ख्रिस्ती सेवा

199/256

अनाथाची काळजी

विजयी होऊन मृत्युस कवटाळण्या पूर्वी आपण अनाथांची काळजी घेणे जरुरी आहे. आपल्या मंडळीत त्याच्याप्रति दया - दृष्टी, अनूकंपा नसेल तर त्या ....... एक नव्हे अनेक संकटांचा सामना करावा लागेल. परमेश्वर आपल्याला सांगतो ‘गरीब जे समाजा बाहेर फेकले गेले आहेत त्यांना घरी आणा.’ आपल्या प्रार्थनेत व कृतित विधवा व अनाथ या बद्दल सहानुभूती हवी - परमेश्वर याची आठवण ठेवेल व त्याचे बक्षीसही मिळेल व रिव्ह्यु अॅन्ड हेरॉल्ड - जुन ७ - १८९३. ChSMar 253.4

तेव्हा तुम्ही गरिबांवर दया करता, गांजलेल्यास सहानुभूति दाखवता, दानलेल्यांना मदत करता. अनाथांशी मैत्रीच नात जोडता - तुम्ही ख्रिस्ता बरोबरच नात आणखीन बळकट करता. TFTC - २:२५ ChSMar 253.5

अनाथांची काळजी घेणे गरजेचे आहे, परंतु कित्येक जण असे करण्यास इच्छुक नसतात. कारण आपल्याला वाटते एवढे सोपे काम नसते त्यात बरेच कष्ट असतात. त्यांना अनाथासाठी देण्यासाठी फार कमी वेळ असतो, परंतु आपला राजा याची छाननी करेल आणि हे निरुत्साही, स्वार्थी, कुचकामी आत्मे पाहीन आणि त्यांना धडा मिळेल की स्वर्गाचे राज्य काम करण्याऱ्यासाठी व ज्यांनी ख्रिस्ताकरिता स्वत:ला नाकारले आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी स्वत:साठी, स्वत:ची काळजी घेण्यासाठीच आपल आयुष्य घातलं आहे त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये कोणतीच तरतूद केलेली नाही. त्यांच्या डाव्या बाजूस असनाऱ्यांची अशी भयानक शिक्षा असेल. ही शिक्षा त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल किंवा त्यांनी काहीतरी केले आहे यासाठी नव्हे तर त्यांनी काहीच केल नाही ह्यासाठी आहे. त्यांना स्वर्गातून ज्या गोष्टी करण्यास सांगीतल्या त्या त्यांनी केलेल्या नाहीत. त्यांनी स्वत:चेच रजन केले. त्यांच्या वाटा स्वत:चे रंजन करणाऱ्या सोबत असेल. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - ऑगस्ट १६-१८८१. ChSMar 253.6

अनाथ हे प्रभुने आमंत्रीत केलेले लोक आहेत, त्याचे अनुयायी त्याचा स्विकार परमेश्वरावरील निष्ठेने करतात. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. भले ते अस्वच्छ, फाटक्या कपड्यातले आणि सर्वतोपरी अनाकर्षक आहेत, पण ते देवाची मालमत्ता आहेत. त्यांना विकत घेण्यात आले आहे आणि ते प्रभूच्या दृष्टित अनमोल आहेत. ते देवाच्या घरची मुले आहेत. आणि ख्रिस्ती म्हणून आपली जबाबदारी आहेत. तो म्हणतो, ‘असे आत्मे मी तुमच्या हाती दिले आहेत. द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - जून १७-१८९३. ChSMar 254.1

जे अनाथ, पितृहीन, लंगडे, अंधळे, रुग्ण अशाकडे दुर्लक्ष त्यांच्याप्रार्थनेस प्रभू प्रतिसाद देणार नाही. TFTC - ३:५१८. ChSMar 254.2

अशा अनाथ, अंध इ.साठी कार्य करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जी आपल्या ‘गुरुजी’ची इच्छा आहे त्याप्रमाणे करण्यास बराच वाव आहे आणि हे केल्याने आपणास देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. बरीच दुर्दैवि मुले असे जीवन जगत आहेत की ज्याचा शेवट गुन्हेगारी कडे जातो. त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे आणि ख्रिस्तासम जिव्हाळ्याच्या वागणूकीने त्यांची अशा कृत्यातून सोडवणूक करुण ख्रिस्ताकडे सोपवा. अशा कार्यासाठी कष्ट, ‘स्व’ ला फाटा देणे, त्याग याची गरज आहे. आपला हा छोटासा त्याग, परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पूत्राचा केलेला त्याग यात तुलना होवू शकेल का ? तरीही परमेश्वराने आपल्याला ख्रिस्ता सोबतचे कामकरी होण्यासाठी संधी दिलेली आहे. द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - जून २७ - १८९३. ChSMar 254.3