कलीसिया के लिए परामर्श
मंडळीची मालमत्ता
एकाद्या गांवांत किंवा शहरात गोडी लावली तर ती गोडी कायम राखली जावी. या ठिकाणी पूर्णपणे कार्य केले जावे, अशासाठीं कीं, लहान भक्तीसदन देवाच्या शब्बाथाचे स्मारक व खूण म्हणून उभे राहावे व नैतिक अंधारात प्रकाश असें व्हावे अशी स्मारके सत्याची साक्ष या नात्याने पुष्कळ ठिकाणी उभारली जावीत. 11 CChMara 111.3
मंडळीसंबंधानें असणार्य बाबी गैर स्थितीत राखू नयेत. देवाच्या कार्याकरता मंडळीची मालमत्ता विकत घेण्यासाठी ताबडतोब पुढाकार घेतला पाहिजे, अशा साठी कीं, कार्य प्रगती हाणून पाडली जाऊ नये व मनुष्यें जें द्रव्यसाहाय्य देवाच्या कार्यासाठी वाहू इच्छितात तें शत्रूच्या CChMara 111.4
हातांत पडूं नये. CChMara 112.1
मला असें कळून आलें कीं देवाच्या लोकांनी समंजसपणाने वागावे व मंडळीची कोणतीही कामगिरी सुरक्षित राहाण्याकरता कांही अर्धेमुर्दे करूं नये. अशाप्रकारे त्यांना जें जें करता येणें शक्य आहे तें केल्यावर त्यांनी या गोष्टी त्याच्याकरता दूर कराव्या म्हणून देवावर भरवसा ठेवावा, अशासाठीं कीं, सैतानाने देवाच्या अवशिष्ट लोकांचा गैरफायदा घेऊ नये. ही सैतानाची काम करण्याची वेळ आहे. वादळाचे भविष्य आपल्यापुढे आहे आणि मंडळीने पुढे जाण्यासाठी जागे व्हावे अशासाठीं कीं, त्यांनी त्याच्या योजनेविरुद्ध सुरक्षितपणे उभे राहावे कांहीतरी करण्याची वेळ आहे. मंडळीच्या बाबी ढिल्या सोडाव्या अशी देवाची त्याच्या लोकांसंबंधाने इच्छा नाही व सैतानाला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व बाबींवर ताबा ठेवू देण्याची व त्याचा गैरफायदा घेऊ देण्याची त्याची इच्छा नाहीं. 12 CChMara 112.2