कलीसिया के लिए परामर्श
एकी करण्याचें उदहारण
कांहीं वर्षांमागे येण्यावर विश्वास ठेवणारे थोडे होतें व तें टॉमशॉम मेन येथील शब्बाथ पाळणारे स्टॉकब्रीज हावलँड यांच्या घराच्या स्वयंपाक खोलींत प्रार्थनेसाठी गोळा झाले. एके शब्बाथ दिनीं सकाळी भाऊ हावलंड गैरहजर होता तो नियमितपणे येणारा असल्यामुळे आम्हांला नवल वाटले. लवकरच तो आत आला व त्याचा चेहरा देवाच्या गौरवाने प्रकाशित झाला होता, तो म्हणाला, भावानो, मला सापडले आहे. देवाच्या वचनात जी खात्री दिली आहे. तिच्यावरून आपण एक गोष्ट करूं शकतो ती मला सापडली आहे. ती म्हणजे, “तुम्ही कधींही पडणार नाहीं.” मी तुम्हांला याविषयी सर्व सांगतों. CChMara 132.4
त्यानें आम्हांला सांगितलें कीं, त्यानें एका भावाला पाहिलें. तो एक गरीब कोळी होता व त्याचा जसा मान करावा तसा करीत नाहींत असें त्याला वाटत होतें. भाऊ हावलँड व इतरांना वाटत होतें कीं, आपण त्याच्यापेक्षा उच्च आहो पण हें खरे नव्हते. पण त्याला असें वाटत होतें. पुष्कळ आठवडे तो सभेला आला नाही. म्हणून भाऊ हावलंड त्याच्या घरी गेला व त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझ्या भावा, मला क्षमा कर. मी काय केले आहे?” त्या मनुष्याने त्याच्या दंडाला धरून त्याला उभे करण्याचा प्रयत्न केला. भाऊ हावलँड म्हणाला, “नाहीं तू माझ्याविरुद्ध का आहेस? मी तुझ्याविरुद्ध नाहीं, पण तू माझ्याविरुद्ध असला पाहिजेस. कारण एके वेळी आपण बोलत होतो. पण तू आता बिलकूल बोलत नाहींस. त्याचे काय कारण आहे तें मला कळले पाहिजे.” CChMara 132.5
तो मनुष्य म्हणाला, “बंधु हावलँड उठा.” तो म्हणाला, “मी उठणार नाहीं.” मग तो म्हणाला, “मी गुडघे टेकले पाहिजेत.’ असें म्हणून त्यानेहि गुडघे टेकले. तो किती पोरकट होता व किती दुष्ट विचाराने भरला होता हें त्यानें कबूल केले व म्हणाला, “मी हें सर्व काढून टाकतों.” CChMara 133.1
भाऊ हावड ही गोष्ट सांगत असतां त्याचा चेहरा देवाच्या गौरवाने तेजस्वी झाला तो हें बोलत आहे तोच कोळी व त्याचे कुटुंब आत आलें व आमची सभा उत्तम रीतीने पार पडली. CChMara 133.2
समजा बंधु हावलँड यांच्याप्रमाणे आम्ही केले. जेव्हां आपल्या भावाने एखादें वाईट कृत्य केले. तर त्याच्याकडे आपण जावे व म्हणावे “भावा, माझी क्षमा कर.” आम्हीं सैतानाची जादू तोडून त्यापासून आमच्या भावांना मोकळे केले पाहिजे. जर तुम्हांला आपल्या स्वार्थत्यागाद्वारे संशयाचा घाणेरडापणा काढून टाकता येईल तर तसे करा. आम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी देवाची इच्छा आहे. आम्ही असा विश्वास धरणारे व्हावे कीं, आमच्या भावांची आम्हांवर प्रीति आहे व ख्रिस्त आम्हांवर प्रीति करतो व प्रीतीला निर्माण करते. हें आम्हांला शिकविण्याची देवाची आम्हांविषयी इच्छा आहे. CChMara 133.3
आम्ही स्वर्गात आमच्या भावांना भेटण्याचे इच्छीतो काय? जर आम्ही त्यांच्याबरोबर येथे शांतीने व सहकार्याने राहूं तर तेथेहि आम्ही राहूं शकू. पण जर येथे भाडण व असतोष याशिवाय आम्ही राहूं शकत नाहीं. तर स्वर्गात त्यांच्याबरोबर कसे राहता येईल? जे आपल्या भावापासून विभक्त होतात व त्यामुळे त्यांच्यांत भेद निर्माण होतो अशा रितीने वागण्यात तर त्यांना पूर्ण पालटाची गरज आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीने आमचीं अंत:करणे मऊ होऊन ख्रिस्ताला वश झाली पाहिजेत कॅलव्हरीच्या क्रूसावर आम्हासाठी प्राण देताना त्यानें आम्हांवर जी प्रीति केली त्या प्रीतीची आम्ही आवड धरली पाहिजे. आम्ही तारणाच्याच्या अधिक जवळ येण्याची गरज आहे. आम्ही अधिक प्रार्थना करून आमचा विश्वास दाखविण्यास शिकले पाहिजे. आम्ही अधिक दयाळू, सभ्य व ममताळू बनावें. आम्ही एकदाच या जगांतून जाणार आहों. ज्यांच्याशी आमचा संबंध येतो त्यांच्या मनावर ख्रिस्ताच्या शीलाचा परिणाम आम्ही करण्याचा प्रयत्न करणार नाहीं काय ? CChMara 133.4
आमची कठीण अंत:करणे मृद झाली पाहिजेत. आम्हांला पूर्ण ऐक्याची गरज आहे. आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहों हें समजण्याची गरज आहे. प्रत्येक जण म्हणो कीं, “त्यानें माझ्यासाठी आपला प्राण दिला आहे व या जगांतून जात असतां मजसाठी स्वत:ला देण्याकडून जशी त्याची प्रीति त्यानें मला दर्शविली तशी मीहि दर्शवावी.” क्रूसावर स्वदेहाने ख्रिस्ताने आमची पापे वाहिली अशासाठीं कीं देव न्यायी आहे व त्याच्यावर विश्वास ठेवणान्याचा तो न्यायदान आहे असें समजावे. जे ख्रिस्ताला शरण जातील अशा सर्वाकरिता सार्वकालिक जीवन आहे. 4 CChMara 133.5