ख्रिस्ती सेवा
(पवित्र आत्मा) प्राप्तीची अट
जीवनाची भाकरी आपल्या शेजाऱ्यास देवू शकू याकरिता परमेश्वराकडे जे विनवणी करत आहेत, त्या सर्वांना पवित्र आत्म्याचे दान मिळेल. TFTC - ६:९०. ChSMar 289.5
ख्रिस्ताच्या एकतेमध्ये आपण आपले हृदय समर्पण करतो आणि आपले जीवन त्याचे कार्य करण्यात सौख्य मिळण्यास व्यतित करतो तेव्हा पेटेलॉस्टच्या दिवसाप्रमाणे पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल. TFTC - ८:२४६. ChSMar 289.6
त्याची कृपा पृथ्वीवर ओसंडून वहावी याकरिता परमेश्वराकडून कोणतीही आडकाठी नाही. - ख्राईस्टस् ऑब्जेक्ट लेसन्स ४१९. ChSMar 290.1
आपली मागणी व प्राप्ती या करिता पवित्र आत्मा उत्सुक आहे - खाईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स १२१. ChSMar 290.2
दैवी सामर्थ्य प्राप्तीची ही साधने असताना आपण पवित्र आत्म्याच्या दानाकरिता भूकेले व तहानेले का असू नये ? आपण त्याबद्दल का न बोलावे? का प्रार्थना करु नये ? आणि त्या संबंधी सुवार्ता का सांगू नये ? TFTC - ५०. ChSMar 290.3
आपल्याला मिळालेल्या वचनाची पूर्तता होत नाही असे आपल्या लक्षात आल्यास हे पाहिले पाहिजे की पवित्र आत्मा प्राप्ती कमी प्रमाणात स्विकारली गेली आहे किंवा त्याचे स्वागत योग्य प्रकारे झालेले नाही. जर सर्वांचीच इच्छा असेल तर पवित्र आत्म्याचा वर्षाव सर्वांवर अवश्य होईल. TFTC - ५०. ChSMar 290.4
प्रत्येक कामकऱ्याने प्रतिदिनी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होण्यासाठी देवापुढे याचिका सादर करावी. ख्रिस्ती मंडळीच्या कामकऱ्यांनी, आपल्या योजनाची आखणी व अंमलबजावणी योग्या प्रकारे करता यावी याकरिता एकत्र येवून एक विशेष मागणी जी की ‘स्वर्गीय शहापणा’ची विनंती परमेश्वरापुढे सादर करावी. विशेषतः सुवार्ता कार्यासाठी जे दूत निवडलेले गेले आहेत त्यांना पवित्र आत्म्याने भरुन टाकावे यासाठी प्रार्थना करावी. TFTC - ५०:५१. ChSMar 290.5
सर्व ख्रिस्तीजणींनी मतभेद बाजूस ठेवावे आणि स्वत:ला परमेश्वरास अर्पण करावे या करिता की हरवलेल्या आत्म्यांची त्यांच्याकडून सूटका व्हावी. त्यांनी विश्वासाने वचनपत्र आशिर्वाद मागावे आणि निश्चीतच ते मिळतील. TFTC - ८:२१. ChSMar 290.6
अनुयायांनी स्वत: करिता आशिर्वाद मागितले नाहीत. ते त्यांनी इतरांचे ओझे वाहिले होते. सूवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात जावी या करिता पवित आत्म्याचा वर्षाव व्हावा असे त्यांनी मागितले आणि पवित्र आत्म्यांचा वर्षाव झाला आणि हजारोंचे एकाच दिवशी धर्मांतर झाले. - द सदर्न वॉचमन, ऑगस्ट १, १९०५. ChSMar 290.7
पवित्र मंडळीस पवित्र आत्म्याची देणगी देण्यास ख्रिस्त वचनबद्ध आहे आणि ही वचनबद्धता ज्याप्रमाणे प्रारंभीच्या शिष्यांकरिता होती तीच आपल्या करिताही आहे, परंतु सर्व वचनाप्रमाणे इथेही काही अटी आहेत. बहुतेक लोक परमेश्वराच्या वचन बद्धतेवर विश्वास ठेवतात व त्याचा प्रचार ही करतात. तरीही त्यांच्या पदरात काही पडत नाही. कारण ते दैवी प्रतिनिधी (ख्रिस्त) कडून चालना घेण्याकरिता आपल्या आत्म्याचे समर्पण करीत नाहीत. आपण पवित्र आत्म्याचा उपभोग करु शकत नाही. तर ‘पवित्र आत्मा’ आपला उपयोग करत असतो. जरी तो आपल्या अनुयाया तर्फे त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यास आनंद पावतो. तरी बहतेकास हे मान्य नाही. त्यांना सर्व स्वत:च्या जबाबदारीने करावयाचे आहे. म्हणून त्यांना ही ‘स्वर्गिय देणगी’ मिळणे दुरापास्त होते. जे नम्रपणे देवावर अवलंबून आहेत आणि जे त्याच्या दयेची वाट पहातात त्यांनाच ‘पवित्र आत्मा’ मिळेल. परमेश्वर अशांच्या ‘मागणी व प्राप्ती’ याकरिता उत्सुक असतो. विश्वासाने मागणी केलेली त्याची कृपा तिच्या सोबत आणखीन कृपा तिच्या सोबत आणखीन कृपा आणते. परमेश्वराच्या संपन्नतेप्रमाणे ख्रिस्ताच्या दयेमध्ये ही कृपा त्यांना मिळते. आपल्या ‘प्राप्तीच्या’ क्षमतेनुसार कृपा देण्यास तो तयार आहे. - द डिझायर ऑफ एजेस ६७२. ChSMar 290.8
सर्व विश्वास आपल्या वैभवाने प्रकाशमय करणारा पवित्र आत्म्यांचा वर्षाव परमेश्वरा सोबत कष्ट करण्याचा अनुभव घेवून प्रकाशित झाल्याशिवाय होणार नाही जेव्हा आपण पूर्ण मनाने परमेश्वराच्या कार्यास स्वत:स समर्पित करतो, परमेश्वर त्याची जाण ठेवून आपल्यावर अगणीत पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो, परंतु मंडळीतील अधीकतम लोक जर परमेश्वरासोबत कार्य करीत असतील तरच. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, जुलै २१, १८९६. ChSMar 291.1