ख्रिस्ती सेवा
अध्याय २ : तरुणांना पाचारण
ईश्वरी नियुक्ति
परमेश्वराने तरुणांना आपल्या सहाय्यासाठी त्यांची नियुक्ति केली. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:६४. ChSMar 47.1
आपले तरुण हे सैन्यासारखे कामगार आहेत. त्यांची पूर्ण तयारी करण्यात आली, कार्यासाठी सिध्द करण्यात आले. वधस्तंभावरचा संदेश, ख्रिस्ताचे मरण, पुनरुत्थान आणि तारणाऱ्याचे परत येणे हा संदेश सर्व जगभर लवकरच पसरेल. - एज्युकेशन २७१. ChSMar 47.2
आज आमच्याकडे तरुण सैन्य आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले तर ते हे कार्य उत्तम प्रकारे करतील. आमच्या मुलांनी सत्यावर विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे. देवाचा आशीर्वाद त्यांना मिळावा असे आम्हाला वाटते. आमची इच्छा आहे की तरुणांनी पूर्व नियोजित योजना करुन इतर तरुणांना सुद्धा सहाय्य करुन त्यांना या कार्यामध्ये सामावून घ्यावे. म्हणजे ते योग्य प्रकारे कार्य करतील. त्यांची अशा प्रकारे तयारी करुन घ्या की ते उत्तम प्रकारे आपले सत्य लोकांसमोर सादर करतील. त्यांना ते आशेचे कारण देतील आणि शाखेमध्ये ते शिक्षण घेऊन देवाचे कार्य करतात व यामुळे ते देवाचे गौरव करतील. - जनरल कॉन्फरन्स डेली बुलेटिन, २९ जानेवारी १८९३. ChSMar 47.3