ख्रिस्ती सेवा
स्वर्गिय संस्थाचे सहकार्य
देवदूताच्या कामगिरी विषयी आपल्याला जे ठावूक आहे त्याही पेक्षा जास्त माहितीची गरज आहे. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की परमेश्वराच्या प्रत्येक लेकरास स्वर्गिय अस्तित्वा तर्फे सहकार्य लाभते. विनम्र व हीन, जे परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतात व मागणी करतात त्यांच्याकरिता तेज व सामर्थ्याने युक्त असलेले ‘अदृष्य सैन्य’ हजर असते. परमेश्वराच्या उजवीकडे करुन, सराफीय व सामर्थ्याने भरलेले दूत उभे असतात. ते तारणाचे उतराधिकारी आहेत. त्यांच्यातर्फे सुवार्ता करण्याकरिता सर्व सुवार्तिक आत्मे पुढे पाठविले जातात. TFTC - १५४. ChSMar 296.4
ख्रिस्त आपला धनी आहे हे लक्षात घ्या. पेरलेल्या बीजांना तो फवारतो. तो तुमच्या मनात अशी वचने घालतो जी हृदयापर्यंत पोहोचतात. TFTC - ९:४१. ChSMar 296.5
जे दृढ विश्वासाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, जे परिपूर्ण कृतिमध्ये रुपांतरीत होईल, त्याचा शोध घेत असतात. अशा मानवी वाहकासाठी स्वर्गिय चातुर्य कार्य करते. या कार्यात असणाऱ्या प्रत्येकास ख्रिस्त म्हणतो, “तुमच्या मदतीस मी तुमच्या उजव्या हाताशी ‘सिद्ध’ आहे.” - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३३२. ChSMar 296.6
मनुष्याची दृढ इच्छाशक्ति परमेश्वराच्या इच्छेस सहकार्याची असेल तर ती सर्वशक्तिमान बनते. जे घडावे अशी त्याची इच्छा असते ते त्याच्या सामर्थ्यात परिपूर्ण होते. त्याच्या आज्ञा सक्षम आहेत. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३३३. ChSMar 297.1
विनावगर्तेकडे निघालेल्या आत्म्यासाठी कार्य करीत असताना तुमचे जोडीदार देवदूत असमान - हजारोच्या हजारो आणि हजारोंच्या दसपटीमध्ये परमेश्वराचे दिव्यदूत पवित्र मंडळीच्या सहकार्याची वाट पहात असतात. जेणे करुन जो दिव्य प्रकाश परमेश्वराने अपरिमितपणे दिलेला आहे, त्यांचे दळणवहण व्हावे, ज्यायोगे ख्रिस्ताचा पूणरपी येण्याच्या वेळेस लोकांनी ‘तयार’ असावे. TFTC - ९:१२९. ChSMar 297.2
ह्या कार्यासाठी सर्व स्वर्गिय दूत सहकार्यारिता अगदी तयार आहे. जो नाशगर्तेकडे जात असताना त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्या हाताशी सर्व स्वर्गिय साधनसामग्री आहे. निष्काळजी व कठिण हृदयाच्या लोकापर्यंत पोहचण्याकरीता देवदूत तुम्हला सहकार्य करतील. आणि त्यातला एक जरी परमेश्वराकडे वळला, तर स्वर्गात हर्ष होतो. देवदूत व ........ आपल्या सोनेरी विणेस स्पर्श करुन परमेश्वरास व कोकऱ्यास गीत गातात. त्याच्या दयेविषयी व प्रीतीयुक्त दयाळूपणाविषयी ते गीत गातात जी त्याने मनुष्याच्या पुत्रांनी दिली आहे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - १९. ChSMar 297.3
ज्याला गालील प्रांताचा मच्छिमार असे नाव देण्यात आले होते तो आजही त्याच्या कार्यासाठी आपल्याला साद घालत आहे आणि जे सामर्थ्य त्याने प्रारंभीच्या शिष्यांना दिले होते तेच दैवी सामर्थ्य आपल्या तर्फे उर्जित करण्याची त्याची अपेक्षा आहे. आपण कितीही उणे किंवा पापीष्ट असलो तरी परमेश्वर आपल्यासोबत भागीदारी करण्यास इच्छुक आहे. ही भागीदारी म्हणजे ख्रिस्ताचे प्रशिक्षणार्थी होणे होय. त्याच्या दैवी मार्गदर्शनाखाली आपण यावे यासाठी तो आपल्याला आमंत्रण देतो. ख्रिस्तासह आपण परमेश्वराचे कार्य करु शकतो. - द डिझायर ऑफ एजेस - २९७. ChSMar 297.4
ख्रिस्त जे त्या समवेत जीवनक्रम घालवित आहेत त्यांचीच कदर करतो असा विचार करु नका आणि असाही विचार करु नका की तो फक्त त्यांनाच भेटतो (जसा योहानास भेटला) जे त्याच्या प्रित्यर्थ कष्टात व परीक्षेत जगत आहेत. तो विश्वासु लोकांना शोधून काढतो व त्यांना सामर्थ्यवान व धीरोदत्त बनवितो. आणि परमेश्वराचे दूत जे सामर्थ्याने भरलेले आहेत त्यांना मनुष्य मात्राच्या मदतीकरीता पुढे पाठविले जाते त्यांना सुवार्ता सांगण्यास पाठविले जाते जे ‘सत्य’ वचन सांगतात अशांना, की जे अनभिज्ञ आहेत. TFTC - ८:१७. ChSMar 297.5
पूर्ण स्वर्ग कृतिपूर्ण झाला आहे आणि ज्याकरिता ख्रिस्त मरण पावला त्यांनी तारणाची आनंदी वार्ता ऐकावी यासाठी जे योजना आखत आहेत त्यांचे सहकार्य करण्यासाठी परमेश्वराचे दूत वाट पहात आहेत. तारणाचे उत्तराधिकारी ज्यांना देवदूत ....... करतात ते खऱ्या संताना सांगतात “तुम्ही हे काम करावे” “जा, उभे रहा, आणि बोला... सर्वजनास जीवनी वचनाबद्दल सांगा’ प्रेषितांची कृत्ये ५:२०. जर त्यांनी या आज्ञेचे पालन केले तर परमेश्वर त्यांच्याकरिता मार्ग तयार करील व त्यांनी कोठे जायचे त्या करिता सर्व साधने उपलब्ध करुन देईल. TFTC - ६:४३३, ४३४. ChSMar 298.1
आताच्या काळामध्ये देशाच्या लेकरांनी इतरांच्या मदतीसाठी कृतिशील असायला हवे. पवित्र शास्त्राच्या वचनाचे ज्यांना आकलन आहे त्यांनी अशा स्त्री-पुरुषाचा शोध घ्यावा जे प्रकाशाकरिता उत्सुक आहेत. परमेश्वराचे दूत त्यांच्याकडे लक्ष देतील आणि जेथे देवदत जातील तेथे मार्गक्रमण करण्यास कसलीही भिती नसावी. प्रामाणिक कामकऱ्याच्या विश्वासू प्रयत्नांची परिणीती म्हणून बहुतांनी मुर्तिपूजा सोडून जिवंत पित्याची आराधना सुरु करु शकतील. मुर्ति पुजा सोडून जिवंत पित्याची आराधना सुरु करु शकतील. बहुतजण मनुष्यनिर्मीत व्यवस्थास नवस करावयाचे सोडून जीव ते परमेश्वर व त्यांचे नियम काटेकोरपणे पालन करण्यास सिद्ध होतील. - प्रोफेटस अॅन्ड किंग्ज - १७१. ChSMar 298.2
स्वर्गिय सामर्थ्याचे मूलाधार आताची युद्धजन्य परिस्थिती न्याहाळत आहेत, त्यावर लक्ष ठेवून आहेत. जी सध्या निराशाजनक वाटत आहे. परमेश्वराच्या कार्यकर्त्याचे कार्य चालूच आहे. आपल्या मुक्तीदात्याचा झेंडा मिरवीत आणखी शिखरे पादाक्रांत करावयाची आहेत, आणखी सन्मान मिळवावयाचा आहे. विश्वासाने या युद्धामध्ये पुढेच जावयाचे आहे, परमेश्वरा प्रित्यर्थ विश्वासू व नम्र सेवकासाठी देवदूत मदतीकरिता हजरच आहेत. आणि पृथ्वीखालील कार्यकर्त्यांचे सैन्य जेव्हा परमेश्वराची स्तुतीस्तोत्रे गातील तेव्हा स्वर्गिय देवदूताचे सैन्य ही त्यात आपला स्वर मिसळवून हे दोघे ही पिता परमेश्वर व पूत्र यासाठी स्तूतिगीत गातील. TFTC - १५४. ChSMar 298.3
कार्यसिद्धी मानवीय शक्तिमुळे होत नसते. स्वर्गिय सामर्थ्य मानवी माध्यमातून कार्य करते तेव्हा जे परिपूर्ण होते. पौल बी पेरतो आणि आपूलोस त्याला पाणी घालतो असे असले तरी त्याची वाढ करणे परमेश्वराच्या हाती आहे. मानव परमेश्वराचा कार्यभाग स्वतः करु शकत नाही. तो मानवी माध्यम असून दैवी प्रतिभांशी सहकार्य करु शकतो आणि विनम्रपणे, साधेपणाने तो ते कार्य उत्कृष्टरित्या करु शकतो. तो हे जाणतो की त्याचा धनि हा उत्कृष्ठ कामकरी आहे. कामकऱ्याचा अंत जरी झाला तरी कार्याचा अंत होत नसतो, तो पूर्णत्वास नेऊनच थांबतो. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - नोव्हेंबर १४, १८९३. ChSMar 299.1
ख्रिस्ती मनुष्यास परमेश्वर बळकट मदतनीस देतो. हे आम्हाला ठावू आहे, जरी तो कशाप्रकारे मदत करतो याची आपल्याला कल्पना नाही. त्यांची परिपूर्णता स्वर्गिय प्रतिभायुक्त सामर्थ्याने मानवी माध्यमातून होते. जे त्याच्यावर विश्वास ठेवात त्यांना तो सोडत नाही. त्यांनी अडखळू नये व सैतानी पाशात पडू नये म्हणून परमेश्वर त्याचे मार्ग सरळ करतो. ते परमेश्वरावरील विश्वासात स्थीर असतात व कोणतीही कठिण परिस्थिती त्यांना विचलित करु शकत नाही. ते त्याला हवे तसे कार्य करुन घेण्यास त्यांना ते पुरवितो. - प्रोफेटस अॅन्ड किंग्ज ५७६. ChSMar 299.2
जे सुवार्ता प्रसारामध्ये आहेत ते परमेश्वराचे मदतनिस आहेत. ते देवदूताचे सहकारी आहेत. त्यापेक्षाही ते मानवी माध्यम आहेत. ज्या योगे देवदूत आपले सुवार्ताकार्य पूर्ण करतात. त्यांच्या मुखातून देवदूत बोलताना व त्यांच्या हाता तर्फे कार्य करतात. स्वर्गिय संस्थाशी सहकार्य करणारे कामकरी त्यांचा अनुभव व शैक्षणिक पातत्रा या योगे सन्मान पावतात. - एज्युकेशन - २७१. ChSMar 299.3
ख्रिस्त ‘त्याच्या खरेपणाचे’ चिखलत स्त्रीया व पुरुषांनी घालावे व कार्य करावे यासाठी आमंत्रीत आहे. तो म्हणतो, “मी तुमच्या मदतीकरीता तुमच्या उजव्या हातास तयार आहे” तुमची फरफट व तुमची गोंधळाची स्थिती परमेश्वरास सांगा. तो तुमचा आत्मविश्वास कदापि ढळू देणार नाही, ख्रिस्त प्रभूस त्याने मोलाने घेतलेल्या व्यतिरिक्त काहीच नाही. मौल्यवान नाही. त्यांची मंडळी, त्याचे कामकरी जे सत्य वचनाचे की सर्वत्रपसरत निघाले आहेत. ते प्रभूविषयी विचार करतात. तो तर त्याच्या पवित्रस्थानी विराजमान आहे. एकांतवासात नव्हे, तर अगणीत देवदूतांच्या सान्निध्यात आहे जे त्याच्या आज्ञापालना करिता सज्ज आहेत आणि तो त्यांना अज्ञा देतो की जो अगदीच शक्तिहीन संत आहे त्याकडे जा व त्यांच्या तर्फे कार्य करा. उच्चनिच, श्रीमंत वा गरीब ह्या सर्वांना अशीच मदत पुरविली जाईल. - द सदर्न वॉचमन - नोव्हेंबर ७, १९०५.. ChSMar 299.4