण्यासाठी हिंडू लागलो. सामानाच्या गाडी भोवती सर्व प्रकारची झाडेझुडपे होती. या झाडांवर लहान मोठी सर्व प्रकारची फळे होती. अगदी शेंड्यापर्यंत फळे लगडलेली होती, परंतु सर्व मुडळी दूर कोठेतरी पाहात होती. मी जवळची फळे गोळा करीत होते, परंतु अति काळजीपूर्वक कच्ची व हिरवी फळे गोळा करण्यासाठी भिती वाटत होती. ही कच्ची फळे पिकलेल्या फळांबरोबर राहात होती. म्हणून मी केवळ एक किंवा दोनच बोरे उचलू शकले. त्या ...... मध्ये तेवढीच बोरे पिकली होती. ChSMar 66.3
काही चांगली व मोठी बोरे खाली पडली होती, परंतु अर्धी अधिक किड्यांनी व आळ्यांनी खाल्ली होती. “अरे रे” मी विचार केला, “जर या ठिकाणी आम्ही आधीच आलो असतो तर ही सर्व फळे सुरक्षित राहिली असती, परंतु आता खूप उशीर झाला आहे. तरीही मी ती फळे उचलली आणि पाहिले की त्यांच्यामध्ये काही चांगली आहे किंवा नाही. असो ही फळे जमीनीवरुन मी उचलली आणि पाहिले की त्यामध्ये चांगली फळे किती आहेत. संपूर्ण फळ जरी खराब झाले. कमीत कमी मी इतरांना दाखवू शकते की आपण लवकर आलो असतो तर अधिक चांगली फळे मिळाली असती. ChSMar 66.4
जेव्हा मी त्या ठिकाणी होते तेव्हा तेथे दोघे-तिघे भटकत आले. ते एकमेकांशी गप्पा मरीत होते. त्यामध्येच ते गुंतले होते. त्यांनी मला पाहिले आणि म्हणाले, “आम्ही सर्वत्र पाहिले परंतु आम्हाला फळे कोठेच मिळाली नाहीत.” माझ्या हातातील फळांकडे ते आश्चर्याने पाहात होते. “अशी मोठी व चांगली अनेक फळे येथील झुडूपामध्ये मिळतील.” त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि जितकी सापडतील तितकी सर्व फळे त्यांनी तिच्या हाती काही फळे दिली आणि म्हणाले, “हा भाग तुमचा आहे या झुडूपामध्ये असणारी सर्व फळे तुमची आहे, ती आम्ही गोळा करु शकत नाही. हे सर्व फळे तुमची आहेत.” परंतु मी म्हणाले, “काही फरक पडत नाही तुम्ही गोळा करु शकता. ही देवाची जमीन आहे आणि फळेही त्याची आहेत. ही तुम्हाला संधी आहे की ही फळे गोळा करायची.” ChSMar 67.1
परंतु लवकरच परत मी एकटी पडले. थोडावेळ मी त्या गाडीमध्ये हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज ऐकत होते. मी त्यांना गाडीतून बाहेर बोलाविले. “तुम्ही तेथे काय करीत आहात ?’ ते म्हणाले, “आम्हाला येथे काही बोरे मिळाली नाहीत.” आणि आम्ही आता थकलो आहोत व भूकही लागली आहे. म्हणून या गाडीमध्ये येऊन आम्ही विश्रांती घेत आहोत आणि जेवणही येथेच करु. नंतर आम्ही पुन्हा बाहेर जाऊ.” ChSMar 67.2
पण मी म्हटले, “तुम्ही अजून काहीच आणले नाही.’ आमच्या सर्व पुर्वटा तुम्ही खात आहात आम्हाला काहीही न देता. आता मी खाऊ शकत नाही. खूप फळे गोळा करायची आहेत. तुम्हांला ती मिळाली नाहीत कारण तुम्ही जवळून पाहिली नाहीत. झुडूपाच्या बाहेर ती नाहीत. तुम्हाला ती शोधावी लागणार. खरेच, तुम्ही मुठभरही गोळा करु शकत नाही, परंतु हिरवी बोरे काळजीपूर्वक पाहिली तर हिरवी बोरे निवडक मिळतील. ChSMar 67.3
लवकरच माझे छोटे भांडे बोरांनी भरुन गेले आणि मी गाडीकडे पाहिले. त्यांना मी म्हणाले, “ही फळे जी मी वेचली ती अति उत्तम आहेत. कारण मी ती जवळून वेचली आहेत, परंतु तुम्ही वेचलेली फळे ही ती निष्काळजीपणाने वेचली आहेत व ती यशस्वी होणार नाहीत.” ChSMar 67.4
मग सर्वजण माझी फळे पाहण्यासाठी आली. ते म्हणाले, “ही फळे उंचावरची असून खूप चांगली आहेत. आम्हाला वाटले नव्हते की इतक्या उंचीवर इतकी छान फळे असतील. आम्ही खालीच ही फळे पाहात होतो. म्हणून अति थोडीच फळे मिळाली. मग मी म्हणाले, “तुम्ही या बोरांची काळजी घ्याल का ? आणि चला माझ्याबरोबर उंच फांद्यावरील आणखी फळे शोधायला ?” परंतु त्यांनी या फळांची काळजी घेण्याची तयारी केली नव्हती. तेथे काही भांडी आणि पिशव्या होत्या, परंतु त्यामध्ये अन्न व धान्य होते. मी त्यांची वाट पाहून थकले आणि शेवटी विचारले तुम्ही फळे तोडायला येणार नाही ? मग तुम्ही त्यांची काळजी घेण्याची तयारी का केली नाही ? ChSMar 68.1
एक उत्तर आले, “सिस्टर व्हाईट, आम्ही आणखी फळे शोधण्याची अपेक्षा केली नव्हती. कारण तेथे खूप घरे होती आणि खूप काही कामे होती, परंतु तुम्ही इतक्या उत्साहाने फळे गोळा केली. आम्ही ठरविले की तुमच्या बरोबर यावे. आम्हाला वाटले की आम्हाला खाण्यासाठी भरपूर फळे आणू. आणि करमणूक करु. पण आम्ही काहची फळे गोळा करु शकलो नाही.” ChSMar 68.2
मी उत्तर दिले, “अशा प्रकारचे कार्य मला समजले नाही. मी पुन्हा त्या झुडूपाकडे जाणार आहे. अगोदरच दिवस खूप खर्च झाला आहे. लवकरच रात्र होईल आणि मग आम्हाला आणखी फळे गोळा करता येणार नाही. काही लोक माझ्या बरोबर आले परंतु काही लोक गाडीमध्येच थांबले.’ ChSMar 68.3
एके ठिकाणी काहीजण थांबले होते ते काहीतरी चर्चा करीत होते त्यांचा विषय महत्त्वाचा होता असे वाटत होते. मी जवळ गेले आणि पाहिले की एक मुलगा एका स्त्रीच्या कडेवर होता. तो सर्वांचे लक्ष स्वत:कडे आकर्षवून घेत होता. मी म्हणाले, “तुमच्याकडे थोडाच वेळ आहे आणि या वेळात तुम्ही चांगले काम करु शकता.’ ChSMar 68.4
अनेकांचे लक्ष चार चाकी गाड्यांच्या शर्यतीकडे आकर्षण आहे. त्याकडे धावत जातात ते थकले आणि गाडीत गेल्यावर त्यांना विश्रांतीला गरज होती. इतरांनी ही खाली गवतावर स्वत:ला झोकून देऊन विश्रांती घेतली. ChSMar 68.5
अशाप्रकारे दिवस सरला व थोडाच उरला. शेवटी मी म्हणाले, “बंधूंनो तुम्ही ही मोहीम अयशस्वी ठरविली आहे आणि अशाप्रकारे तुम्ही काम करीत राहिला तर तसेच होईल. तुमच्या अयशस्वीपणाचे मला नवल वाटत नाही. तुमचे यश किंवा अपयश हे तुमच्या कामावरच अवलंबून आहे. येथे काही बोरे आहेत मला जी सापडली आहेत. तुमच्यापैकी काहींनी खालच्या झुडूपामध्ये त्यांच्या शोधात राहिलात, परंतु अयशस्वी ठरले, परंतु उंचीवर असणारी झुडपे त्यांच्या जवळून निघून गेली. कारण ही फळे तेथे असतील अशी तुमची अपेक्षा नव्हती. तुम्ही पाहात की जी फळे मी गोळा केली आहेत ती मोठी आणि पिकलेली आहेत. थोड्या काळातच दुसरीही फळे पिकतील आणि आम्ही पुन्हा त्या झाडांकडे जाऊ. याच मार्गाने फळे गोळा करण्यासाठी आम्हाला शिकविण्यात आले आहे. तुम्ही जर गाडी जवळील झुडूपामध्ये फळे शोधली तर मला जितकी मिळाली तितकीच तुम्हांलाही मिळतील. ChSMar 68.6
आज आपण हा धडा शिकतो की आपण दयाळूपणाचे कार्य कसे करावे? आपण त्यांचे अनुकरण करु शकतो. देवाने ही फळे अगदी दाट झुडुपामध्ये मधोमध ठेवली आहेत. आणि ती तुम्ही शोधून काढावी अशी देवाची इच्छा आहे, परंतु तुम्ही सर्व खाण्यातच गुंतला, स्वत:ची करमणूक करण्यात गुंतला आहात. तुम्ही रानामध्ये फळे शोधण्याच्या इच्छेने आला नाही. येथून पुढे तुम्ही फळे मिळतील हा दृष्टीकोन ठेऊन आणि तसे ठरवूनच यावे. फळे शोधण्याची तुम्हला कळकळ असावी. तरच तुमचे कष्ट फळाला येईल. नाहीतर तुमचे श्रम वाया जातील. योग्य मार्गाने तुम्ही केलेली कामे इतरांना मार्गदर्शन होतील. फळांचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येकवेळी गाडीचा पुरवठा करणे सोपे नाही. गाडीमधून ही फळे तुमच्या घरी दरवेळी घेऊन जाणे शक्यनाही व तसेच ती तुमच्या कष्टचीही फळे आहेत. प्रथम तुम्ही फळे तोडण्यासाठी कष्टाळू असायला हवे. कारण बहुतेक बोरे तुमच्या जवळच असतात. आधी ती गोळा करा व मग दूरवरची पाहा. नंतर तुम्ही परत येता तेव्हा पुन्हा एकदा जवळच्या फळांकडे पाहा. अशा प्रकारे तुम्ही यशस्वी व्हाल. - गॉस्पल वर्कस् १३६-१३९. ChSMar 69.1