कलीसिया के लिए परामर्श
मंडळीला दिलेला अधिकार
मंडळीच्या हक्काला ख्रिस्त सामर्थ्य पुरवितो. “मी तुम्हांला खचित सागतों, जे काहीं पृथ्वीवर तुम्ही बंद कराल तें स्वर्गात बद केले जाईल, आणि जे कांही पृथ्वीवर मोकळे कराल तें स्वर्गात मोकळे केले जाईल.” मत्तय १८:१८. अशा बाबतीत कोणाही मनुष्याला त्याच्या स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या मताप्रमाणे करण्याचा अधिकार नाहीं. देवाने आपले श्रेष्ठ सामर्थ्य पृथ्वीवरील मंडळीला दिले आहे. मंडळींतील एकचित लोकांमधील देवाच्या वाणीचा मान राखला पाहिजे. 5 CChMara 105.3
मंडळीविरुद्ध आपला न्याय प्रस्थापित करण्यास देवाचे वचन एका मनुष्याला परवाना देत नाहीं किंवा मंडळीच्या मताविरुद्ध आपले मत पुढे मांडण्यास मोकळीक देत नाहीं. जर मंडळीत नियम व कायदे नाहींत तर मंडळीचे तुकडे तुकडे होतील; ती एक शरीर अशी राहणार नाहीं. कांही स्वतंत्र माणसें होऊन गेली ती म्हणत कीं त्यांचेच म्हणणे बरोबर आहे. देवाने त्यांनाच विशेषकरून शिकविलें व मार्गदर्शन केले आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे तत्त्व आहे व त्यांची मते चमत्कारिक आहेत व ती देवाच्या वचनांशी जुळती आहेत असें तें म्हणतात. प्रत्येकाचे तत्त्व वेगळे व विश्वासही वेगळा, प्रत्येकाचे म्हणणे आहे कीं, त्यांना देवापासून विशेष प्रकाश मिळाला आहे. हें सर्व शरीरापासून वेगळे करते व प्रत्येकजण एक वेगळी मंडळी बनतो. हें सर्व बरोबर असू शकणार नाहींत, तरी देवाने त्यांना चालविलेले आहे असें समजतात. CChMara 105.4
आपला तारणारा त्याच्या शिकवणूकीचे धडे पुढील वचनानुसार अनुसरतोः जर दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र होऊन कांही मागतील तर तें मी करीन. ख्रिस्त येथे दाखवितो कीं, इतरांशी आमचे ऐक्य असावें, आमची आशासुद्धा दिलेल्या हेतूंत एक असावी. ऐक्याने केलेल्या प्रार्थनेत फार मोठे महत्त्व ऐकतो; पण या प्रसंगी येशूनें एक विशेष व महत्वाचा धडा दिला आहे त्याचा पृथ्वीवरील नवीन स्थापन झालेल्या मंडळीवर एक विशेष रोख आहे ज्या गोष्टींची तें इच्छा करतात व त्या मिळण्यासाठी प्रार्थना करतात त्या गोष्टींत एकवाक्यता असली पाहिजे. ही फक्त एका मोहाला वश होण्याची शक्यता असेल त्या मनावर अवलंबून नाहीं. पण वेगवेगळ्या मनाची एकाच गोष्टीसाठी कळकळीची इच्छा दर्शविणारी विनंति असावी. 6 CChMara 106.1
मंडळी ही मनुष्याच्या तारणासाठीं देवाने निवडलेली हस्तक आहे. ती सेवेसाठी स्थापन केली आहे आणि तिचे कार्य जगाला सुवार्ता गाजविणे हें होय. प्रारंभापासून देवाची योजना होती कीं, त्याच्या मंडळीद्वारे जगाला त्याची पूर्णता व विपुलता प्रतिबिंबित व्हावी. मंडळीच्या ज्या सभासदांना अंधारांतून प्रकाशांत बोलविले आहे त्यांनी त्यांचे गौरव प्रगट करायचे आहे. मंडळी ही ख्रिस्ताच्या कृपेच्या संपत्तीचे कोठार आहे आणि मंडळीद्वारे स्वर्गीय ठिकाणातील अधिकारी व सामर्थ्य यांना शेवटचा आणि पूर्ण अशी देवाच्या प्रीतीचा देखावा दाखविण्यांत येईल. 7 CChMara 106.2