ख्रिस्ती सेवा

239/256

यश प्राप्तीची पात्रता

‘पवित्र आत्मा’ परमेश्वराच्या संवकांना जेव्हा सन्मान व जेवढे वैभव त्याच्या सत्याची घोषणा करीत असताना देतो तेवढ या जगातील सन्मान व वैभव देऊ शकत नाही. TFTC - ५. ChSMar 291.2

आपण आपल्याच शक्तिने त्याचे कार्य करावे असे परमेश्वराची इच्छा नसते. मनुष्याच्या कुवती पलीकडच्या कार्यासाठी त्याने दैवी सहकाऱ्यांची नियुक्ति केलेलीच आहे. संकटासमयी आपल्याला आपली आशा व परमेश्वरा विषयीची हमी आणखी सामर्थ्यवान व्हावी या करिता तो ‘पवित्र आत्मा’ पाचारण करतो. ज्यामुळे आपले मन हर्षित होते व हृदय शुद्ध बनते. - द सदर्न वॉचमन ऑगस्ट १, १९०५. ChSMar 291.3

‘पवित्र आत्मा’ उतरल्यानंतर, त्यांच्या शिष्याचे हृदय ख्रिस्ताप्रती व ज्याच्याकरिता त्याने मरण सोसले त्या बद्दल एवढे मन भरुन गेले की त्यांनी केलेल्या वक्तव्याने व प्रार्थनेने त्या सर्वांची मने ओथंबून गेली. त्यांनी ‘आत्म्याने’ प्रेरित होवून, त्याच्या सामर्थ्यांच्या प्रभावाने सुवार्ता केली व हजारोंचे तारण झाले. TFTC - २२. ‘स्व’ ला फाटा देवून, हृदयामध्ये ‘पवित्र आत्म्यास’ जागा देवून आपल आयुष्य परमेश्वराला समर्पण करणाऱ्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. - द सदर्न वॉचमन, ऑगस्ट १, १९०५. ChSMar 292.1

पेन्टेकॉस्ट दिवशी पवित्र आत्म्यांचा वर्षाव झाला त्याची परिणीती काय झाली ? तर सर्व जगास त्यांच्या तारणकर्त्या संबंधी आनंदास उधान आले. त्यांनी केलेल्या कष्टामुळे अनेकजण मंडळीमध्ये सामील झाले. त्यांनी परमेश्वराची सुवार्ता ऐकून आपले आयुष्य त्याच्या कार्यास प्रदान केले आणि आशेने त्याचे मन शांती व आनंदाने भरुन गेले. बहुतांनी त्याच्या संदेशाची घोषणा केली ती अशी ‘परमेश्वराचे राज्य नजिक आले आहे’ अशांची हिम्मत कोणत्याही दहशतीस भीक घालणार नाही. परमेश्वर त्याच्या मुखाने बोलला आणि जेथे कोठे ते गेले, तेथे रुग्ण बरे झाले आणि परमेश्वराची सुवार्ता अनुकपनी या पर्यंत पोहोचली. पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली जेव्हा आपण स्वत:ला अर्पण करतो तेव्हा त्याचे कार्य अमर्यादित होते. - द सदर्न वॉचमन - ऑगस्ट १, १९०५. ChSMar 292.2

‘पवित्र आत्मा’ आपल्या आत्मीक जीवनाचा ‘श्वास’ आहे. पवित्र्य आत्म्याची भागीदारी म्हणजे ख्रिस्ताच्या जीवनाशी केलेली भागीदारी आहे. हे स्विकारणाऱ्या प्रत्येकास ख्रिस्ताच्या ‘श्रेया’ मध्ये भागीदारी मिळते. जे परमेश्वरामध्ये शिक्षीत करण्यात आलेले आहेत. जे आत्म्याच्या प्रेरणेने कार्य करतात, ज्यांच्या तर्फे ख्रिस्तासम जीवन उजागर झाले आहे. तेच पवित्र मंडळीचे प्रतिनिधी म्हणून ख्रिस्त सुवार्तस ‘सिध्द असतील. - द डिझायर ऑफ एजेस - ८०५. ChSMar 292.3

लवकरच ठराविक व तत्पर बदल होणार आहेत आणि आणीबाणीच्या काळात स्वर्गिय ज्ञान प्राप्तीस आणि जगातील मुल्ये खच्चिकरण होत असता त्याचा प्रतिबंध करण्याच्या कामी परमेश्वराच्या लेकरांना कामयस्वरुपी देणगी रुपाने पवित्र आत्म्याचा वर्षाव परमेश्वर करणार आहे. जर मंडळी निद्रीस्त नसेल, जर ख्रिस्ताचे अनुयांची प्रार्थनेत तत्पर असतील तर शत्रुच्या (सैतानाच्या) कारवायाचे आकलन होण्यास व प्रतिबंध करण्यास दैवी ज्ञानाचा प्रकाश मिळेल. TFTC - ६:४३६. ChSMar 292.4