कलीसिया के लिए परामर्श

67/318

स्थानिक मंडळीच्या कामदाराची निवड व दीक्षा

प्रेषित पौल तीताला लिहितो कीं, “मी तुला क्रेतात यासाठी ठेविलं कीं, तू बाकी राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे नगरोनगरी वडील नेमावे. जो नेमावयाचा तो अदृष्य एका स्त्रीचा पति असावा; ज्याची मुलें विश्वास ठेवणारी आहेत, ज्यावर दंगल करण्याचा आरोप आलेला नसून जी अनिवार नाहीत, असा तो असावा. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदृष्य असला पाहिजे.” तीत १:५-७. “उतावळीपणानें कोणावर हात ठेवूं नको.” 9 तिमथ्य ५:२२ CChMara 111.1

आमच्या कांही मंडळ्यात वडिलांना नेमणे व त्यांची दीक्षा करणें धांदलीचे झाले आहे. पवित्र शास्त्राचा नियम मोडला जातो. शेवटी भयकर त्रास मंडळीवर ओढवला जातो. पुढारी नेमण्याच्या बाबतींत घाई नसावी व जबाबदारीच्या कामाकरिता तयार नसलेल्यांना दीक्षा देऊ नये. अशा मनुष्यांनी स्वत:चा पालट होऊ दिला पाहिजे, स्वत:ला निवडू दिले पाहिजे. सर्वश्रेष्ठ गुणधर्म संपादन करून व सुधारणा घडवून आणावी म्हणजे त्यानी देवाच्या कार्यात भाग घेण्याअगोदर या गोष्टी अमलांत आणाव्या. 10 CChMara 111.2