कलीसिया के लिए परामर्श

87/318

राष्ट्रीयत्वाशीं ख्रिस्ताचें नातें

ख्रिस्तानें राष्ट्रीयत्व, हुद्दा किंवा पंथ याचा भेद मानला नाहीं. शास्त्री व परूशी स्वराष्ट्रासाठी व स्थानिक कार्यासाठी या स्वर्गीय सर्व देणग्याचा फायदा करण्याची इच्छा बाळगीत होतें व देवाची बाकीची मंडळी जगांत सोडून देत होतें. पण ख्रिस्त हा प्रत्येक भेदाची भित पाडून टाकण्यास आला. तो हें दाखविण्यास आला कीं, पृथ्वीवर पडणारा पाऊस, उजेड व हवा यांच्याप्रमाणे त्याच्या प्रीतीच्या व दयेच्या देणग्या अमर्याद आहेत. CChMara 131.5

येशू ख्रिस्ताच्या जीवनाने असा एक धर्म स्थापन झाला कीं, त्यामध्ये जातीभेद किंवा धर्मभेद निर्माण न होऊन यहुदी व हेल्लेणी, स्वतंत्र व दास हें सर्व देवासमोर सारख्या बंधुत्वाने एकत्र बांधव आहेत. खुशामतीने त्याच्या हालचालींत बदल झाला नाही. त्यानें शेजारी व परके, मित्र व शत्रु असा भेद केला नाही. पण त्याच्या अंत:करणाची एकच आशा म्हणजे जीवनासाठी तहानलेला आत्मा. 1 CChMara 132.1

त्यानें एकही मानव व्यर्थ जाऊ दिला नाहीं पण प्रत्येक आत्म्याला बरे करण्याचा उपाय योजिला. ज्या लोकांत तो मिसळला त्यांना त्यानें समयोचित व परिस्थितीला लागू असणारा धडा शिकविला. प्रत्येक निष्काळजीपणा व अपमान मनुष्यांनी आपल्या सोबत्याच्या बाबतींत दाखविल्यामुळे त्याना दैवी सहानुभूतीची जी गरज आहे ती समजून आली. जे उद्धट व अविश्वासू आहेत अशांनी देवाच्या मुलाप्रमाणे जर शील बनविले तर तें निर्दोष व सौम्य बनतील अशी आशायुक्त खात्री त्यानें दिली. 2 CChMara 132.2

ज्याअर्थी देवाची मुलें खिस्तात एक आहेत त्याअर्थी येशु हा धर्म, जात सामाजिक भेद, परस्पर वैर आणि रंग, दर्जा, सपत्ति, जन्म किंवा पराक्रम याकडे कसा पाहतो ? एकीचे रहस्य ख्रिस्ती विश्वासणान्याच्या समतेंत आढळून येतें. 3 CChMara 132.3