ख्रिस्ती सेवा

246/256

अपयशामुळेच्या भितीचे उच्चाटन

कार्यातील अपयशाबद्दल ख्रिस्ताच्या कामकऱ्यांनी विचार करु नये व त्याची वाच्यता करु नये. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्टीमध्ये बल संपन्नता आहे. त्याचा आत्मा आपली प्रेरणाशक्ति असावी आणि जीवनी प्रकाशाचे माध्यम म्हणून आपण स्वत:स त्याला समर्पण करतो तेव्हा चांगल करण्याची आपली कृति कधीच थकरणार नाही, मलूल होणार नाही. आपण त्याच्या पूर्णत्वावर भाव ठेवावा आणि त्यांची कृपा मिळवावी जी अनंत आहे. - गॉस्पल वर्कर्स १९. ChSMar 300.1

जेव्हा आपण स्वत:स परमेश्वराला समर्पित करता. त्याच्या निर्देशानुसार कार्य करता, तेव्हा आपल्या यशस्वीततेची तो जबाबदारी घेतो. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल किंवा नाही असा आपण अंदाज करावा असे तो करु देत नाही. आपण कधीच आपल्या उपयशाचा विचारही करु नये. म्हणजे आपल्याला अपयश येईल असा विचारसुद्धा आपण करु नये. कारण आपण ‘त्या’ला सहकार्य करत आहोत ज्याला ‘अपयश’ भावूकच नाही. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३६३. ChSMar 300.2

लोक स्वत:ची कमी कदर करतात तेव्हा परमेश्वराला वाईट वाटते त्याने निवडलेले व वारसा असलेल्यांनी त्यांच्या झुल्य किंमतीप्रमाणे रहावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराला आपण पाहिजे आहोत. तसे नसते तर आपल्या मुक्तिचे महागडे कार्य पूर्ण करण्यास त्याने स्वत:च्या एकुलत्या एक मुलाला पाठवलेच नसते. आपल्या करीता त्याला स्वतःचा वापर करावयचा आहे आणि आपण यापुढे आपल्या मोठ्यातल्या मोठ्या मागण्या सादर करतो. त्यावेळेस त्याला छान वाटत. कारण अशाने त्याचे नाम सुवंदीत होते. त्याच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांनी त्याला मोठ्यातल्या मोठ्या मागाव्यात. - द डिझायर ऑफ एजेस - ६६८. ChSMar 300.3