ख्रिस्ती सेवा
मंडळीमध्ये कार्य करणारे तरुण
तरुणपणातील कला यांची चांगली तयारी आणि प्रशिक्षण. यांची आमच्या मंडळीमध्ये गरज आहे. तरुण त्यांच्या भरपूर सामर्थ्याने खूप काही करु शकतील जो पर्यंत त्यांना मिळणाऱ्या सामर्थ्याचा वापर ते योग्य मार्गांनी करीत नाहीत तो पर्यंत त्यांचे आत्मिक जीवन समाधानी नसेल. ते इतरांनाही दुःखी करतील. - गॉस्पल वर्कर्स २११. ChSMar 47.4
जेव्हा तरुण त्यांची हृदये देवाला देतील, परंतु आपली जबाबदारी संपत नाही. त्यांना देवाच्या कार्यामध्ये गोडी लागायला हवी व त्यांनी देवाच्या कार्यासाइी काहीतरी करुन दाखविण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सुद्धा त्यांना सूचना द्या. त्यांनी किती कार्य करावे हे सांगण्याची गरज नाही. गुरुजीसाठी कसे कार्य करावे हे त्यांना शिकवावे. त्यांना प्रशिक्षण द्यावे. म्हणजे त्यांना शिस्त लागावी असे केले म्हणजे ख्रिस्तासाठी ते उत्तम प्रकारे ते आत्मे जिंकतील. तरुणांना नम्रतेचे धडे शिकविणे आवश्यक आहे. म्हणजे ते आपल्या सहकाऱ्यांना नम्रता शिकवितील. तरुणांच्या वेगवेगळ्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करोत तेही योग्य पद्धत वापरुन त्यांनी आत्मे जिंकावे. एखाद्याला काही हवे असेल तर इतरांनी त्याला सहाय्य करावे. म्हणजे ते देवाचे कार्य शिकतील. - गॉस्पल वर्कर्स, २१०. ChSMar 47.5