ख्रिस्ती सेवा
प्रारंभापासून पवित्र आत्म्याचा कार्यरतपणा
उत्पत्तिपासूनच परमेश्वर उपेक्षिताकरिता मानवी माध्यमातून पवित्र आत्म्याद्वारे कार्य करीत आहे. धर्मोपदशेकाच्या जीवीत क्रमावरुन हे स्पष्ट होते. अरण्यात देखील सर्व लोकांकरिता मोशेला परमेश्वराने चांगल्या आत्म्याचे दान त्या लोकांच्या मार्गदर्शनाकरिता दिला होता. त्याने आपल्या मंडळी करीता पवित्र आत्म्या तर्फे प्रतिनिधीत्व केले होते. आणि हेच सामर्थ्य ज्याने धर्मोपदेशकास पवित्र बनविले होते, हेच सामर्थ्य ज्यायोगे कालेव यशोशवास विश्वास व धैर्य प्राप्त झाले होते आणि हेच सामर्थ्य ज्यायोगे सर्व शिष्य मंडळी परिणामकारक झाली होती. प्रभावशाली झाली होती आणि याच सामर्थ्याने आतापावेतोच्या प्रभूच्या लेकरांना समर्थन दिले आहे. हेच सामर्थ्य ज्यायोगे वॉलदेन्सीयन ख्रिस्ती लोकांनी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अंधार युगामध्ये सुधारणेच्या चळवळी करिता मागे तयार केला होता. हेच ते दैवी सामर्थ्य ज्यायोगे आधूनिक सुवार्ता प्रसारक मंडळाची निर्मिती यशस्वी करण्यास थोर स्त्रीचा व पुरुष यांना पाठबल दिले. हेच ते सामर्थ्य ज्या योगे पवित्र शास्त्र निरनिराळ्या भाषेत निरनिराळ्या बोली मध्ये, सर्व राष्ट्रात, सर्व लोकांत भाषांतरीत झाले. TFTC - ५३. ChSMar 294.1